Thursday, December 23, 2021

संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक

 संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक


सरकार आदेश देणार पोलीस अंमलबजावणी करणार आणि नागरिक संघर्ष करणार सध्या आपल्या देशात हेच चालू आहे.त्यात कोणालाच कोणाची सामाजिक बांधिलकी नाही.सर्वच सरकारी खाते हे खाते आहेत.सरकारी कर्मचारी अधिकारी हे राजकीय नेत्यांची गुलामी स्वीकारून देशातील नागरिकांचे आर्थिक शोषण करीत असतात.सरकार म्हणजे कोण राजकीय पक्षांचे सत्ताधारी नेते भांडवलदारांच्या फायद्यासाठी योजना,बिल बनविणार त्यांची अंमलबजावणी कर्मचारी अधिकारी पोलीस करणार.सरकारच्या धोरणाला विरोध कोण करणार?. कामगार,शेतकरी,ग्राहक म्हणजेच नागरिक मोर्चे आंदोलने करणार पोलीस त्यांच्यावर बळाचा वापर करणार,आणि आदेशाचे पालन करणार.प्रत्येक नेता आणि शासकीय कर्मचारी अधिकारी नागरिकांचे वेगवेगळा पद्धतीने आर्थिक शोषण करणार आणि सांगणार सरकारचा आदेश आहे.आम्ही काय करणार?.सरकारच्या कोणत्याही खात्यात जा चिरीमिरी दिल्या शिवाय काम होत नाही.नाहीतर एक नाही अनेक चुका काढल्या जातात.मग कार्यालयात चकरा माराव्या लागतात.त्यामुळे एक तर रोजगार बुडतो आणि येण्याजाण्याचा प्रवास खर्च चहा पाणी जेवणा चा खर्च हा आलाच.तो करण्यापेक्षा चिरीमिरी देणेच सोयीस्कर परवडते.हाच सर्व नागरिकांना सरकारी खात्याचा अनुभव आला असेल.म्हणूनच सरकारी खाते हे खातेच असते.त्यांचे मालक कर्मचारी अधिकारी असतात.
एकटा दुकटा नागरिक संघर्ष करू शकत नाही.त्यासाठी प्रत्येक खात्यातील लाभार्थीची एकजूट म्हणजेच संघटना असायला पाहिजे.आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावी.स्वतंत्र विचारांची असावी.
मी असंघटीत नाका कामगारांची नांव नोंदणी करण्यासाठी खूप प्रयत्न करतो.पण शासकीय अडचणी दूर होत नाहीत.आणि नाका कामगारांना तेवढा दररोज संघर्ष करण्यासाठी वेळ नाही.तरी प्रत्येक तालुका जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगार नाका कामगारांच्या विविध संघटना मोर्चेबांधणी करून जनांदोलन करीत असतात.ते करीत असतांना संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक कायम असतो.
आता नवीन समस्याकडे आपले लक्ष वळवितो.आजच्या काळात प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल,हिरो होंडा,यामा,बजाज टू व्हीलर गाड्या आहे,तर नोकरी व उद्योग धंदा करणाऱ्यांकडे फोरव्हिलर गाड्या असल्या शिवाय त्यांना समाधान वाटत नाही.व ते प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते.या नागरिकासाठी सरकारने वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे, हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे, त्यामुळे नागरिक आणि पोलिस यामध्ये वाद दररोज कोणत्याना कोणत्या चौकात वाढत आहेत.पण हा दंड सरकारने वाढवला आहे, पोलिसांनी नाही, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, म्हणजे पोलीस नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाले वर जो E-chalan मशीन द्वारे दंड आकारतात तो सरकार जमा होतो, आणि नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाला की दंड आकरण्याचे काम सरकारने पोलिस ना दिले आहे, त्यामुळे एक तर वाहतूक नियम पाळा, नाहीतर गपचूप दंड भरा, पण आपली चूक असताना पोलिसांशी वाद घालत बसू नका, त्या पोलिसांना दिवसभरात आपल्यासारख्या किती तरी नागरिकांना तोंड द्यावे लागते,संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक सर्वत्र पाहायला भेटतो.पोलीस व वाहन चालक दोघांना ही खूप त्रास सहन करावा लागतो,त्यासाठीच नगरातील,विभागातील वाहन चालक मालकांनी संघटीत झाले पाहिजे.अधिकृतरीत्या संघटना बनविली पाहिजे आणि सनदशीर मार्गाने संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाशी पत्र व्यवहार केला पाहिजे.संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक यांचा सनदशीर मार्गाने समस्या सोडविल्या पाहिजेत.
वाहन चालक मालकांनी आपल्याला दंड भरावा लागू नये याकरिता वाहतूक नियम पाळा १) आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, त्याशिवाय गाडी चालवू नाका २) टू व्हीलरवर जाताना गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घाला, आणि शक्य झाले तर गाडीमागे बसणाऱ्या व्यक्तीला ही हेल्मेट घालायला सांगा.३) गाडी चालवताना आपल्या गाडीची कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स,सोबत बाळगा.४) गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवा, संपला असेल तर पुन्हा अपडेट करून घ्या.५) आपली गाडी शकतो दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी देऊ नका, आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का ते चेक करा, ) आपल्या टू व्हीलर वर तिसरा व्यक्ती बसवू नका.७) आपली गाडी जर आपण एखाद्या व्यक्तीला विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करून घेतली आहे का ते पहा, कारण जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाइन दंड आपल्या नावावर आपल्या घरच्या पत्यावर येणार,(वाहतूक कोर्ट चे पत्र आपल्या घरी येणार) ) लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका, जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढायच्या लायकीचा होत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका, ९) गाडी चालवताना सिग्नल कटिंग करू नका, सिग्नल ला कॅमेरा असतो, आपल्या वाहनावर  cctv कॅमेरा मार्फत दंड पडतो, आणि आपल्या गाडी नंबर वरून आपल्या घरच्या पत्यावर (मोटार कोर्टाचे) दंड आकारण्याबाबत पत्र येते,१०) सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग वर वाहन थांबवू नका,
११) लाल सिग्नल लागते वेळी गाडीचा वेग वाढवू नाका, पिवळा सिग्नल लागताच गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवा,१२) जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (wrong side) ने वाहन नेवू नका, १३) गाडी नो पार्किंग एरिया  किंवा फुटपाथवर पार्क करू नका,  पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करा.१४) गाडी चालवण्या आगोदर गाडीच्या टायर मधील हवा आणि पेट्रोल चेक करा, कमी असेल तर भरून घ्या,१५) वेळीच गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या म्हणजे गाडी रस्त्यात कधी बंद पडू नये याची काळजी घ्या.१६) जड वाहतूक दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या रोड ने घेऊन जावा,१७) फोर व्हीलर, किंवा मोठी गाडी चालवताना नेहमी सीट बेल्ट चा वापर करा.१८) गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असेल किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका, व्यवस्थित मोठ्या अक्षरात गाडी नंबर दिसेल अशी नंबर प्लेट गाडी ला लावा.१९) खाजगी गाड्यावर पोलिस किंवा इतर काही मजकूर लिहू नका,२०) आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरसे आसने गरजेचे आहे २१) आपल्या वाहनाला कर्कश्य हॉर्न बसवू नका. २२) फोर व्हीलर ला डार्क काळ्या काचा बसवू नका, 
गाडीमधील माणूस बाहेरच्या व्यक्तीला दिसेल अशी काच बसवावी. २३) गाडीची फ्रंट लाईट आणि बॅक लाईट आणि पुढील व मागील इंडिकेटर बंद असेल किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करून घ्या.२४) गाडीवर किंवा गाडीमध्ये बसून राहून गाडी रस्त्यावर थांबवू मागून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करू नका.आपण जर वरील सर्व नियम आपल्या वाहनांच्या बाबतीत पाळत असाल तर आपल्या हातून कधीही वाहतुक नियमांचा भंग होणार नाही, आणि आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही, जर आपण कोणताही नियम मोडला तर वाहतूक पोलिसांना दोष देऊ नका, मुकाट्याने दंड भरा, आणि गप निघून जा, आणि यावेळी दंडाची रक्कम सरकारने बऱ्याच प्रमाणात सरकारने वाढवली आहे, ती रक्कम सामन्य नागरिकाला भरणे कठीण वाटते,त्यामुळे आपण आपले वाहन योग्य रीतीने वापरा आणि चालवा.




हा वाहन चालक मालकावर अन्याय आहे हे शंभर टक्के सत्य आहे त्यासाठी सरकारला ही त्याच पद्धतीने दंड करता येतो.त्यासाठी आपण संघटीत झाले पाहिजे.काय करू शकते संघटना ते डोक्यात ठेवा.रोड कोणत्या खात्याच्या अंतर्गत येता.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ State Public Works Department  (PWD) Ministry of Road Transport & Highways, Government of India. मुंबईसह राज्यात ८८ टक्के प्रवासी सार्वजनिक रोड वाहतुकीचा वापर करतात. मुंबईतील बस परिवहन व्यवस्था आहे ही भारतात सगळ्या शहरांत सर्वात मोठी आहे.वाहन चालक मालक संघटना युनियन काय करू शकतात.खराब सिग्नल असेल तर सबंधित जबाबदार अधिकारी यांना दहा हजार रुपये दंड,रस्त्यावर खड्डे असल्यास सबंधित जबाबदार अधिकारी यांना वीस हजार रुपये दंड,रोडवर खड्डे खोडून व्यवस्थितपणे बनविले नाही म्हणून सबंधित  जबाबदार खड्ड्यात पडून वाहनाचे व वाहन चालकाचे नुकसान झाल्यास अधिकारी यांना दवाखाना व वाहन खर्च अधिक पाच हजार रुपये दंड.असे कायद्यानुसार वाहन चालक आणि मालकांना संघटनेच्या वतीने सरकारच्या या उन्मत्त अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करता येऊ शकते.म्हणूनच त्रिकोणी संघर्ष टाळावा.राजकारणी राज्यकर्ते आणि सर्वच खात्याचे कर्मचारी अधिकारी नागरिकांचे ग्राहकांचे वर बोट दाखवून आर्थिक शोषण ते संघटीतपणे करतात म्हणूनच आपण ही संघटीत झाले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिवराज्य वाहतूक संघटना रविंद्र सूर्यवंशी यांनी स्थापन केली आहे.त्यांनी वाहतूक संबधित अधिकारी आणि चालक मालक अनेक समस्या चर्चा करून सोडविले आहेत. "मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही" संघटीत होऊन संघर्ष केला तर यशस्वी होता येतो. म्हणूनच संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक संघर्ष पत्र व्यवहार करून टाळावा.नसेल तर शक्ती प्रदर्शन आवश्यक आहेच.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

Monday, December 20, 2021

स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे?.

 

Friday, December 17, 2021

ओबीसी भक्तांची करोडपती मंदिरे

 ओबीसी भक्तांची करोडपती मंदिरे 



देशात ओबीसी लोकसंख्या हे नेहमीच लक्षवेधी असते.प्रत्येक पक्षात आणि मंदिरात सर्वात मोठा कार्यकर्ता आणि भक्त हा ओबीसी जातीतील असतो.ओबीसी जातीच्या सहा हजार सहाशे जातीची भक्तीचा गांभीर्याने विचार केला तर पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहणार नाही. देशातील सर्वच मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या नेत्यांना ओबीसी जनगणना करण्याची इच्छाशक्ती नाही.देशातील कोणत्याही हिंदुच्या मंदिरात ओबीसीना पुजारी,ट्रस्टी म्हणून स्थान नाही.तरी त्यांच्यात भक्तीची आणि कार्यकर्त्यांची कमी नाही.ओबीसीना किती ही असमानतेची वागणूक दिली, तरी त्याच्यातील स्वाभिमान जागा होतांना दिसत नाही.जाऊद्या आपल्याला काय घेणेदेणे,तर चला आपण ओबीसीची भक्तांची करोडपती मंदिरे त्यांची माहिती घेऊया.
भारतात हिंदूंची मंदिरे- पाच लाख शहात्तर (76हजार आहेत,मंदिरातील पुजा-यांची संख्या- तीस लाखाच्यावर आहे. मंदिरांतील सोने -बारा हजार आठशे मेट्रीक टन (एक मेट्रीक टन = 1000 किलोमध्ये 12800×1000 = 1 कोटी अट्ठावीस लाख किलो.आजच्या बाजारभावा नुसार मूल्य काढा. मंदिरांना मिळणारी किमान वार्षिक दक्षिणा बारा लाख,एक हजार कोटी रूपये.मंदिराचे सारे विश्वस्त कोण?तर ब्राह्मण.मंदिरांतील सगळे पुजारी, पुरोहीत ब्राह्मण.मंदिरांतील सगळी संपत्ती कुणाकडे?तर ब्राह्मणांकडे.ती संपत्ती त्यांच्याकडेच राहावी म्हणून मंदिर व्यवस्थापन कायद्याला विरोध कुणाचा?याच ब्राम्हणांचा.कमी शिकलेले ब्राह्मण पुजारी, पुरोहीतगिरी करतात.बाकी उच्च शिक्षण घेऊन उच्चपदावरच्या नोक-या करतात. मंदिरांतून ९४ टक्के ब्राम्हणेतर म्हणजे मुलनिवासी बहुजन,ओबीसी समाजाकडून (म्हणजे ज्यांना ते शूद्र - अतिशूद्र म्हणजे संस्कृतमध्ये याचा साधा सरळ अर्थ म्हणजे गुलाम म्हणतात) ज्यांना याच ब्राम्हणांनी ६७४३ इतक्या प्रचंड जातींमध्ये विभागले. ह्या ९४ टक्के लोकांकडून मिळणारा अफाट धनलाभ लक्षात घेऊन बरेचसे ब्राह्मण नोकरी - व्यवसाय सांभाळून पार्टटाईम जाॅब म्हणून पुरोहीतगिरी जन्मसिद्ध हक्काने करतात.अशा प्रकारे मंदिरे ही भटा-ब्राह्मणांची रोजगार हमी योजना आहे. आणि ती विना अडथला वर्षानुवर्षे चालूही आहे.आणि हा सगळा पैसा ९४ टक्के लोकं (जे संख्येने बहू म्हणजे जास्त आहेत. म्हणून यांना बहुजन समाज म्हटले जाते.) हा बहुजन समाज देवाची कृपा व्हावी म्हणून श्रद्धेने जमा करतात परंतु त्याचा हिशोब मात्र मागत नाहीत.
कोणी प्रबोधनाचा प्रयत्न केलाच, तर त्याला धर्मभंजक, नरराक्षस, नास्तिक ठरवले जाते. हे ठरवण्यात सगळ्यात आघाडीवर असतो तो हाच कपटी ब्राह्मण अन आपला देवभोळा, श्रद्धाळू,धर्मभोळा आणि वेडगळ बहुजन समाज अशा कपटी ब्राह्मणांच्या सोबतीला राहून तो सुध्दा विरोध करतो. चांगल्या गोष्टींना विरोध करणारा बहुजन समाज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुतणाऱ्या बडव्यांविरोधात मात्र कमालीचा षंढ (नपुसंक) बनून थंड बसलेला होता.
ऊठसूट बहुजनांना हिंदुत्वाचा डोस पाजून माथी भडकवणा-या किती हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांनी जिजामातेच्या चारित्र्यावर घाणेरडे शिंतोडे उडवणा-या जेम्स लेनच्या लिखाणा विरोधात निदर्शने,निवेदने,उपोषणे केली?.एकही नाही ! कारण जवळ-जवळ सर्वच हिंदुत्ववादी पक्ष,संघटनांचे प्रमुख हे ब्राह्मणच आहेत.हा विषय त्यांच्या फायद्याचा, हितरक्षणाचा नसल्याने अशा वेळेस ते कधीही "हिंदू खतरे में" अशी बांग देणार नाहीत. मात्र ज्या वेळेस त्यांनी अशी बांग दिली की आपण समजावे की हिंदू नाही तर "ब्राह्मण खतरे में" आहे.
एवढ्या अफाट संख्येने ब्राह्मण लोक हे मंदिरांमध्ये पुजारी आहेत परंतु त्यामध्ये बहुजन पुजारी एकही नाहीत.का आजही हिंदु धर्मात बहुजनांना तो मान नाही?का देवाला आम्हा माणसांसारख्या माणसांकडून (शूद्र - अतिशूद्र ९४% बहुजन हिंदूंकडून) पूजा-विधी मान्य नाहीत काय ?आजपर्यंत "मंदिरांत पुजा-यांची भरती" अशी जाहीरात कधी वाचली आहे का?बहुजन समाजातील कथा-किर्तनकार,प्रवचनकार, बुवा ह्यांनी आयुष्यभर देवाच्या नावाने फक्त टाळच कुटायचे का?त्यांना हा अधिकार केव्हा मिळणार?.हा अधिकार ठरविणारा असा कोणता देव आहे?. 
का ह्याच ब्राम्हणांचा धर्म,कर्माला नव्हे तर जन्माला महत्त्व देतो. मग हाच ब्राम्हण कितीही नालायक असला तरी शेवटी तोच श्रेष्ठ असतो.का आजही मोठ्या पदावर पोहचलेल्या बहुजनाला सुद्धा मुला-मुलींच्या लग्नात मात्र हजारो लोकांसमोर शेंबड्या भटाच्या पायावर डोके ठेवावे लागते?.का बहुजन आपल्या सर्व प्रकारच्या विधी बहुजनाकडून करून घेत नाहीत?.एखादा पुढाकार घेऊन जातीव्यवस्थेला मोडीत काढीत असेल तर त्याला धर्मभ्रष्ट का ठरवले जाते?असे अनेक प्रश्न आहेत. याचा विचार सर्वच ९४ टक्के बहुजनांनी करावा.ब्राह्मण हा देवी-देवतांच्या,हिंदुत्वाच्या नावाने हजारो वर्षापासून बहुजनांचे शोषण करीत आहे आणि त्यांचा शोषणाचा निर्धोक मार्ग हा मंदिरांमधून जातो. म्हणूनच मंदिराच्या निर्मितीवर ब्राह्मणांचा भर हा अधिक असतो.त्यात बहुजन ओबीसी समाज सर्वात मोठ्यासंख्येने असतो.    
भारत हा जगातील क्रमांक १ चा गडगंज संपत्ती असलेला देश आहे. तरी पण सगळी संपत्ती ह्या मुठभर तीन टक्के ब्राम्हणांनाच्या हक्काची आहे. त्याचे खंत बहुजन ओबीसीना कधीच वाटत नाहीमंदिराच्या संपतीमुळे आज देशात एकही गरीब नसायला पाहिजे. पण ३० करोड लोकांना आज एकवेळेचे पोटभर जेवण मिळणे मुश्किल आहे. त्यांचे या ब्राम्हणांना काही देणे घेणे नाही.सामाजिक बांधिलकी किंवा माणुसकी नावाचा अंश यांच्या रक्तात नाही. कारण हे ३५०० वर्षापूर्वी खैबरखिंडीतून आलेले आर्य आहेत. ज्यांनी आपल्याला ३५०० वर्षापासुन बहुजन ओबीसी समाजाला जाती-पातीच्या नावावर मानसिक गुलाम बनवून ठेवले. बहुजन ओबीसी पण हा देवभोळा बनून स्वर्गात जाण्यासाठी जिवंतपणी अनंत आत्ना भोगतो.बहुजनांना ओबीसीना शिक्षणात नोकरीत जे काही आरक्षण मिळाले ते कोणत्याही देवामुळे नवसामुळे नव्हे तर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.आज त्यांची चारीबाजूने कोंडी होत असतांना तो पाहिजे तेवढ्या तीव्रतेने पेटून उटला नाही. तेव्हा ९४ टक्के ब्राम्हणेतर मुळनिवासी बहुजन ओबीसी तीन टक्के ब्राम्हणांच्या थोतांडापासून सावध होत नाहीआम्ही जीवावर उद्धार होऊन असे प्रबोधन करणारे लिहत असतो.सत्य असत्याची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन आहे असे तथागतांनी व महामानवानी आम्हाला सांगितले आहे.समाजाच्या हिताचे व कल्याणाचे विचार परखडपणे निर्भीडपणे निपक्षपातीपणे लिहणे,बोलणे मांडणे म्हणजेच प्रबोधन असते.बहुजन मुलनिवासी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बंद करण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात वर्णव्यवस्था रामराज्य येण्याची ही पूर्व तयारी आहे हे सर्व बहुजनांनी ओबीसीनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.आम्ही बुद्ध,शिव,फुले,शाहू आंबेडकरांच्या विचारांचे लोक सतत जनजागृती करण्यासाठी लिहत असतो.ओबीसी समाज लोकसंख्येच्या बळावर वाघ आहे.पण झोपलेला आहे.तो खरच वैचारिक पातळीवर जागृत झाला तर धर्मसत्तेसह शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सत्तेचे केंद्र उध्वस्त करू शकतात.म्हणूनच सुरवात कुठून करावी तर ब्राम्हणाची रोजगार हमी म्हणजेच करोडपती मंदिरे ओबीसी भक्तीमुळे ओसंडून वाहतात ती बंद झाली पाहिजेत.
सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना. 

कामगार,शेतकरी मेला तरी चालेल उद्योगपती,पुजारी जगला पाहिजे

 कामगार,शेतकरी मेला तरी चालेल उद्योगपती,पुजारी जगला पाहिजे



भारतातील कामगारंची आणि शेतकऱ्याची फार वाईट परिस्थिती आहे.आई जेवण घालत नाही.आणि बाप भीक मागु देत नाही.मायबाप सरकारच काय करावे याचा मोठ्ठा पेच पडलाय कामगारांना व शेतकऱ्यांना! काँग्रेस हे भांडवदाराचे सरकार आहे.ते गोरगरीब शेतकऱ्याला मजुरांना सुखाने जगू देत नाही.यांना सत्तेतुन घालविल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही.हे बेबीच्या देठा पासुन ओरडुन सांगणारे राज्यातील देवेन्द्र फडणवीस साहेब आणि देशभर शेपन्न इंच छाती फुगवुन सांगणारे नरेंद्र मोदी साहेब यांना आता काय कठीण वाटत आहे ते देशातील तमाम कामगार कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना समजण्या पलीकडे झाले आहे.तेव्हा काँग्रेस ही काही भाजप शिवसेने सारखी ज्वलंत हिंदुत्व वादी नव्हती. सर्वधर्म समभाव मानणारी होती.म्हणुन शेतकऱ्याची कृषीउत्पन्न बाजार समितीत हिंदुत्ववादी शेतकऱ्यांची प्रचंड लुटमारी होत होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्जाचा डोंगर कमी होण्या ऐवजी वाढत होता.तेव्हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी गर्वसे कहो म्हणणारे तालुका,जिल्हा सिंह गर्जना करून हालवून ठेवत होते.आता त्यांना मंदिराबाहेर हिंदुत्ववादी शेतकरी,कर्जबाजारी शेतकरी दिसत नाही.त्यामुळे दुष्काळ जाहीर करायचा प्रश्नच उद्धभवत नाही.तेव्हा विहिरींना पाणी नव्हते.आता पाणीच पाणी आहे विहीरीला, तेव्हा लाईट नव्हती आणि लाईटबील मात्र वेळेवर येत होतो. आता भरपूर लाईट आहे.त्यामुळे लाईटबिल वेळच्या वेळेला येत नाही.तेव्हा काँग्रेस सह सर्वच पक्षाच्या नेत्यांचे डोळे फुटले होत.कान बहिरे झाले होते.त्यांची वाचा गेली होती.कारण त्यांनी ज्वलंत हिंदुत्ववादी कामगारंचे व शेतकऱ्यांचे कोणतेच दुःख दिसत नव्हते.तेव्हा राज्य व केंद्र साकारलं पाझर फुटत नव्हता. आताचे राज्य आणि केंद्र सरकार किती दयाळू आहे पहा. किती गरीब कष्टकरी उधोगपतीनां कर्ज माफ केले.विजय मल्ल्या सारख्या गरीब माणसाला नऊ हजार करोड रुपये कर्ज बुडवून परदेशात गेला.काही केले नाही सरकार आणखी किती संस्कारीत माणस सत्ताधारी पाहिजे.शेतकऱ्यांना कर्ज देतांना सातबारा आणि ओळखीचे दोन जामीनदार लागतात.तेव्हा बँक अधिकारी कर्ज पास करता.मग विजय मल्ल्याला कर्ज देतांना कोणते कागद पत्र आणि जामीनदार घेतले?.ते ते सरकार आणि हे सरकार का नाही जाहीर करत?.हिंदुत्ववादी शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती जामीनदारांच्या नांवा सह वृत्तपत्रात जाहिरात देऊन जनतेला सांगितल्या जाते.मग हया बँक अधिकाऱ्यांच्या गुणवंत कर्तबदारीचे जाहीरपणे मूल्यमाफन का होत नाही.शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि गरीब उधोगपतीनां कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय का?.कोणाची जात धर्म आडवा येतो?.तिथे ज्वलंत हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय लागु होत नाही काय?.
सरकारकडे पैसा नाही शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला.पण भारतातील 400 रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय सेवा देण्यासाठी सरकारने गूगल सोबत साडेचार लाख कोटी रुपयांचा करार केला आहे.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला ७६ हजार कोटी नाहीत आणि वाय फाय साठी साडेचार लाख कोटी आहेत.




माणसाला जगायला "भाकरी " पाहिजे कि वाय फाय ?.
देशातील सर्व सरकारी नोकऱ्या हया नागरिकांची सेवा करण्यासाठी असतात.त्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या,कारखाने नाहीत.तरी त्यांना दरवर्षी महागाई भत्ता आणि इतर सवलती मिळतात.त्यांच्या कर्मचाऱ्यां करीता सातवा वेतन आयोग लागु होते.मग शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव का नाही?.शेतकऱ्यांच्या पिकाला महागाईची झळ पोचत नाही काय?.शेतकऱ्यांना बि,बियाने औषध, शेतमजूर यांच्या करीता पैसा कुठून येणार?.कृषिविभागतील सर्व दुकानदार, व्यापारी,अडते,दलाल यांना सर्व महागाईची झळ लागते.कृषीउत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारां न कडून माथाडी बोर्ड चाळीस,एकेचालीस टक्के लेव्ही कापुन घेते.त्यांचा त्याकामगारांना कोणताही फायदा मिळत नाही.त्यावर सर्व कर्मचारी,पुढारी कायम स्वरूपी मलिदा खातात.शेतकऱ्यांना जात,धर्म,प्रांत नसतो. पण राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यकर्ते,नेते यांना जात,धर्म,प्रांत असते.त्यावरच ते शेतकऱ्यांचे मतदान मिळवितात.तेव्हा त्यांना लाज कशी वाटत नाही.शेतकऱ्यांच्या मतदानावर निवडून यायला.ज्यांच्या मतदानावर निवडुन येतात आणि त्यांनाच सवलती देतांना हात मोडतात.पण कंपनी, कारखाने,बिल्डर्स यांचा टॅक्स माफ करता मेंदू आणि हात बरोबर काम करतात.
विरोधी पक्षात असतांना सत्तेच्या खुर्चीसाठी ओरडून सांगत होता, कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.मग आता काय झालं तुमच्या डोक्यातील मेंदूला.आता त्यांची निर्णय क्षमता कोमात गेली काय?.हिंदुत्व,मराठी माणस, धार्मिक भावनिक साद घालून कामगार,कर्मचारी शेतकरी नेला स्वर्गात आणि सत्ता मिळविली.आघाडीचे सरकार एकमेकांना सारखे शिव्या शाप देत होते पण सत्ता सोडत नव्हते.ते कोणते ही हिंदुत्वाचे संस्कार नसलेले बोके होते.युतीच्या सरकारात तर पिवर हिंदुत्वाचे संस्कार झाले नेते आहेत.हे त्यांच्या पेक्षा जास्त भांडतात.पण कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांना मराठी माणसांना न्याय देण्यासाठी सत्तेतुन बाहेर पडत नाही.म्हणुन आता शेतकऱ्यांना स्वर्गात जाण्याकरिता आत्महत्याच करण्याची पाळी आणली राजकर्तेयांनी!.

शेतकऱ्यांची शेतजमीन विकास करण्यासाठी घेता आणि उधोगपतीनां कवडी मोलाचे देता.त्यात तुम्ही मरे पर्यँत कमिशन खाणार आणि चार पिड्या बसुन खातीन एवढी संपत्ती गोळा करणार.शेतकऱ्यांची मुलं शेती गेल्यावर शहरात येऊन हाऊस पिकिंग किंवा वाचमन म्हणुन कायम असंघटीत कामगार म्हणुन काम करणार.या देशात देव देविका जागृत असत्या तर यांना त्यांनी कठोर शिक्षा केली असती.पण तेच भटा ब्राम्हणाच्या बौद्धिक कौशल्यामुळे दररोज बाजारात पांच रुपये किंमतीत विकल्या जात आहेत.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारे कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांना कोणत्याच गिनतीत घेत नाही.उच्च वर्णीय वर्गीय बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला जाहीर विरोध करण्याची हिंमत करतात.आणि हजारो कोटी रुपयाचे कर्ज बुडविणाऱ्या उच्च वर्णीय वर्गीय उधोगपतीचे कर्ज माफीची जाहीर समर्थन करतात. म्हणजे कामगार,कर्मचारी शेतकरी मेला तरी चालेल उधोगपती जगला पाहिजे ही भूमिका घेतात.कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे प्रामाणिक असते तर यांनी या अधिकाऱ्यांचे जगणे कठीण केले असते.आता कुठे आहेत.ते तोंडाला काळे फासणारे कट्टर हिंदुत्ववादी?.कुठे आहे त्यांचा मराठी धर्म?.पैसा सर्व शेष्ठ झाला आहे.धर्माचे संस्कार,नीतिमत्ता कुठेच शिल्लक राहिली नाही.आघाडी सरकार व  युती सरकार नालायक होते.तर आता महाविकास आघाडी सरकार काय आहे?. म्हणजे सरकार कोणाचे ही असो.कामगार आणि शेतकरी हा भरडला जाणार असेल तर त्यांनी काय केले पाहिजे.शेतकरी कामगार पक्षातील गणपतराव देशमुख सारखा आमदार,खासदार निवडला पाहिजे.कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आमदार, खासदार नको तर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा खरा पुत्र निवडला पाहिजे.मानस पुत्रांनी शेतकऱ्यांनी नको तेवढी नालस्ती केली आणि विश्वास गमावला.म्हणुन जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी म्हणजे शेतकरी आणि हितकरी, बहुजन हिताय बहुजन सुखाय असलाच पाहिजे.करीता शेतकऱ्यांनी महात्मा जोतीराव फुले यांचा आसुड हाती घेऊन कामगार, शेतकरी मेला तरी चालेल उधोगपती पुजारी जगला पाहिजे असे धोरण घेणाऱ्या ठेवणाऱ्यांना फोडून काढलेच पाहिजे.सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्वच कामगार शेतकऱ्यांना प्रार्थना करतो.भटा ब्राम्हणांच्या सांगण्या वरून देवाला प्रार्थना करणे सोडा जिवंत माणसाला कामगार शेतकऱ्यांना हात जोडून प्रार्थना करा.जात,धर्म सोडा शेतीवर जगणाऱ्या सर्वच कामगार,कर्मचारी अधिकारी,शेतकरी माणसांना जोडा.

सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुबंई ९९२०४०३८५९.

Thursday, April 15, 2021

माणूस संकटात असतांना करुणा दाखवा

 माणूस संकटात असतांना करुणा दाखवा 


कोरोनाने माणसातील माणुसकी जिवंत झाली कि स्वार्थ वाढला.महाराष्ट्रातील माणसांबाबत भाजपाच्या नेत्यांचा विशेष फडणवीसचा स्वार्थ येवढा वाढला कि त्यांना राज्याशी व राज्यातील जनतेशी (नागरिक,मतदार) काही देणेघेणे नाही.त्याच्यातील माणुसकी आणि बांधिलकीच्या सर्वच सीमा संपल्यात अशी त्यांची वागणूक असते.कोरोनाच्या परिस्थितीत माणसावर संकट असतांना, करुणा दाखविण्याची वेळ असतांना.महाआघाडी सरकार कसे कोसळेल यांचेच स्वप्ने रात्रदिवस पाहताना दिसतात.कोरोनाच्या भितीमुळे लोक मरतांना दिसत आहेत.कारण हॉस्पिटल मध्ये गेल्यावर रुग्णांना तपासण्या अगोदर आर्थिक परिस्थितीतीचा अंदाज घेतल्या जातो नंतरच बेड आहे कि नाही ते ठरविल्या जाते. इथेच माणुसकी दिसत नाही फक्त पैसे कमविणे हाच स्वार्थ दिसतो. डॉक्टरला देव समजून लोक त्यांच्या कडे धाव घेतात.हॉस्पिटल कत्तलखाने झाले आहेत.सर्वच नाही काही अपवादात्मक असतील त्यांचे स्वागत आहे. कारण राज्यातील शहरीभागात आणि ग्रामीण भागात अशा गंभीर लक्षवेधी घटना घडल्या नंतर ही हॉस्पिटल आणि डॉक्टर वर कडक कारवाई झाल्याची नोंद कुठे ही नाही.त्यांना स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन वाचविले आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते याबाबत कधीच पत्रकार परिषद घेऊन बोलतांना पाहिले नाही.माणूस संकटात असतांना करुणा दाखवा हे पण त्यांना सांगावे लागत असेल.तर महाराष्ट्र व मराठी माणसांचे दुर्द्व्य म्हणावे लागेल.

मुंबईत नितीन नांदगांवकर या शिवसैनिकांनी अनेक घटनावर लक्षवेधी रुग्णांना व त्यांच्या नातलगांना घेऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पडले होते त्याचे व्हीडीवो सोशल मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणत फिरत होते.मनसेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख किशोर जाधव यांनीही अनेक हॉस्पिटल मध्ये जाऊन माणुसकी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून बांधिलकी दाखऊन हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला होता. रुग्णाची आणि नातलगांची कशी फसवणूक होते ते व्हीडीवो शुटींग करून सोशल मिडीयावर दाखविले.पोलिसांनी कोणती कडक कारवाई केली यांची माहिती जनतेला झाली नाही.त्याकडे विरोधी पक्ष नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसतात.माणसांवरचे संकट महत्वाचे आहे कि पक्ष?.
कोरोनाची भिती दाखवून घाबरवू नका त्यांना योग्य ती माहिती द्यावी.सकारत्मक विचारांच्या माणसाला चांगल्या प्रवृतीचा समजले जाते.कोरोनाने सकारत्मक म्हणजे पॉजीटिव्ह positive करून ठेवले.नकारत्मक विचाराचा माणूस हा नेहमी वाईट प्रवृतीचा असतो.त्याला कोरोनाने निगेटिव्ह negative करून ठेवले.सत्ताधारी माणुसकी सामाजिक बांधिलकीने सकारत्मक विचाराने वागत असतांना.विरोधीपक्ष माणुसकीहीन असामाजिक तत्वाने नकारत्मक विचाराने वागतांना दिसत आहे.नागरिक किंवा मतदार दुयाय्म झाला आहे,स्वार्थ सर्वात मोठा दिसत आहे.राज्यातील नागरिकांना मतदारांना आपण फसवीत आहोत यांचे भान त्यांना नाही असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.संकटात पक्षभेद,विसरून निपक्षपाती निर्भीडपणे वागणे अपेक्षित असते.
राजकीय लोकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीत निरपराध माणस भरडली जात आहेत. सादी सर्दी खासी झाली आणि नाकातून शेंबूड वाहत असेल,तो पांढरा असेल तर घाबरण्याचे कारण नाही.जर तो पिवळा किंवा हिरवा असेल तर तुम्हाला अँटिबायोटिक्सची नितांत गरज आहे. आणि अशा अवस्थेत तुम्ही टेस्टिंगला गेलात तर १०० टक्के तुमची टेस्ट POSITIVE येणार. 
RTPCR चा निकाल दोन दिवसांनी येतो आणि जलद सुद्धा तुम्ही करू शकता ज्यानुसार तुम्हाला त्वरित कळेल की तुम्ही POSITIVE आहात की NEGATIVE. जर तुम्ही POSITIVE झाले असाल तर सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही जगातील सर्वात "फुसक्या" आजाराला बळी पडला आहात. ह्याचा इलाज जर तुम्ही सरकारी दवाखान्यातून केला तर तुम्ही विनाखर्च १०० टक्के बरे होणार आणि पैसे आहे म्हणून खाजगी रुग्णालयात केला तर मात्र तुमची खैर नाही. आर्थिकदृष्ट्या कशी लुटमार होते ह्याचे कारण खालीलप्रमाणे आहेत.थोडे समजून घ्या.खाजगी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सर्दी व ताप नियंत्रणात आणण्यासाठी गोळ्या औषधे आणि सलाईन दिली जातील. सरकारी रिपोर्ट वर भरोसा नाही म्हणून पुन्हा RTPCR करण्यास भाग पाडतील त्यामुळे दोन दिवसांचे बेड चार्जेस वाढतात तसेच रिपोर्ट चे ८०० रुपये भरणा करावा लागतो.रिपोर्ट आल्यावर सांगतील की त्याचा स्कोर जास्त आहे. त्यामुळे विषाणू किती खोलवर गेला हे समजण्यासाठी HTR SCAN करुन घ्या. म्हणजे गेले तुमचे २५०० रुपये. ऍम्ब्युलन्स चे १००० रुपये. हे झाले की मग तुमच्यावर आता इलाज चालू करतील.सर्दी नियंत्रणाला काही चार प्रकारच्या गोळ्या देतील,तापासाठी काही चार प्रकारचं गोळ्या देतील. सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डी ३ च्या गोळ्या देतील आणि चव आणि वास गेला असल्यास व्हिटॅमिन क च्या गोळ्या देतील. हा म्हणजे इलाज नाही सर्वात मग तुम्हाला FABIFLUE ८०० MG च्या गोळ्यांचा कोर्स चालू करतील. ह्या FORTE प्रकारातील गोळ्यांची किंमत २५६० रुपये आहे. एवढ्या महाग गोळ्या घेतल्या म्हणजे तुम्हाला वाटेल खरंच किती डेंजर आजार आहे. आहे कोरोना. आणि असे करत करत १५ दिवसांनी तुम्हाला घरी पाठविले जाईल.एकूण हॉस्पिटलचे बिल तीन लाख साठ हजार रुपयेमेडिकल पोलिशी असतील तर बिल आणखी वाढविल्या जाईल.आता एवढा पॉवर च्या गोळ्या शरीरात गेल्यावर त्या कुठे कुठे काम करतील याची शास्वती नाही. मात्र एक गोष्ट कोणी लक्षात घेत नाही की ह्याचा काहीतरी विपरीत परिणाम होणारच आहे. ते आता लक्षात येणार नाही,त्यांनी शरीराच्या कुठल्या भागावर काम केले हे भविष्यात कळेलच. आणि तुम्ही भावनिक होऊन डॉक्टरला हा जोडाल आणि तुम्हाला वाटेल ह्याच्या अकलेमुळे मला जीवदान मिळाले.परंतु असे काही नाही त्याने पक्के तुम्हाला वेड्यात काढून तुमचे खिसे रिकामे केले असतील. 
स्मार्टमोबाईल वापरणाऱ्या मित्रांनो सांगायची गम्मत अशी की ज्या FORTE प्रकारातील गोळ्या ही धुरंदर मंडळी तुम्हाला देत आहे त्याचा निर्माता आहे GLENPHARMA कंपनी. ह्यांनी INFECTION शरीरातील दूर काढण्याकरिता ह्या गोळ्या बनविलेल्या आहे बाकी काही नाहीआपण जे म्हणतो की कोरोना वर इलाज नाही त्यावर हा उपाय एकदम बरोबर बसत आहे. त्यामुळे लोक बरे होत आहे.परंतु तुमच्या हातात १० ते २० हजार रुपये किमतीचा एक महागडा फोन असून ही तुम्ही GOOGLE वर काही खात्री करून घेत नाही आहात ही सर्वात मोठी आपली चूक म्हणावी लागेल. 
देवावर विश्वास ठेवून जगणारे लोक आधुनिक तंत्रज्ञान हातात असून ही त्याचा वापर करणार नाही.खासगी आणि सरकारी यातील फरक समजून घेतला पाहिजे.तर ह्या महागड्या गोळ्या सरकारी दवाखान्यात अजिबात दिल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा HTRSCAN ही काढण्यास सांगण्यात येत नाही. तर तिथे दिल्या जातात. ह्याऐवजी DOXY१ - LDR च्या गोळ्या बाहेरून घेतल्या तर ह्याचे अवघे पाकीट ९५ रुपयांना मिळते आणि रोज दोन जेवणानंतर अशा प्रकारे पाच दिवस घेतल्यास तुमचा कोरोना कुठे निघून जातो हे ही कळत नाही. आणि अगदी ठणठणीत होऊन तुम्ही फिरण्यास मोकळे.आता तुम्ही ठरवा खाजगी हॉस्पिटल मध्ये इलाज करून तीन लाखांच्यावर रुपये घालवणार की सरकारी हॉस्पिटल मध्ये इलाज करून ९५ रुपये खर्च करणार?.सरकारी हॉस्पिटल मध्ये चांगला इलाज मिळण्यासाठी नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे.वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले पाहिजे त्याच बरोबर लोकप्रतिनिधी यांचे कान धरून काम करून घेतले पाहिजे.लोकप्रतिनिधी हे स्वताला मोठे समाजसेवक समजतात त्यांना समाजाची सेवा करायची असते ते बिनपगारी नसतात.त्यांना खूप साधन व सुविधा उपलब्ध असतात.नागरिक मतदार त्यांच्या कडे कानाडोळा करतात त्यामुळेच त्यांची राजकीय  घराणेशाही पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरसेवक,आमदार खासदार लोकप्रतिनिधी म्हणून असते.कोरोना काळात करुणा दाखविणारे लोकप्रतिनिधी शोधा.त्याच बरोबर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी,कर्मचारी यांची योग्य ती नोंद ठेऊन त्यांचे चांगले कार्य असेल तर मानसन्मान करा.आणि चुकीचे काम असेल तर कडक कारवाई होण्यासाठी हातात पेन घेऊन जेवढे लिहता येईल ते लिहा.भविष्यात कोणते ही संकट आले तर करुणा दाखविणारे लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,डॉक्टर नर्स निर्माण होतील अथवा सर्व सार्वजनिक आरोग्य,शिक्षण,रोजगार देणारे निर्दयी लोक निर्माण होतील.अच्छे दिनचे स्वप्ने पाहणे सोडून द्या. स्वताच्या सुरक्षेसाठी स्वताच तयार व्हा!.कोरोना झाल्यावर निर्दयी होऊ नका,माणूस संकटात असतांना करुणा दाखवा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.  

Friday, March 5, 2021

लीडर जन्माला येत नाहीत,ते घडवावे लागतात.

लीडर जन्माला येत नाहीत,ते घडवावे लागतात.

कोकणात तीन दिवसांचा माझा हा तिसरा दौरा झाला, तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळ सांगून कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वतंत्र मजदूर युनियनशी विचारांने जोडणे हाच प्रमुख उद्देश होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सफाई कामगारांची पहिली युनियन स्थापन केली ती १९३४ ला त्यावेळी बहुसंख्येने सफाई कामगार हे कोकणातील होते आणि आजही महानगरपालिका मध्ये घन कचरा व्यवस्थापन सह इतर विभागात कोकणातील कामगार माणूस लक्षवेधी संख्येने आहेत. गावकी भावकीत तो जो शिस्तबद्ध असतो, तसाच तो आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीत नेतृत्व करण्यासाठी लक्षवेधी असला पाहिजे होता.कारण त्यांचे वडील आजोबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते, तोच त्यांना प्रेरणादायी आदर्श असला पाहिजे होता. कोकणातील माणूस कधी कधी गर्वाने सांगतो बाबासाहेब आंबेडकर कोकणातील होते. आंबावडे,त्यांचे मुळगांव, रमाईचे जन्म गांव वनंद,मंडणगड, दापोली रत्नागिरी जिल्हा हे सर्व चळवळीचे प्रमुख प्रेरणादायी केंद्र आहेत.त्याच पद्धतीने कोकणातील महाड चवदार तळे आंदोलन दोन कारणाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले आहे. एक चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह तर दुसरे मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन. त्यामुळेच कोकण विभाग हा आंबेडकरी चळवळीचा प्रथम संघटन, सत्याग्रह,आंदोलन, संघटन कौशल्य,वक्तृत्व नेतृत्व घडविणारे केंद्र समजले पाहिजे.परंतु असे काही मला दिसले नाही. 

कोकणात महानगरपालिका,नगर परिषद,नगरपालिका,नगर पंचायत आहेत त्यात काम करणारा कामगार शंभर टक्के मागासवर्गीय विशेष एस सी,एसटी आहे.पण संघटना युनियन भाजपा शिवसेना पक्षांच्या विचारांच्या आहेत. अनेक वरिष्ठांना जेष्टना आवर्जून भेटी घेतल्या याबाबत माहिती घेतली असता. त्यांचे म्हणणे समाजाला नेतृत्व चांगले मिळाले नाही. गावकी भावकीच्या पलीकडे कोणत्याही संघटना नाही. त्यातील संघर्ष मूळ समस्या पेक्षा भयंकर आहे. इतिहास वाचला तर इतिहास घडविला येतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याचे सांगितल्या जाते.
स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे काय ?. अजून समजलेच नाही. मी १९८२ पासून असंघटित नाका कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी किर्याशील कार्यकर्ता म्हणून काम करतो.विजय सातपुते यांच्यामुळेच विचार करण्याची पद्धत बदलली.वाचन अभ्यास असल्या शिवाय परीक्षा देता येत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याग,कष्ट आणि जिद्द लागते. आईच्या पोटातून लीडर जन्माला येत नाहीत. ते घडवावे लागतात.दगडाला खूप घाव सोसावे लागतात तेव्हाच त्याच दगडाची मूर्ती आकार घेते त्याला देव समजल्या जाते.
लीडर बनण्यासाठी संघटन,वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल आत्मसात करून घ्यावे लागते,एका दिवसात,महिन्यात, वर्षात ते आत्मसात होत नाही. लीडर मध्ये काही गुण असणे आवश्यक असतात. ते कार्यातून कृतीतून दिसतात.त्यांची चर्चा होत असते. त्यामुळेच तो लीडर म्हणून ओळख निर्माण करतो.काय पाहिजे लीडर बनण्यासाठी?.वाचा आणि विचार करा.
१) दूरदृष्टी (vision) लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते.२) ध्येयनिश्चिती (Goals) लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत.३) आत्मविश्वास (Self Confidence) ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते. ४) अनुशासन (Discipline) एक चांगला लीडर एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे. ५) चिकाटी (Persistance) कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते.
६) नियोजन (Planning) नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते. ७) योग्य निर्णय (ProperJudgement) लीडरला सर्वांची बाजू ऐकून,सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे.८) धैर्य (Patience) नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी 
अंमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते.९) जबाबदारी स्वीकारणे (Accept Responsibilities) नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते. १०) बदलाचा स्वीकार (Accept  changes) बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना,आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे. ११) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा (Be A Coach & Guide) प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे.प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे. १२) आकर्षक व्यक्तिमत्व (Pleasing Personality)
एक लीडर म्हणून तुमच्यावर,तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद व संपर्क पाहिजे.१३) प्रशासनिक कौशल्य (administrative skills) एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे. १४) संभाषण कौशल्य (Communication skills) एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे संभाषण कौशल्याची क्षमता.१५) निर्णय घेण्याची कला (Decision making ability) एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे.१६) जोखीम घेण्याची क्षमता  (Risk Taking Ability) नेतृत्व करताना धैर्याबरोबरच जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे. १७) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक  (Creativity and Innovation) हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत. १८) समस्या सोडविण्याचे कौशल्य  (problem solving skills) खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच.१९) लवचिक आणि अनुकूल क्षमता  (Flexibility And Adaptability) लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे.२०) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य (Time Management Skills) लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे.२१) लोकांना प्रोत्साहित करा ( Motivate People)
लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.२२) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे.  (Lead By Example) कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी.२३) टीम प्लेयर्स व्हा ( Be Team Players) लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.
संघटनेचे महत्व आपण हातांच्या बोटासारखे राहिले पाहिजे. कोणतेही बोट दुसऱ्या बोटासारखे नसते ' पण तरीही एखादी वस्तु उचलताना ती बोटे एकत्र येतात. पांच बोटे चौदा कांडे एकत्र आले तर ती हजारो कामे करतात. कारण एकत्र आल्यावर ती फक्त बोटे कांडे राहत नाहीत तर एक संघटीत मुठ बनते. ही मुठचं एक शक्ती होऊ शकते. अन् वेळप्रसंगी ठोसा देऊन आलेल्या प्रसंगावर मात करू शकते. बोटे म्हणजे माणसे अन् मुठ म्हणजे संघटना.त्याचे जो नेतृत्व करतो तो असतो लीडर. म्हणजे जी शक्ती एका माणसात नाही ती संघटनेत आहे.ती कुठे,कधी कशी वापरावी याचे ज्याला ज्ञान असते तोच खरा लीडर असतो. म्हणुनच एकतेचे, संघटनेचे, महत्व लक्षात घेऊन सर्वांनी संघटीत राहीले पाहिजे.आणि लीडरशिप तयार केली पाहिजे. कोणती संस्था, संघटना वन मॅन शो नसावी म्हणून दोन,तीन किंवा पांच वर्षांनी निवडणूका होत असतात. तो नियम सर्वांना सारखा असतो. म्हणूनच आईच्या पोटातून लीडर जन्माला येत नाहीत. ते घडवावे लागतात.हा प्रत्येक संस्था, संघटना, युनियन,पक्षांना नियम लागू असतो.जे यानियमांचे पालनकरतो तोच यशस्वी होत असते. म्हणूनच स्वतंत्र मजदूर युनियन ही क्रांतिकारी विचारांची आंबेडकरी कामगार चळवळ राष्ट्रीय पातळीवर उभी राहतांना दिसत आहे.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,
अध्यक्ष:-स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?.

 मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?.

महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत मराठी माणसाचे व मराठीचे भाषेचे ह्रदय सम्राट यांनी त्यांच्या मनसे सैनिकाकडून मराठी भाषा दिन खूप उत्स्फूर्तपणे रोडवर स्टेज बांधून साजरा केला गेला . काहींना त्यांचे खूप कौतुक वाटले तर माझा सारख्यांना खूप दुःख वाटले.या भामट्यांना मराठी भाषा दिनाचे एवढयात मनापासून आदर असता तर यांनी मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडू दिला असत्या काय?. कारण या महानगरपालिकेच्या मराठी शाळेत बहुसंख्येने मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी माणसांची मूलमुलीच शिकत होती नां!.परंतु ती संपूर्ण मराठा,मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी होते म्हणून यांनी महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. बाकीच्या वेळी कानाखाली खाल्ल्याळ खटाक आवाज काढणारे मानसिक वैचारिक गुलाम सैनिक मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या मराठी शाळा बंद केल्या तेव्हा कोणत्या बिळात बंद होते. हे जाहीरपणे विचारण्याची हिंमत मुंबईत मराठी माणसात, पत्रकार,संपादक राहिली आहे काय?.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्यात येत आहेत. आणि गांवागांवात इंग्रजी माध्यमाच्या प्री प्रायमेरी के जी,सिनियर के जी शाळा भांडवलदारी उद्योग सुरू करण्यात आले आहेत.ते माय मराठी भाषा व माणसाला मारून इंग्रजी भाषेच्या मॉमचे गोड कौतुक करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील मातृभाषा मराठी गुन्हेगार ठरविली जात आहे. यांची जाणीव मराठी भाषा व मराठी माणसाच्या ह्रदय सम्राटांना त्यांचे मनसे सैनिकांना नाही काय?.की जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
साडेतीन टक्के लोक जी तथाकथित प्रमाण मराठी भाषा बोलतात त्या भाषेने अस्सल मराठी बोली भाषेला जवळजवळ संपवलेच आहे. पाठ्यपुस्तकांतील प्रमाण भाषेमुळे वर्‍हाडी, झाडी, अहीराणी, माणदेशी, नागपूरी, कोष्टी, वंजारी भाषेसह तर अनेक बोलीभाषा आता केवळ घराच्या भिंतीआड बोलल्या जाणाऱ्या भाषा तेवढ्या शिल्लक आहेत. त्याचं बोली भाषेत सर्वांसमोर बोलले तर यांचं मराठी भाषा दिनाचे गोडवे गाणाऱ्यांच्या तोडून त्याला गावठी म्हटल्या जाते.तरीही आम्हाला ब्राह्मणी प्रमाण मराठी भाषेचा अभिमान बाळगायला सांगितले जाते.असे सांगणाऱ्या सर्व राजकारण्यांची,सनातन्यांची मुले मात्र विदेशात शिकत आहेत.
    महाराष्ट्रात मुंबई,पुणे, नाशिक, मनमाड,औरंगाबाद नागपूर जिथे जिथे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जेव्हा जेव्हा शाळा, कॉलेजच्या विरोधात आंदोलने झाली तेव्हा तेव्हा तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे आली.मराठी भाषा असणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना राज्य व केंद्रांच्या शैक्षणिक सवलती बंद करण्यात आल्यावर तेव्हा मराठी भाषा दिनाचे गर्व सांगणारे मराठी ह्रदय सम्राट त्यांच्या संघटना आणि यांचे वैचारिक गुलाम सैनिक मराठी भाषा असणाऱ्या मराठा,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सोबत उभे राहिले नाही.मुंबई, पुणे,औरंगाबाद, नागपूर नाशिक येथे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वागणूक दिली जाते. यांचा कधी कोणी विचार केला आहे काय?.मराठी भाषा बोलण्यात आणि लिहण्यात फरक असला की ग्रामीण भागातील विद्यार्थी नापास होतो.कारण पेपर तपासणारे शुद्ध मराठी बोलणारे असतात.

 मराठी भाषा गौरव दिन व राज्यभाषा मराठी दिन 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४'नुसार महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी १९१२ जन्म झाला होता.यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस  "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी रोजी घेण्यात आला.
मराठी राजभाषा दिन,मराठी दिन हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा आणि मराठी माणसावर प्रेम व्यक्त करण्याची यांची पद्धत समजून घेतले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा हे कुसुमाग्रजांच्या जन्म पासून झाली. ते सर्व देश मान्य करतो मग महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती यांची जन्म तारीख तीस बत्तीस वर्षांनी इतिहास संशोधक विचारवंत्यांच्या समितीनी १९ फेब्रुवारी हीच रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता तो अजूनही मराठी भाषा आणि माणसांचे हृदय सम्राट आणि त्यांचे वैचारिक गुलाम सैनिक शासन निर्णय मान्य का करीत नाही.

 छत्रपती शिवाजी महाराज मराठी नव्हते काय?.त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.त्यांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, जेधे,जवळकर हे मराठी माणसं नव्हते त्यांची भाषा मराठी नव्हती?. राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ पंजाबराव देशमुख हे मराठी माणसं नव्हती काय?.त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले असे खूप गौरवाने सांगितले जाते. त्यांनी आपल्या मातृभाषेला गौरव प्राप्त करून दिला असे म्हटले जाते.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात मराठी मातृभाषा वापरल्या जात होती असे इतिहास सांगतो.आणि सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आज ते सत्य मराठी भाषा वापरात होती हे मान्य करतात.

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियात छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा व गिरणी कामगारांच्या जीवनावरील "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते कायली" लावणी किंवा फकडं कोणत्या भाषेत गायिली होती.शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर,शाहीर साबळे संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह आंदोलने यात जनजागृती करणारी भाषा मराठीच होती. व प्रबोधनकार ठाकरे यांची भाषा मराठीच होती म्हणजे मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?.खरा इतिहास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.महाराष्ट्र राज्य व मराठी,मराठी भाषा आणि मराठी माणूस जातीमुळे गौरविण्यात येतो. आता तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाने जागे झाले पाहिजे,मराठी भाषा मराठी शाळा वाचल्या तर मराठी माणूस वाचेल अन्यता महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणूस उपरा ठरणार आहे.मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?.परप्रांतीय बिल्डर, ठेकेदार भांडवलदार यांना मदत करून आपल्याच घरादारावर जेसीबी चा नांगर फिरवतील.मराठी माणसा जागा हो छत्रपतीचा मावळा हो!.जात,धर्म,पंथ विसरून स्वराज्य निर्माण करण्याचा धागा हो.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई, 

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना, संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन.

Friday, February 26, 2021

 ऑन लाईन गोंधळ ऑफ लाईन दलाली 


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई असंघटित इमारत बांधकाम कामगारांसाठी  एकूण २८ योजना आहेत त्यात १) सामाजीक सुरक्षा ०९ योजना,२) शैक्षणिक योजना ०७, ३) आरोग्य विषयक ०६ योजना, ४) आर्थिक ०६ योजना,आहेेेत.
त्यापैकी प्रत्येक जिल्ह्यात कामगार सुरक्षा संच वाटप चालू आहेत.परंतु या सुरक्षा किट मुळे इमारत बांधकाम कामगारांना नियमितपणे काम मिळणार आहे काय?. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अंतर्गत होणाऱ्या बांधकामावर शासकीय ठेकेदार या नोंदणीकृत कामगारांना कामावर ठेवतील काय?. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत नगरपरिषद यांच्या कडे असलेल्या नोंदणीकृत ठेकेदाराकडे नोंदणीकृत कामगार आहेत काय?. त्यांची चौकशी का केल्या जात नाही?. त्यांना हा कायदा लागु नाही काय?. पाकीट मिळाले की कागदावर नोंदणीकृत कामगार दाखविल्या जातात.हे कुठेतरी थांबले पाहिजे त्यासाठी असंघटित कामगारांनी संघटित होऊन स्वतःच आवाज उठवला पाहिजे.इतर नेत्यांच्या भरोश्यावर बसला तर तो त्यांचे पोट भरण्यासाठी उपयोग करून घेईल.कामगारांनी प्रशिक्षित कार्यकर्ता बनून नेतृत्व केले पाहिजे.
इमारत बांधकाम कामगारांची दररोज कामाची जागा कामाचा प्रकार बदलत असतो. त्यामुळे मालक सुद्धा बदलत असतो. काम करत असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासकीय नोंदणीकृत ठेकेदारांची असतांना कामगारांना ही सुरक्षा संच किट शासन का देते?. काम देण्याची जबाबदारी शासन घेत नाही ते ठेकेदार ठरविणार.ठेकेदारांना काम देण्याची जबाबदारी शासनाची असेल तर कामगारांना सुरक्षा संच किट देण्याची जबाबदारी ठेकेदारांची का नाही?. उद्या काम करतांना अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?. शासकीय अधिकारी आणि ठेकेदार सरळ हातवर करून जबाबदारी टाळणार, सरकारने तुम्हाला असंघटित कामगारांना इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाने सुरक्षा किट दिली आहे,सुरक्षा किट वापरणे ही तुमची जबाबदारी आहे असे सांगणार.एकूण या सुरक्षा किटचा इमारत बांधकाम कामगारांना काय फायदा होणार आहे?.
काय काय आहे या किट मध्ये १) पत्रापेटी,२) सेफ्टीबूट, ३) सेफ्टी हेल्मेट, ४) सेफ्टीबेल्ट,५) सेफ्टीजॅकेट, ६) हॅन्डक्लोज,७) कानातले हेड फोन,८) तोंडाला मास्क ,९) शाळेची बॅग,१०) टिप्पीन, ११)पाणी बाटली ,१२) चटई,१३) मच्छरदाणी,१४) बॅटरी.= एकूण १४ वस्तू आहेत.
सरकार कडून काही तरी फुकट मिळते त्यासाठी हजार पंधराशे रुपये खर्च करून नांव नोंदणी करायची यात अधिकारी आणि दलालांचा फायदा होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात बोगस कामगारांची नांव नोंदणी केली जात आहे. जे खरे बांधकाम धंद्यातील कामगार आहेत त्यांनी  यांचा गांभीर्याने विचार करून अधिकारी, दलाल व बोगस कामगारांना उगडे नागडे केले पाहिजे. यासाठी वैचारिक विचाराचा वारसा असणारी संघटना आणि नेतृत्व असले पाहिजे. केवळ कमिशन मिळविण्यासाठी शासकीय अधिकारी, दलाल आणि काही पोटभरू संघटना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यातुन असंघटित इमारत बांधकाम कामगारांना काय फायदा होणार आहे यादृष्टीने विचार झाला पाहिजे. नियमितपणे कामे मिळणे आवश्यक आहे, पर राज्यातील कामगार येथे येऊन कमी मजुरीवर काम करणार आणि त्यांचा मोठा फटका स्थानिक पातळीवरील कामगारांना बसत आहे. म्हणूनच असंघटित इमारत बांधकाम कामगार,नाका कामगारांची रीतसर नांव नोंदणी केली जात नाही. त्यांचा फटका लाखो कामगारांना बसत आहे.
असंघटित नाका कामगार स्वता नांव नोंदणी करण्यासाठी जात नाही, संघटनेचे कार्यकर्ते गेले तर त्यांना कामगार आणण्याचे सांगितले जाते. आणि कामगार स्वता आला तर प्रत्येक कागदात त्रुटी काढल्या जाते.त्यांना सांगणार सोमवारी या आणि सोमवारी गेला तर साहेब दोन दिवस नाही गुरुवारी चकर मारा.तुझे काम आहे पेपर ओ के करून घेणे!. साहेबांची सही सर्वात शेवटी असणारनां!. असे कामगार बोलला तर ते आम्हाला शिकू नका.काय करायचे करून घ्या.असा सरळ दम दिला जातो. प्रशांत रामटेके यांच्या गंवडी कामगार संघटनेने वर्धाला मोर्चा काढला, अमरावतीला उपोषण केले ,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, वाशीम अकोला,अशा अनेक जिल्ह्यात अनेक संघटनांनी धरणे,उपोषण केले.कॉम्रेड शंकर पुजारी यांनी पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत अनेक लक्षवेधी आंदोलने केली.राजकुमार होळीकर, अण्णाराव सूर्यवंशी यांनी लातूर जिल्ह्यात अनेक मोर्चे,आंदोलने केली. दिनकर निकम, प्रशांत मेश्राम यांनी अकोल्यात मोर्चे आंदोलने केली. सिध्दार्थ रोटे,पांडुरंग हिवाळे यांनी जालन्यात संघर्ष सुरू केला.
वाडी नागपूर च्या गौरीबाईनी किती वेळा वीस पंचवीस महिलांना सोबत घेऊन नागपूर कार्यालयात अधिकारी व दलालच्या विरोधात संघर्ष केला. रामटेक,मनसरच्या कामगारांनी हिंगणा येथे शिबिरात आमदार खासदार यांच्या उपस्थितीत ३९० अर्ज भरून दिले, नागपूर कार्यालयातून एक महिन्याने सुमित,चंद्रभान सिंगला सांगितले अर्जात त्रुटी आहेत त्या दूर करून आणा,काय त्रुटी आहेत, ग्रामसेवकाने जावक नंबर त्याच्या रबर स्टँप मध्ये लिहला आहे.तो या ठिकाणी पाहिजे.सही चुकीच्या ठिकाणी केली.पत्ता चुकीचा पद्धतीने लिहला,सर्व अर्ज परत भरून दिल्यावर सांगितले की आमदारांनी तुमच्या संघटनेचे अर्ज घेण्यासाठी मनाई केली. पहिलाच हातावर पोट भरण्यासाठी कामाच्या शोधात असणाऱ्या या कामगारांनी कोणा कोणाच्या विरोधात संघर्ष करावा हाच मोठा प्रश्न आहे.ऑन लाईन गोंधळ ऑफ लाईन दलाली असे काही ठिकाणी समीकरण झाले आहे.

कोरोना काळात नूतनीकरण झाले नाही त्यांना नवीन नोंदणी करायला सांगत आहेत आणि नवीन नोंदणी करायला गेले तर जुना रजिस्ट्रेशन नंबर मागत आहेत जर त्यांचे नूतनीकरण केले तर चालू रीनिवल पावती मागत आहेत. कितीही योग्य online नोंदणी अर्ज भरा, त्रुटी काढल्या जात आहेत.एका गुत्तेदाराणे दहा पेक्षा जास्त सही शिक्के दिले तर त्याला गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली जात आहे.असे आनंद भालेराव उस्मानाबाद यांनी ग्रुपवर अनुभव लिहून पाठविले.इस्लामपूरच्या अहमद मुंडे यांनी सुरक्षा संच घेतलेल्या कामगारांची चौकशी करावी गरजु कामगारांना सुरक्षा संच चे वाटप करा अशी मागणी केली आहे. 
कामगारांना फोन नंबर अवश्यक आहे. नसेल तर नोंदणी होत नाही.Online केल्यानंतर कामगाराला ऑफिस मध्ये बोलाऊन तीन चार कर्मचारी उलट सुलट प्रश्न विचारतात, व त्यांना अरेरावीची भाषा वापरत आहेत आणि सलग तीन वेळा ऑफिस मध्ये बोलावल्या जाते. त्यामुळे शंभर दीडशे किलोमीटर वरून काम बंद करून कामगारांना यावे लागते त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास जाणूनबुजून दिला जात आहे. महिला असेल तर मुद्दाम चार वेळेस फोन करत विचारतात तू काय काम करते?. याबाबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोन केला तर तू काय लई मोठा लागून गेला का असे उत्तर मिळत आहेत. असे कामगार संघटनाच्या पदाधिकारी यांनी नांव न सांगण्याच्या अटी वर सांगितले.ऑन लाईन गोंधळ ऑफ लाईन दलाली सुरू आहे.
एक फॉर्म पाच वेळेस अपडेट करावा लागत आहे कारण प्रत्येक वेळी नवीन त्रुटी काढत आहेत एकच वेळी सर्व त्रुटी काढत नाहीत, इंग्रजी मध्ये फॉर्म भरताना मराठीमध्ये नाव वेगळेच येत आहे. त्यामुळे नंतर लाभ घेतांना चुका काढल्या जाऊ शकतात. त्यासाठी एक स्मार्ट कार्ड देत आहे. सुमन तरसिंग जाधव, कार्ड वर लिहले सुमन "तरशिंग" जाधव जिल्हा आहे नांदेड लिहला आहे "नंदेड" अशा अनेक समस्या online नोंदणी साठी येत आहेत. यांची जबाबदारी कोणी घेत नाही. कार्ड वर पत्ता आहे मुंबई सचिव,मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आणि देणारे आहेत जिल्ह्यातील बी ओ सी वाले असे अनुभव प्रत्येक जिल्ह्यातून येत आहेत. ऑन लाईन गोंधळ ऑफ लाईन दलाली बंद केली पाहिजे.
कोणती संघटना राज्यव्यापी नाही प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या विचारांच्या पक्षाच्या संघटना स्थानिक पातळीवर किर्याशील आहेत.त्यामुळेच कोणाची ही फारशी दखल घेतली जात नाही. मुंबईत प्रत्येकाला गोड बोलून उत्तरे दिली जातात. यासाठी लवकरच महाराष्ट्रातील सर्व शिव,फुले,शाहु, आंबेडकरी विचारांच्या संघटना प्रमुख पदाधिकारी यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यात अनेक मुद्द्यावर राज्यव्यापी चर्चा करण्यात येईल.त्यात असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी सहभागी झाले पाहिजे.असे या लेखा द्वारे मी आवाहन करतो.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई.
अध्यक्ष :- सत्यशोधक कामगार संघटना
संलग्न :- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

सत्ताधारी शिवसेना आणि शिवजयंती? सत्ताधारी शिवसेना आणि शिवजयंती?

 सत्ताधारी शिवसेना आणि शिवजयंती? सत्ताधारी शिवसेना आणि शिवजयंती?  

भारत हा विविध जातीधर्माच्या लोक समूहाचा देश आहे,प्रत्येकाची जात,धर्म,भाषा वेशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समान न्याय मिळत असतो.ज्यांना भारतीय राज्य घटना "संविधान" मान्य नाही ते वेळोवेळी मनुस्मृती नुसार आचरण करून देशाच्या सार्वभौम धर्मनिरपेक्षतेलाचा आव्हान देण्यासाठी उभे राहतात.यांचे उत्तम उदाहरण म्हणजेच तिथी नुसार शिवजयंती व सत्यनारायण महापूजा आहे.आता काल पर्यत तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी शिवसेना आता लोकशाही मार्गाने सत्ताधारी झाली आहे.त्यामुळेच त्यांच्या शिवसैनिकासाठी शिवजयंती मोठे धर्म संकट झाले आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडविणे समाजात तेढ निर्माण होईल असा कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे कलम १४२ ते १५२ नुसार गुन्हा आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या घटनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत आले आहे.ती धर्मनिरपेक्ष,निःपक्षपाती निर्भीड पणे कायद्याची अंमलबजावणी करीत नाही हे यावरून सिद्ध होत असते. शिवजयंती साजरी करणारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणत्याही आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिथी नुसार जयंती साजरी करत नाही.म्हणूनच तिथी नुसार शिवजयंती म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक हे मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी साजरी केली जाते व सत्यनारायण महापूजा घातली जाते.
 शिवाजी महाराजाच्या नांवाचा व्यापार करून काही संघटना राज्यात सत्ताधारी झाल्या पण त्यांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर्श कधीच घेतला नाही,केवळ नांवा पुरती प्रतिमा आणि मूर्तीचा वापर केला.शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या समर्थनात आपली शक्ती खर्च केली. त्याचं पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद बुद्धिजीवी विचारवंत्यांच्या समितीने सोडविल्या वर ही आपली भूमिका त्यांनी सोडली नाही. त्यामुळे राज्यात शिवरायांचे मावळे कमी आणि कावळे जास्त झाले.म्हणून त्यानी जयंती बाबत ही समाजात गैरसमज कसे निर्माण होतील यांची जास्त काळजी त्यांनी घेतली. आता सत्ताधारी शिवसेना आणि त्यांचे शिवसैनिक शिवजयंती कशी साजरी करणार?. वैचारिक वारसा सांगणार की मनुवादी विचार हे खूप महत्वाचे ठरणार आहे.

राज्यात शाळा,कॉलेजात विद्यार्थीदसे पासूनच त्यांना अभ्यासक्रमात एक आणि बाहेरच्या जगात एक शिवाजी महाराज शिकविला जातो,त्यामुळेच जय शिवाजी,जय भवानी ह्या घोषणा डोक्यात फिट बसल्या आहेत. त्या कशासाठी दिल्या जातात ते ठळकपणे दिसते. त्यांना कोणता शिवाजी अभिप्रेत आहे हे दरवर्षी ते कायद्याला आव्हान देऊन दाखवून देतात. परंतु आता सत्ताधारी शिवसेना आणि शिवसैनिकासमोर शिवजयंती धर्म संकट आहे.
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी १८६९ साली रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठया धुमधडाक्यात सुरु झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.म्हणून ही तिथी नुसार शिवजयंती सन्मान आहे की अपमान?. हे काही मराठ्यांना ओबीसीनां आज ही कळत नाही. ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधना पासुन अजूनही सुरक्षित अंतरावर मानसिक गुलाम म्हणून उभे आहेत.

इतिहास सांगतो शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्यालाा पेशवाईचे समर्थन होते.म्हणुन ब्राह्मणांचे जेष्ठपुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात शिवजयंती बाबत संभ्रम निर्माण केला.आणि करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण होते.पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल. ख-या शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त मावळे निर्माण होतील, हे रोखण्यासाठी ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1) वा.सी.बेंद्रे, 2) न.र.फाटक 3) ग.ह.खरे, 4) द.वा. पोतदार, 5) डॉ.आप्पासाहेब पवार, 6) ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली.वादग्रस्त बाबीं साठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग बापट आयोग.सराफ आयोग किती तरी आयोग आहेत.त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली.
इतिहास तज्ञा बुद्धिजीवी विचारवंताला या कामाला २ वर्ष लागतात, तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लावले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता कि नाही?.

यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.१९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या.या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका होती. जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी 1) पुरंदरे, 2) बेडेकर, 3) मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली.
शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध झाले.
1) जयंत साळगांवकर, 2) पुरंदरे, 3) बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह धरून आपला ब्राम्हणी कावा दाखविला,त्यामुळे बाळ कडू आणि बाळकडू पिलेले कावळे जोमाने कामाला लागले,शासन प्रशासनाने दिलेले निर्णय आम्ही मानत नाही हे दाखवून दिले,खरे तर लोकशाहीच्या चौकटीत यांच्या वर राष्टपुरुषाचा अवमान केला म्हणुन देशदोहाचा गुन्हा दाखल होऊ शकला असता,पण राज्यकर्ते मनुवादी हिंदुत्व मानणारे असल्यामुळे कोणीच कोणावर कारवाई केली नाही,


शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला आहे. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले. अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय? तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना होती. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा ब्राम्हणी कावा आहे.
इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात. ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. मग तिथी प्रमाणे वाद कायम का राहतो ?. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.शिवाजीराजे जर,राष्ट्रपुरुष, युगपुरुष आहेत.तर तिथीत अडकविण्या इतके राजे लहान का करता?. यावर शिवसेनेने कधी 
ठाम वैचारिक भूमिका घेतली नाही.

शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकर यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.कारण तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. सत्यनारायण महापूजा म्हणजेच भटजीची रोजगार हमी आली व ती चालावी या करीतच हा वाद आहे, तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.त्यामुळे कावळे आणि मावळे संघर्ष अटळ आहे.सूर्याजी पिसाळ आणि लांजाचा पाटील प्रत्येक गावांत पक्षात भेटेल. तो शिवसेना भाजपाचाच असेलचं असे नाही.

शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर, बुद्ध, महात्मा फुले, शाहूू महाराज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का? कारण त्यांचा समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करत नाहीत.मग शिवरायांचे मावळे कोण?. शिवसैनिक कोण?. शिवचरित्रावर विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते.यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा होता व आज ही आहे. सत्ताधारी शिवसेना आणि  शिवजयंती हा आता नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

म्हणूनच बाळकडू पिलेले जेजे कावळे आहेत ते शिवजयंती निमित्ताने सत्यनारायण महापूजा ठेवतात.ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सन्मान करण्यासाठी नव्हे तर मनुस्मृती नुसार शूद्र राजाने शौर्य दाखवुन स्वराज निर्माण करून बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून दिला यांचा बदला म्हणून अवतारी पुरुष बनविले.शिवसेना आणि त्यांच्या शिवसैनिकांनी या विरोधात कधी आवाज उठवला काय?. उलट महाराष्ट्रातील मराठा समाजाला शिवसैनिकांना न घाबरत जाहीरपणे समर्थन केले. छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा आशीर्वाद होता त्यामुळेच त्यांनी लढाया जिंकल्या असा भ्रम निर्माण केल्या जातो.त्याकरिता सत्यनारायण महापूजा घातली जाते. पण हे करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कोणत्या गड किल्ल्यावर सत्यनारायण महापूजा घातल्याचा इतिहास आहे काय?. मग तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी ही मंडळी महाराजांचा सन्मान करीत नसुन घोर अपमान करीत असतात. हे कधी लक्षात येईल?.

2 Attachments