संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक
Thursday, December 23, 2021
संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक
Monday, December 20, 2021
स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे?.
स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे?. अमेरिकेत देव नाही,ना मठ नाही,पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही.कुठले होमहवन नाही,ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही,ना अनुष्ठानं नाही.हरिनाम सप्ताह नाही,ना पारायणे नाहीत.अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत,कशाचीच कमतरता नाही.माणशी 2876 वृक्ष आहेत.भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत. आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे असे म्हटल्या जाते.पण एकही भारतीय झाड लावत नाही.विशेष उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा आणि त्या झाडा जपत सुद्धा नाहीत.अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं एक ही घर किंवा बंगला दिसणार नाही. त्यांनी स्मार्ट मोबाईल वापर करून जग जवळ आणले आहे भारतात बहुसंख्ये लोकांच्या दारात झाड नाही.तर फार हिरवळ कुठली?.स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली.साधं पिण्याच शुद्ध पाणी देवू शकत नाही.सर्वच देवाच्या भरोशावर आणि सरकारच्या मर्जीवर अवलंबून. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे.आणि लोकसंख्या आहे 31 कोटी. तर भारताची आहे 135 कोटी.35 कोटीची 135 कोटी झाली. फक्त 80 वर्षात.एवढीच जबरदस्त प्रगती आहे. इथे हजारो जाती,सतराशे साठ धर्म. कुणाचाच मेळ नाही.प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा.आणि तरी योग्य वेळी सर्वच म्हणतात "गर्वसे कहो हम हिंदू है!." आणि देवाच्या आरत्या स्मार्ट मोबाईलवर होत आहेत. एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले.तरी एकएकाला 4-5 लेकरं.कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर,ना शिक्षण ना संस्कार.ना आचार, ना शिस्त, सगळं बिनधास्त. आणी मस्त. आताच पिण्यास पाणी नाही. तर पुढे काय?. कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही.निसर्गाची चाड नाही.नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत. तेहतीस कोटी देवाचे नांव घेऊन प्रार्थना केल्या जात आहेत.ईश्वराशिवाय कुणी महान नाही.हे ऐकुण ऐकुण हजारो वर्ष झाली.दरवर्षी तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही.शेतकरी पाऊस पडला तरी आत्महत्या करतो. नाही पडला तरी आत्महत्या करतो. सगळंयाना आरक्षण पाहीजे म्हणता म्हणता आरक्षण शंभर टक्के होण्याची वेळ आली. तरीही काही मिळनार नाही. वित्तमंत्री सितारामन यांनी संसदेत सांगीतले देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या,सहाकोटी लोक बेरोजगार झाले. नोकरयांच नाही.तर आरक्षण घेवून काय चाटायचे. आता नोक-याच बंद होत आहेत.आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची ताकद नाही.मॅचच फिक्स असेल.तर खेळायचेच कशाला.जनता दिशाहीन झाली आहे.स्वप्न राखेत मिसळली आहेत.संविधान नावांला उरले आहे.प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे.तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवतच आहे.दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे.जनतेला लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे.तीस टक्के लोकांना रक्तदाब आहे. शेतात काम करायला मजूर नाही. अंगमेहनतीला माणुस नाही.सगळे बिनकामाची माणसं आहेत.गावा गावात स्मार्ट मोबाईलमुळे जग जवळ येत आहे नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत.स्वयंपाकाला बाई,भांडी व धुण्याला बाई.तरी मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे.आणि साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही. कुंभ मेळ्यात दहा हजार सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली.आणि आता रस्त्यावर भटकत आहेत.विरक्त झाले आहेत.लग्नाचे वय टळून गेले आहे.बायका मिळत नाहीत.गांवागावांत किमान चाळीस पन्नास पोरं पोरी बिन लग्नाची आहेत.भयंकर विदारक परिस्थिती आहे.स्मार्ट मोबाईलवर मैत्री जुळते आणि तुटते त्यामुळे जग जवळ येत आहे बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत. मराठी शाळा बंद पडल्या आहेत.मुलांना धड इंग्रजी येत नाही.आणि मराठी येत नाही.मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहेत.टिव्ही वरच्या मालिका फालतू झाल्या आहेत.महिला गुन्हेगारी वृत्तीच्या जास्त दाखवत आहे.मुलं लहान पणा पासूनच हिसंक होत आहेत.13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत.सरकारने कायदा काढला होता,१८ वर्षा नंतर लग्न झाले पाहिजे.आता त्यात बदल करून मुलामुलीचे लग्नाचे वय २१ वर्षे केले.मुलमुली १४/१५ वर्षाची झाली की लग्ना नंतर जे करायला पाहिजे ते सर्व अगोदर करून मोकळे होत आहेत.त्यामुळे आईवडील भावांना जातीची खानदानची इज्जत गेल्याचे वाटून खून करण्यात येत आहे.कायदे अनेक आहेत पण अंमलबजावणी प्रभावीपणे नाही. कारण स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे. दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत.ती घेणे प्रतिष्ठेची झाली आहे.आणि प्रार्थना स्थळे बहुजन समाजाला लुटीची ठिकाणं झाली आहेत.वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत.तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.आईला बाळासाठी वेळ नाही.पाळणाघरे वाढत आहेत. लेका-सुनांना सासुसासरे नकोत.अनाथालये वाढत आहेत. माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत.खोटं बोलणच खरं मानलं जात आहे.चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे. सज्जनांना वेड्यात काढत आहेत.लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य हे फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित झाली आहे.चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत. प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.तरी आज काही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत.तर काही सुना सासु सासऱ्यांना घराबाहेर काढत आहेत.समाज व समाजातील वरिष्ठ नागरिक मजा पाहत आहेत.समाजाची भिती राहिल्या नसल्यामुळे लोकलज्जा राहिली नाही.एकंदरीत भारत विस्फोटाच्या व उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे.भारत मानवी वस्तीसाठी धोकादायक होत चालला आहे.वेळीच सावरलो नाही.तर आपल्या वारसांचे जीवन प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडनार आहे.हे मात्र नक्की.स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे तर नातेवाहिक दूर जात आहेत. संकलन :- सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई. |
Friday, December 17, 2021
ओबीसी भक्तांची करोडपती मंदिरे
ओबीसी भक्तांची करोडपती मंदिरे
कामगार,शेतकरी मेला तरी चालेल उद्योगपती,पुजारी जगला पाहिजे
कामगार,शेतकरी मेला तरी चालेल उद्योगपती,पुजारी जगला पाहिजे
भारतातील कामगारंची आणि शेतकऱ्याची फार वाईट परिस्थिती आहे.आई जेवण घालत नाही.आणि बाप भीक मागु देत नाही.मायबाप सरकारच काय करावे याचा मोठ्ठा पेच पडलाय कामगारांना व शेतकऱ्यांना! काँग्रेस हे भांडवदाराचे सरकार आहे.ते गोरगरीब शेतकऱ्याला मजुरांना सुखाने जगू देत नाही.यांना सत्तेतुन घालविल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही.हे बेबीच्या देठा पासुन ओरडुन सांगणारे राज्यातील देवेन्द्र फडणवीस साहेब आणि देशभर शेपन्न इंच छाती फुगवुन सांगणारे नरेंद्र मोदी साहेब यांना आता काय कठीण वाटत आहे ते देशातील तमाम कामगार कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना समजण्या पलीकडे झाले आहे.तेव्हा काँग्रेस ही काही भाजप शिवसेने सारखी ज्वलंत हिंदुत्व वादी नव्हती. सर्वधर्म समभाव मानणारी होती.म्हणुन शेतकऱ्याची कृषीउत्पन्न बाजार समितीत हिंदुत्ववादी शेतकऱ्यांची प्रचंड लुटमारी होत होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्जाचा डोंगर कमी होण्या ऐवजी वाढत होता.तेव्हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी गर्वसे कहो म्हणणारे तालुका,जिल्हा सिंह गर्जना करून हालवून ठेवत होते.आता त्यांना मंदिराबाहेर हिंदुत्ववादी शेतकरी,कर्जबाजारी शेतकरी दिसत नाही.त्यामुळे दुष्काळ जाहीर करायचा प्रश्नच उद्धभवत नाही.तेव्हा विहिरींना पाणी नव्हते.आता पाणीच पाणी आहे विहीरीला, तेव्हा लाईट नव्हती आणि लाईटबील मात्र वेळेवर येत होतो. आता भरपूर लाईट आहे.त्यामुळे लाईटबिल वेळच्या वेळेला येत नाही.तेव्हा काँग्रेस सह सर्वच पक्षाच्या नेत्यांचे डोळे फुटले होत.कान बहिरे झाले होते.त्यांची वाचा गेली होती.कारण त्यांनी ज्वलंत हिंदुत्ववादी कामगारंचे व शेतकऱ्यांचे कोणतेच दुःख दिसत नव्हते.तेव्हा राज्य व केंद्र साकारलं पाझर फुटत नव्हता. आताचे राज्य आणि केंद्र सरकार किती दयाळू आहे पहा. किती गरीब कष्टकरी उधोगपतीनां कर्ज माफ केले.विजय मल्ल्या सारख्या गरीब माणसाला नऊ हजार करोड रुपये कर्ज बुडवून परदेशात गेला.काही केले नाही सरकार आणखी किती संस्कारीत माणस सत्ताधारी पाहिजे.शेतकऱ्यांना कर्ज देतांना सातबारा आणि ओळखीचे दोन जामीनदार लागतात.तेव्हा बँक अधिकारी कर्ज पास करता.मग विजय मल्ल्याला कर्ज देतांना कोणते कागद पत्र आणि जामीनदार घेतले?.ते ते सरकार आणि हे सरकार का नाही जाहीर करत?.हिंदुत्ववादी शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती जामीनदारांच्या नांवा सह वृत्तपत्रात जाहिरात देऊन जनतेला सांगितल्या जाते.मग हया बँक अधिकाऱ्यांच्या गुणवंत कर्तबदारीचे जाहीरपणे मूल्यमाफन का होत नाही.शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि गरीब उधोगपतीनां कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय का?.कोणाची जात धर्म आडवा येतो?.तिथे ज्वलंत हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय लागु होत नाही काय?.
सरकारकडे पैसा नाही शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला.पण भारतातील 400 रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय सेवा देण्यासाठी सरकारने गूगल सोबत साडेचार लाख कोटी रुपयांचा करार केला आहे.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला ७६ हजार कोटी नाहीत आणि वाय फाय साठी साडेचार लाख कोटी आहेत.
माणसाला जगायला "भाकरी " पाहिजे कि वाय फाय ?.
देशातील सर्व सरकारी नोकऱ्या हया नागरिकांची सेवा करण्यासाठी असतात.त्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या,कारखाने नाहीत.तरी त्यांना दरवर्षी महागाई भत्ता आणि इतर सवलती मिळतात.त्यांच्या कर्मचाऱ्यां करीता सातवा वेतन आयोग लागु होते.मग शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव का नाही?.शेतकऱ्यांच्या पिकाला महागाईची झळ पोचत नाही काय?.शेतकऱ्यांना बि,बियाने औषध, शेतमजूर यांच्या करीता पैसा कुठून येणार?.कृषिविभागतील सर्व दुकानदार, व्यापारी,अडते,दलाल यांना सर्व महागाईची झळ लागते.कृषीउत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारां न कडून माथाडी बोर्ड चाळीस,एकेचालीस टक्के लेव्ही कापुन घेते.त्यांचा त्याकामगारांना कोणताही फायदा मिळत नाही.त्यावर सर्व कर्मचारी,पुढारी कायम स्वरूपी मलिदा खातात.शेतकऱ्यांना जात,धर्म,प्रांत नसतो. पण राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यकर्ते,नेते यांना जात,धर्म,प्रांत असते.त्यावरच ते शेतकऱ्यांचे मतदान मिळवितात.तेव्हा त्यांना लाज कशी वाटत नाही.शेतकऱ्यांच्या मतदानावर निवडून यायला.ज्यांच्या मतदानावर निवडुन येतात आणि त्यांनाच सवलती देतांना हात मोडतात.पण कंपनी, कारखाने,बिल्डर्स यांचा टॅक्स माफ करता मेंदू आणि हात बरोबर काम करतात.
विरोधी पक्षात असतांना सत्तेच्या खुर्चीसाठी ओरडून सांगत होता, कामगार,कर्मचारी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.मग आता काय झालं तुमच्या डोक्यातील मेंदूला.आता त्यांची निर्णय क्षमता कोमात गेली काय?.हिंदुत्व,मराठी माणस, धार्मिक भावनिक साद घालून कामगार,कर्मचारी शेतकरी नेला स्वर्गात आणि सत्ता मिळविली.आघाडीचे सरकार एकमेकांना सारखे शिव्या शाप देत होते पण सत्ता सोडत नव्हते.ते कोणते ही हिंदुत्वाचे संस्कार नसलेले बोके होते.युतीच्या सरकारात तर पिवर हिंदुत्वाचे संस्कार झाले नेते आहेत.हे त्यांच्या पेक्षा जास्त भांडतात.पण कामगार,कर्मचारी शे
शेतकऱ्यांची शेतजमीन विकास करण्यासाठी घेता आणि उधोगपतीनां कवडी मोलाचे देता.त्यात तुम्ही मरे पर्यँत कमिशन खाणार आणि चार पिड्या बसुन खातीन एवढी संपत्ती गोळा करणार.शेतकऱ्यांची मुलं शेती गेल्यावर शहरात येऊन हाऊस पिकिंग किंवा वाचमन म्हणुन कायम असंघटीत कामगार म्हणुन काम करणार.या देशात देव देविका जागृत असत्या तर यांना त्यांनी कठोर शिक्षा केली असती.पण तेच भटा ब्राम्हणाच्या बौद्धिक कौशल्यामुळे दररोज बाजारात पांच रुपये किंमतीत विकल्या जात आहेत.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारे कामगार,कर्मचारी शे
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुबंई ९९२०४०३८५९.
