सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित
Friday, August 28, 2020
सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित
कोरोना आणि क्रिमीलेयर आगरी कोळी ओबीसी.
कोरोना आणि क्रिमीलेयर आगरी कोळी ओबीसी.
कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!
कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!
जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच 'नजरकैदेत' असताना आम्ही, सर्वच देव देवतांच्या जयंत्या, मेळावे, विवाह सोहळे, इतकेच काय मानवी जन्म आणि मृत्यूचे सारे सोहळे रद्द केले आहेत.. अंत्यत्ययात्रेतला 'शेवटचा' निरोप देतानाही शेकडो जणांना कोरोनाच्या मृत्युचे पॅकेज पाठीमागे देऊन गेलेली घटना आम्ही 'उरणकर' अनुभवतोय. म्हणूनच आता एकत्र येणे नकोच .. अगदी मयताच्या किंवा सांत्वन सोहळ्यासाठीही नको .. असे 'शहाणपण' अनुभवलेले आम्ही!वाढदिवस कसा साजरा करू शकतो?होय तरीही केला आम्ही साजरा एक वाढदिवस! तोही सोशल मीडियावर मुद्दाम, जाहीरपणे सांगण्यासारखा!*
*माझ्या बालपणात मी यात्रा जत्रा पालखी सोहळे, शेकडो सण उत्सव यातच मोठा झालो. दरवर्षी मोठ्या उत्साहात चैत्र पौर्णिमेला साजरी होणारी हनुमान जयंती, गणेशोत्सव, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती सोहळे, सत्यनारायण पूजा, हळदी लग्नसोहळे यांच्याबद्दल 2005 नंतर मात्र, मागे वळून पाहण्याचा सिंहावलोकन करण्याचा दुर्लभ क्षण माझ्या जीवनात आला.
अध्यक्ष:आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी
कोरोना काळात माणुसकी हरवत चालली आहे की काय?.
कोरोना काळात माणुसकी हरवत चालली आहे की काय?.
बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना
बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना
संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटात आहे,त्यामुळे सर्व उत्साहावर पाणी फिरले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची 129 वी जयंती जगभर उत्साहाने घरा घरात साजरी झाली.त्यांची गिनीज बुकवाल्यांना नोंद घ्यावी लागेल. कारण नेहमीच निळे वादळ ठरणारी भिम जयंती प्रथमच शांततेने साजरी झाली. दरवर्षी भिम जयंतीनिमित्त जाती व्यवस्था खेडया पाडयातच नव्हे तर शहरी भागात डोके वर काढण्याचा प्रयत्न करते.यावर्षी कोरोनामुळे काहीच घडले नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटालुन हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या.त्या पूर्ण पणे न स्विकारल्या मुले तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो.म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकार यांची १२९ वी जयंती असो या बुद्धाची (२०६५ वी ) जयंती असो आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झाला नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो.विचार आणि त्यानुसार आचरण नाही.
भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.तोच खरा धम्मोधर असतो.धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुले आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही.बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा या दोन महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारा वर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.याची आठवन आपल्याला अन्याय अत्याचार व हत्याकांड झाल्यावरच येते.बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही.ते म्हणतात संघ बडा बलवान संघ करेगा सबकी रक्षा क्यो की संघ बडा बलवान.
धर्मांतरीत आंबेडकारी समाज, संघ,संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही.म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.हे रिपब्लिकन आणि आंबेडकरी समाजाला कोण सांगेल?. आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते.युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेउन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील.तुम्हाला समता,स्वत्रंत, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल.केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?.
माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळी कोण सांगेल?. बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे.संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती.पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदा मुळे बंद असतात.
श्रीलंका,थायलंड,बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात.तिथे शिस्तबद्ध आचरणात सर्व व्यवहार होतात. एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणा साठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो.मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळी बौद्ध बांधवास बुद्ध जयंती निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना.हिच सर्वाना नम्र विनंती, आणि हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई
(विशेष सूचना लेख प्रसिद्ध केल्यास pdf माहितीसाठी इमेलवर पाठवावी हि नम्र विनंती )
कोरोना आणि उच्चवर्णीय आतंकवाद !
कोरोना आणि उच्चवर्णीय आतंकवाद !
कोरोना आणि बुद्धिमान भारतीय !
कोरोना आणि बुद्धिमान भारतीय !
कोरोना,अयोध्या आणि ओबीसी.
कोरोना,अयोध्या आणि ओबीसी.
हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.
हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.
सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली. कोणताही प्राणी हिंस झाला तर शांत राहत नाही.कुत्रा असो की हत्ती तो पिसाटतो पण या हत्तीणीने या ही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली.
शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने पाण्याबाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले. तिला वाट दाखवण्या करता, पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली. दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण ५ च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली. पोस्टमोर्टम मध्ये कळलं ती गर्भवती होती.
मोहन कृष्णन ने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला. माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता. तिला त्यांच्यावर माणसावर विश्वास ठेवावा वाटला नाही. तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं.
माणसाला माहित आहे त्यांचे बाळ बाहेर येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात. पण कोणत्या प्राण्याच्या बाळाला बाहेर येण्यासाठी किती महिने लागतात याची माहिती आहे काय?. वीस महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या?. तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती?. वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती?. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर संध्याकाळी सात नंतर दरवाजे बंद होत होते.तेव्हा बाराशे फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढुन गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाही तर प्राण्यांतील.
एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं त्या माणसाने?. ते कृत्य एका कोणी माणसांने केले.पण अख्खी मानव जात बदनाम करून गेली.मागासवर्गीय आदिवासी,अल्पसंख्याक आणि भटक्या जाती जमातीचे निर्दयपणे खून होतात तेव्हा ही कोणत्याही माणसांच्या जातीला दुख होत नाही.तेव्हा संपूर्ण गांव खून करणाऱ्या माणसाच्या जातीच्या पाठी मागे उभे राहते.खैरलांजी,जवखेडा,खेर्डा,