कोरोना आणि क्रिमीलेयर आगरी कोळी ओबीसी.
कोरोना या जागतिक महामारीमध्ये देशाचा बचाव व्हावा म्हणून अनपेक्षितपणे लादलेल्या लाॅकडाऊन वरचा सामान्य माणसांच्या मनात संशय वाढीस लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री म्हणून गुजरातमधील कारकीर्द ही अल्पसंख्याक मुस्लिम आणि ओबीसी एससी एसटी या हिंदूविरोधी होती. अर्थात भारतीय लोकशाहीला आणि संविधान विचारांना मारक होती. मनुस्मृतीच्या परंपरेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे हेच भाजपा सरकार दिल्लीत स्थिरावल्या नंतर मूळ गुजरात पॅटर्न हा नागपूरकर संघ विचारापेक्षा, पुणेरी पेशवाईस अधिक जवळचा आहे असे दिसू लागले होते. किंबहुना जे ब्राह्मण पेशव्यांना जमले नाही ते मोदी शहा हे मनुवादी वैश्य व्यापारी अधिक प्रभावीपणे करू लागले. त्यात मूळचे क्षत्रिय, भीष्म पितामह शरद पवार हे माझे गुरू आहेत हे सांगून मनुस्मृतीच्या आद्य प्रवर्तक ब्राह्मण पेशव्यांना शह देऊन मोदींनी क्षत्रिय वैश्य युती किती महाभयंकर कारस्थान करू शकते याचे मूर्त स्वरूप म्हणजे जनतेला विचारात न घेता, आणीबाणी स्वरूप लादलेले लाॅकडाऊन होय,
सोशल मीडियावरील कोरोना षड्यंत्र उघड होणारे असंख्य युक्तिवाद मोदींना थेट 'मूर्खात' काढत आहेत. मोदी मीडिया जेवढ्या आक्रमकपणे सरकारची बाजू मांडतोय त्यातील विकाऊ पत्रकारिता आता सर्वांच्याच नजरेतून उतरलीय. मनु प्रणित व्यापारी सरकार प्रशासन, मीडिया, विरोधीपक्ष, उद्योजक, न्याय यंत्रणा आणि पोलीस यांच्या मोदिवादी आर्थिक संगनमताने देशालाही विकू किंवा खरेदी करू शकते. वैश्य व्यापारी सत्ताधारी यांचा नफा, फायदा हाच नवा 'राष्ट्रवाद' झालाय. देशाला धोकादायक असलेल्या या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सत्ताधाऱ्यांबद्दल, समस्त ओबीसी एससी एसटी विजेएनटी यांचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच जागे केले होते.*
मासे पकडणा-या आणि विकणाऱ्या आगरी कोळी कराडी भंडारी महिलांना भरल्या बाजारात घोर अपमान करून हाकलून देणारे पोलीस, महानगर पालिका कर्मचारी ही बनिया मोदी आणि क्षत्रिय पवार युती आहे. एकीकडे साखर उद्योग वाचविण्यासाठी दिल्ली वारी करायची, उद्योगपती आणि उद्योग वाचविण्यासही प्रोत्साहन द्यायचे आणि मच्छीमारी रोजगार संपवायचा हे कोरोना आडून गरीब मागासवर्गीय माणूस मारण्याचे युद्ध आहे. देशात पाशवी सत्तेचा प्रचंड अनुभव पदरी बाळगणाऱ्या पवारांसारख्या अनेक क्षत्रिय नेत्यांना मोदींनी जवळ करून फडणवीस ब्राह्मणांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. अर्थात यात शेतमजूर कामगार स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांचे हाल पेशवाई पेक्षा जास्त वाईट होणार आहेत. हे साऱ्यांनाच समजून आलेय.
निंबाळकर हे आडनाव छत्रपतींच्या स्वराज्यात गाजलेले असले तरी ते मागासवर्गीय रयतेच्या लोककल्याणाचा मार्ग सोडून मागास पारधी समाज बांधवांचे खून पाडू शकते. कोरोनाच्या काळात जमिनी लाटण्यासाठी आक्रमक झालेला हा सरंजामी जमीनदारांचा धोका कोरोनापेक्षा भयंकर आहे, जीवघेणा आहे.मुबंईत वरळी माहीम हे कोळीवाडे आणि गावठाणे कोरोनासाठी मिडियाकडून बदनाम होत असताना तेथील जमिनी एसआरए प्रकल्पासाठी बिल्डरांना उपलब्ध व्हाव्यात या मूळ उदात्त(??) हेतूने महाराष्ट्राचे दोन दोन मंत्री ड्रोन विमाने घेऊन कोळीवाड्यात लोकांच्या प्रेमापोटी जातात?. की जमिनीसाठी?. नवी मुबंईत एका आगरी कोळी उच्चशिक्षित नेत्यास राष्ट्रवादीने खरेदी करून, जमिनीच्या धंद्यात क्लस्टरसाठी, भूमाफिया बिल्डर लोढा या मोदींच्या प्याद्यासही आम्ही मागे टाकलेय हे राष्ट्रवादीने कृतीने सिद्ध केले. सिडको विरुद्धच्या जमीन हक्काच्या लढ्यात पाच हुतात्मे देऊन साडे बारा टक्के जमीन मिळवून देणाऱ्या ओबीसी नेते दि बा पाटील साहेबांच्या आंदोलनाचा पराभव आम्ही विकाऊ आगरी कोळी तरुण नेत्यांना खरेदी करूनच क्लस्टर योजने मार्फत, 95 गावातील कोळीवाडा गावठाणेही उध्वस्त करू हा आगरी कोळी कराडी ओबीसींचा डोळ्यांना दिसणारा मोठा पराभव आता मान्य करायलाच हवा.
सिडको नवी मुबंई महानगर पालिकेच्या मोक्याच्या जागी बसलेले क्षत्रिय अधिकारी रोज दहा ते पंधरा तरी आगरी कोळी कराडी घरे पोलीस जेसीबी मशीन घेऊन पाडण्याचे सूडसत्र चालू ठेवून होते. कोरोना मुळे सिडको बंद तर महानगर पालिका आरोग्यासाठी राबतेय. परन्तु याही काळात पनवेल तालुक्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीन घेऊन घरे तोडण्यासाठी कारवाई केलीच. 8 मे 2020 या दिवशी रोहिजन बीड ता पनवेल जिल्हा रायगड येथील 75 वर्षाच्या आगरी शेतकरी हशा गणपत पाटील यांना नातवंडांना घेऊन घरातून बाहेर काढण्यासाठी घर तोडणारे अधिकारी मोदींचेही बाप निघाले. मागच्या 35 वर्षांपासून शेती कसणा-या या शेतकऱ्यास जागृत समाजाने कोरोनाच्या संकटात ही पाठीशी उभे राहून हे संकट पळवून लावले.
आगरी कोळी कराडी समाजाची गावे गावठाणे गिळण्यासाठी निदान पारधी समाजासारखी हत्याकांडे मुबंई ठाणे रायगडातत, होत नसली तरी, महत्वाची सरकारी पदे, सिडको महानगर पालिकेतील, पोलीस स्टेशन येथे, मोक्याच्या जागी बसलेले हे लोक वेगळे नाहीत!. ब्राह्मण पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या युद्धात, पानिपतावर अब्दालीकडून पराभव मात्र मराठयानचा झाला. या चमत्कारिक लढाईत ओबीसी एससी एसटी अस्तित्वालाही नसावेत?. या उच्चवर्णीय इतिहास लेखनामुळे छत्रपतींच्या आरमारात अग्रेसर असलेले आगरी कोळी भंडारी ओबीसी मागासवर्गीय तरुण आज विचारात पडतील?.
परन्तु या पानिपत कादंबरीचे महान क्षत्रिय लेखक विस्वासराव पाटील यांनी मुंबईतील आगरी कोळी समाजाची गावेच्या गावेच सातबा-यावरून गायब केली. एससी एसटी समाजाच्या 32 झोपडपट्ट्या एका रात्रीत एसआरए कडे वर्ग, निर्गमित करण्याची, पेशव्यांच्या तलवारीस लाजविणारी सनदी लेखणी चालविली.
अर्थात मुबंई तील या नव्या एसआरए घपला घोटाळा युद्धात उच्चवर्णीय विश्वास पाटील यांनी आगरी कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी गावठाणे आणि झोपडपट्ट्या गायब करून आम्ही आजही मनुवादी क्षत्रियच आहोत हे दाखवून दिले. मुबंईत असा जातीयवाद असू शकतो यावर भल्या भल्याचा विश्वास बसणार नाही. ओबीसी नेत्यांनाही हे शोषण कळणे अवघड आहे. जे मोदी रस्त्यावरून पायी निघालेल्या असंख्य भारतमाता आणि तिच्या तान्ह्या मुलांना प्रवासाच्या सुविधा, पाणी आणि जेवणाची सोय करू शकत नाही, पण दारुड्यासाठी स्वर्ग आणि नरकाचीही दारे सताड उघडी करतात, उद्योजकांसाठी 68 हजार कोटींची कर्जमाफी, मोफत जमीन, फुकटात 12 तास काम करणारे मोदी गुलामी लादलेले, मजूर देऊ शकतात. ते गरीब मागासवर्गीय भारतास 20 लाख कोटी देणार यासारख्या थापावर आता कुणाचाही विस्वास राहिला नाही.
शिवसेनेत सत्ता ही क्षत्रियांचीच राहणार हे ओबीसींना आता कळून चुकलेय. कोळीवाडा गावठाणे यांसह मुबंई नवी मुबंई परिसरातील मासे विकण्याच्या जागाही आगरी कोळ्यांच्या आहेत हे गावठाण हक्कात मागील भाजपा सरकारने मान्य करूनही, आमच्या आया बहिणींना मासळीच्या टोपलीसह सकट हाकलून देणारे हलकट लोक कोण आहेत?. नव्या मुबंईत आमच्या जमिनीवर क्षत्रिय गुजराती बनिया या लोकांचे एपीएमसी मार्केट चालू आहे. ज्यात विक्रमी कोरोना प्रसार होतोय. परन्तु आमच्याच गावात मासळी विकायला फूटभर जागा नाही?. भूमिपुत्रांना अर्धे एपीएमसी मार्केट मिळायला हवे. किंबहुना भाजी पाला मार्केट मध्ये समस्त मांसाहारी मागासवर्गीय लोकांना गळ्यांमध्ये 85 टक्के आरक्षण साऱ्या देशात हवे. आरक्षण हा गरिबी हटविण्याची योजना नाही. ते आमचे प्रतिनिधित्व आहे.
अहो मुबंई नवी मुबंई मध्ये जे आम्हाला मार्केट मध्ये बसायला आजही जागा देत नाहीत ते स्वातंत्र्य पूर्व काळात आमच्या पूर्वजांसोबत कसे वागले असतील?. ज्यांना ओबीसींना काही देण्याची सवय नाही, त्याच्या जागा जमिनी समुद्र अन मासेही केवळ लुटण्याचीच सवय आहे हे जाणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यांने आम्हास ओबीसी आरक्षण दिले. स्वतःस उच्च समजणाऱ्या काही मूर्ख आगरी कोळी ओबीसीनी आम्ही मागास नाही म्हणून आरक्षणाचा तिरस्कार केला. या अतिशहाण्या ओबीसी, कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या डोळ्यात तेव्हा दिवसा तारे चमकले ; जेव्हा महाराष्ट्राच्या स्थापने पासूनच कायम सत्तेत बसलेल्या क्षत्रियांनी "एक मराठा, लाख मराठा" या घोषणेसह केवळ आरक्षणासाठी मोर्चे काढले.
राम कृष्ण परशुराम यांच्या पेक्षा ही सर्वज्ञानी असलेल्या मोदींनी उचवर्णीय ब्राह्मणांना 10 टक्के आरक्षण न मागता देऊनही टाकले. काही ओबीसींना हवे असलेले धार्मिक पावित्र्य ही 'आरक्षणास' दिले. मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ओबीसींना जागविण्यासाठी लढणाऱ्या बौद्ध आंबेडकरवादी समस्त मागासवर्गीय भावंडांना आपले म्हणण्याची जाणीव आजही ओबीसींना होत नाही. महात्मा जोतिबा फुले याना गुरुस्थानी मानून लोकनेते दत्ता पाटील, दि बा पाटील, जगन्नाथ कोठेकर, जनार्दन पाटील हे आगरी कोळी नेते आरक्षणाची लढाई साऱ्या महाराष्ट्रात लढले. ओबीसींच्या आरक्षणाला क्रिमीलेयर अर्थात आर्थिक पात्रतेचा निकष लावणे म्हणजे आरक्षण नाकारणे होय!.त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणात उच्चवर्णीय मराठयांना आरक्षण देणे म्हणजे आरक्षण संपविणे होय, हाच निंद्य प्रकार आमच्या एससी, अनुसूचित जातीच्या भावंडांच्या आरक्षणाला क्रिमीलेयर लावून, मोदींचे महागुरू शरद पवारांच्या सरकारने केला. समाजकल्याण मंत्री मा धनंजय मुडे यांनी क्रिमीलेयर लावताच बौद्ध विचारवंत मंडळीत प्रचंड आक्रोश, संताप निर्माण होऊन त्यांनी शिवसेना कॉग्रेस राष्ट्रवादीस केवळ सोशल मीडियातून लोळविले. जागृत समाज काय असतो हे साऱ्या जगाने पाहिले. आज मा.धनंजय मुडे यांनी या चुकीच्या निर्णयास स्थगिती देऊन एक चांगला निर्णय घेतला. उद्या त्यांचा भुजबळ होऊ नये!.या क्रिमीलेयर विरोधात समस्त सामान्य मागासवर्गीयांना एकीने लढताना मी पाहिलंय यात मा सुनील खोब्रागडे. प्रा हरी नरके , मा श्रावण देवरे , प्रा प्रेमरत्न चौकेकर, प्रदीप ढोबळे आणि नावे माहीत नसलेल्या असंख्य फेसबुक वॉट्सप पोस्टवरील लढाऊ नेते, विचारवंत, आणि भीम सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मोदीगुरु नमलेत! आम्ही सर्व ओबीसींना हे आंदोलन ओबीसींच्या आरक्षणाला लावलेल्या क्रीमी लेयर काढण्याच्या भविष्यातील लढाईसाठी अत्यन्त महत्वाचे ठरणार आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ओबीसीनी जगले पाहिजे! जागले पाहिजे!! भारतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आमच्या मानवी अधिकारांना कायम नाकारले आहे. आमच्या सर्व स्त्री शूद्रातिशूद्र म्हणजेच आगरी कोळी कराडी भंडारी माळी 52 टक्के ओबीसी यांचे भाऊ एससी एसटी विजेएनटी हेच आहेत .आपण एकत्र लढलो पाहिजे. आपणास आरक्षण हा विषय समजत नसेल तर या क्षेत्रातील जाणकार, लढवय्ये आंबेडकरी बौद्ध बांधवांना सोबत घेऊनच मार्ग शोधला पाहिजे. आपल्या दृष्टीने कदाचित ही आज न पटणारी गोष्ट असेलही! परन्तु मी मागच्या 35 वर्षात जगलो त्या चुकीच्या श्रद्धेपेक्षा, डोळस विवेकी तर्कबुद्धी आहे.
मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली खासदारकी लढलो तो सामान्य आंबेडकरी चळवळीचे असंख्य कार्यकर्त्यांचा आदर होता. मी निवडणूक हरलो असलो तरी माझी दिशा योग्य आहे. संविधानिक आहे, असे आज मला वाटते! मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे.. त्यात आपली जमीन, पाणी समुद्र, जंगले, उद्योग, शिक्षण, आरोग्य, आरक्षण आणि आई एकवीरेंच्या मातृसत्ताक विचारांची ही सांस्कृतिक लढाई आपणही समजून घ्यावी यासाठी प्रबोधनही करणार आहे. कोरोनाच्या आडून होणाऱ्या उच्चवर्णीय अत्याचारांना समजून घेऊन जगुया... समतेचा न्यायाचा भारत घडवू या.
राजाराम पाटील,मो 8286031463
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र
No comments:
Post a Comment