Saturday, November 7, 2015

इंदू मिल स्मारकाचा शिल्पकार कोण ?.


    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक किर्तीचे स्मारक बनावे या करिता काही राजकीय नेते आपल्या चेल्या चापटयांना घेऊन आंदोलन करून सरकारला अडचणीत आणण्याचे काम करीत होते.त्या मागचा प्रामाणिकपणा किती आणि राजकारण किती हा मुख्य संशोधनाचा माझा विषय आहे.डॉ बाबासाहेबाचे विचार हे नेहमी क्रांतिकारी असत.समाज सेवा करण्या करिता त्यांनी कधीच काम केले नाही आणि करू दिले नाही समाज परिवर्तन हाच त्याचा मुख्य उदेश असायचा.आज आंबेडकरी चळवळ राजकारणाच्या गटातटात विभागली असल्या मुळे त्याच्या समाज परिवर्तनाच्या लढाईची धार बोथड झाल्याची काहीना वाटते.स्वार्था करिता काही नेते गोरगरीब कष्टकरी समाजाचा सौदा करून आमदारकी खासदारकी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात.तर काही नेते गोरगरीब कष्टकरी समाजाच्या मुलभूत समस्या वर न बोलता न लढता बहुजनाचे भावनिकदृष्ट्या नेते बनतात. त्यात ते अयशस्वी झाले कि सत्यापासून लांब पाळतात.ज्या समाजात आपल्याला राहायचे आहे. त्याच समाजाचे नेते म्हणून मिरवायचे आहे.त्याच समाजाच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावर न लढता केवळ राजकीय महत्त्वकांक्षा बाळगून काम करणे म्हणजे आंबेडकरी क्रांतीकारी विचार आणि चळवळ नाही.माफ करा वाचका नो आणि भक्तानो १९२७ ते १९३६ पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई असंघटीत कष्टकरी शेतमजूर यांच्या स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याची होती.त्यामुळेच हा असुशिक्षित अज्ञानी असंघटीत कष्टकरी शेतमजूर चळवळीत हिरीरीने भाग घेत होता.तोच समाज आज खेडे सोडून शहरात आला.आणि असंघटीत बांधकाम कामगार झाला.खेड्यातील सालदारी गावकी, महारकी करणारा अल्प भूधारक शेतमजूर झाला.तोच या देशातील सर्वात मोठा मतदार आहे.आंबेडकरी चळवळी तील किती नेते या असंघटीत कामगार मजुरांना संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारा करिता लढतात.इंदुमील करिता जीवाचे रण करणारया नेत्यांना हे माहित आहे काय?.
इंदुमिल स्मारक शिल्पकार कोण? 
इंदुमिल स्मारक शिल्पकार.भाजपच ठरणार आहे.कारण ते सत्ताधारी आहेत त्याचे नांव आणि कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहल्या जाणार आहे .त्याचा राजकीय लाभ ते अनेक वर्ष घेणार आहेत.आंबेडकरी चळवळी तील गल्लीबोळातील नेत्यांना किंवा स्वयम घोषित संस्थापक राष्टीय अध्यक्ष यांना आणि समाजाला मिळणार नाही या पुढे स्मारकाच्या वेगवेगळ्या समितीच्या सभासद पदा करिता त्यांना संघर्ष करण्याचा अधिकार ही त्यांना राहणार नाही. तुमच्या जागी तुमच्या समाजातील अन्य नेते जे भाजपच्या जनसंघटना,पक्षा मध्ये किर्याशील आहेत त्याची वर्णी लागेल.हे जागृत समाज बांधवानी विसरू नये.कामाची सुरवात झाली नाही तर बाबासाहेबाचा पुतळा किती उंच असेल?. एक हात वर एक हात मागे कि एक हात वर एका हातात संविधान ?.भव्य गार्डन कि स्मारक काहीच स्पष्टीकरण नाही.आंदोलन करणारे नेते दररोज एक चुक पुढे करून सरकारला धमकी आणि इशारा देत आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार मानणारा समाज संविधानच मानत नाही असे म्हटल्यास काही भक्तांना राग येणे स्वाभाविक आहे.म्हणून मी फक्त इथे इंदुमील स्मारक आणि सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलना बाबत काही लक्षवेधी घटना कडे लक्ष वेधू इच्छितो. सत्ताधारी राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्या शिवाय काही आंदोलन यशस्वी होत नाहीत.अन्यता प्रसिद्ध कामगार नेते विजय कांबळे शरद पवार साहेबाचा आशीर्वाद घेऊन कधीच इंदुमिलचे शिल्पकार झाले असते.
  6 डिसेंबर 2011 ला आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलचा ताबा घेतला कसा घेतला. आणि हा ताबा जवळ जवळ 18-19 दिवस कसा राहिला होता. सहा डिसेंबर हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापारीनिर्वाण दिन म्हणून देशा विदेशातील लोक ३ डिसेंबर पासून दादरच्या चेत्यभूमी ला मानवंदना देण्या करिता दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक येतात.नेमखे पाच आणि सहा तारखेला कोणत्याही गल्लीबोळातील नेत्याने या दिवशी जनआंदोलन केल्यास त्याला आणि त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पकडून जेल मध्ये टाकु शकतात पण त्याला नेत्याला अटक केल्यास आंदोलन चिगळून हिंसाचार,जाळपोळ होऊन निरपराध माणसाचा बळी जाऊ शकतो.(भारतीय सविधाना नुसार) ५ व ६ डिसेंबर २०११ ला असे आनंदराज आंबेडकर यांच्या आंदोलनकर्त्या सोबत पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर काय घडले असते?. याचा विचार करताच अंगावर काटा उभा राहतो.चेंगराचेंगरीत किती लोक घायाळ झाले असते?.कितीचा बळी गेला असता?.त्यातून एकाच वेळी आठवले साहेब,कवाडे सर,बाळासाहेब इतर नेते संपविण्या साठी सर्व कॉंग्रेस प्रणीत मिडिया काम करीत होती. त्यातून एकमेव नेते म्हणून आनंदराज राष्टीय नेते झाले असते त्यासाठी कॉंग्रेसने मुंबई ते दिल्ली पायघड्या टाकल्या होत्या.त्याला शरदचंद्र पवार साहेबांनी कसा सुरुंग लावला याचे वर्णन त्याकाळचे मान्यता प्राप्त वर्तमान पत्र तपासून पहा.समाजावर होणारया अन्याय अत्याचाराच्या लक्षवेधी घटना असताना त्यावर संघशक्ती निर्माण करून इतर नेत्या पेक्षा वेगळे अस्तीस्व निर्माण करणारा नेता समाज परिवर्तनाची योजना घेऊन समाजात जातो.तो खरा नेता असतो.कोणती हि योजना नसताना नेता बाण्याचा हा शॉटकट सध्या आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण करीत आहे.यावर बोलणे आणि लिहणे म्हणजे जीवाची बाजी लावणे आहे.
इंदुमील चे जागतिक किर्तीचे स्मारक कसे बनेल ?. या सरकारने जागतिक कीर्तीच्या वास्तू विशारद कडून गोबल टेंडर मागविले पाहिजे होते.तसे न करता चेत्यभूमी विकास आरखडा ज्या शशी प्रभूनी बनविला त्याला सर्व पक्षीय नेत्यांनी आणि जाणकारांनी प्रचंड विरोध केला.त्यालाच इंदुमील स्मारक करिता वास्तू विशारद म्हणून नेमणूक केली.म्हणून या सरकारची पुढील रणनीती,आराखडा काय असेल याची कल्पना करण्यास हरकत नाही.कॉंग्रेस सारखे भिजत घोगळ ते ठेवणार नाहीत त्यांना जे हवे ते लवकर पूर्ण करतील. आणि देशातील दलित बहुजन समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार जो एक वर्ग आहे.त्याचे समर्थन मिळवतील.दलित बोद्ध इतर सर्व मागासवर्गीय जाती जमातीला ते पक्ष संघटनेत प्राधान्य देऊन आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी विचाराचे समर्थन करणाऱ्यांची गोची करतील.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घर आणि इंदुमील स्मारक यांचे ते शिल्पकार ठरले आहेत..त्याला दिशाहीन झालेला बोद्ध समाज आणि राजकीय स्वार्थाने पछाडलेले नेते जबाबदर आहेत.यावर एकच उपाय असंघटीत कामगार असलेल्या समाजानी संघटितपणे सुशिक्षित,सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना बाहेर कडून राजकीय गटबाजी संपवण्यासाठी विभागा विभागात बैठका घेऊन एक पक्ष,एक नेता,एक उमेदवार निवडणे.स्वतचे मतदार संघ तयार करून निवडणूक लढविणे.मग बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारता येईल.साडेबारा एकर साठी ज्या नेत्यानी जो संघर्ष केला तोच स्वताचे मतदार संघ बांधण्या साठी केला असता तर आज चित्र वेगळे असते.उतर प्रदेशात मायावतीने १२०० एकर भूमी वर महापुरुषाचे भव्य स्मारक बनविले.त्या करिता किती जनआंदोलन करावा लागला?.इतिहास वाचा.बाबासाहेबांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून सतत गौरवने सोपी आहे.त्याची अंमलबजावणी करणे सोपी नाही म्हणून आम्ही शासन करती जमात न बनता आंदोलन करणारी जमात बनत राहिलो.आता हे थांबविले पाहिजे दहावीस वर्षांनी तरून मुलांनी आपल्या वडीलधारयांना विचारले कि इंदुमील स्मारकाचे शिल्पकार कोण त्यांच्या जवळ कोणते उतर असेल?.समाजातील थोर विचारवंत,साहित्यिक,शोध पत्रकारिता करणारे पत्रकार काय इतिहास लिहून ठेवतील ?.कोणत्या बाबत आपले एकमत होते आणि आहे.आमचे आईवडील आजोबा असुशिक्षित अज्ञानी होते तरी ते आंबेडकरी चळवळीच्या मागे उभे राहिले म्हणून मी आज मान्यताप्राप्त नेत्याच्या विरोधात लिहू व बोलू शकतो.आजची युवा पिढी जिथे गूढ खोबर,आणि होडींगवर फोटो,बिर्याणी बियर,रम होडका मिळेल तिथे आपली शक्ती खर्च करताना दिसते.त्याचा एकाही  नेत्यावर विश्वास राहिला नाही.त्यांना योग्य मार्ग दाखविणे गरजेचे आहे ते आव्हान कोणी स्विकारण्यास तयार नाही सर्व शॉटकट स्वीकारतात मग चळवळी चे होणार काय ?. 

कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई !.

कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई !.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ २००७ ला पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला.देशातील पहिली दलित महिला देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय दलित महिला नेता ठरली.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे.उतर भारतात कांशीराम यांनी जी समाज प्रबोधनाची मोहीम राबविली त्यामुळेच कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई असा नारा दिल्या जातो.
  महापुरुषाची विचारधारा सांगणारी जी बसपा देशातील बहुजन समाजाला जागृत करून सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!." ती बसपा २०१२ च्या विधान सभा निवडणुकीत चारीमुंड्यचीत झाली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उरलीसुरली प्रतिष्ठा मातीमोल झाली.त्यामुळे देशातील दलित समाज आपल्या १९३२ च्या परिस्थितीत होता तिथे येऊन थांबला.ज्या चातुर्वर्ण्य,मानुवादाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात.आणि त्याचा वापर समाजाला तोडणारया हत्यार म्हणून कसा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि सयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे दलित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.
कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही.सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे जिल्ह्याला दिली म्हणजे बहुजन समाजात आर्थिक क्रांती झाली नाही.त्यामुळे दलित समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले "जिसकी संख्या भारी,उतनी उसकी भागेदारी" संपली.जिसका पैसा भारी उतना उसका पद भारी झाली.त्यामुळे घरादाराची परवा न करता बसपा साठी काम करणाऱ्या जीवदानी कॅडर चे मरण झाले.आणि त्यामुळेच चमचा युग काय करू शकते.हे २०१२ च्या निवडणुकीने दाखवून दिले. 
  मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून मान्यवर कांशीराम यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने देणगी,बुद्धी,वेळ आणि पैसा मिळविला त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात हि सायकलवरून झाली.पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली.त्यामुळे ते खूप कोध्रीत झाले.त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले व सायकल मिळवून दिली.तेव्हा ते खूप खुश झाले.मनोहर काटे या कार्यकर्त्याना सांगितले सायकल हि माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.
 कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने अशे धाडस केले नाही.कांशीराम यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
  कांशीरामजी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करतात.आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात.कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समजतील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समजतील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा मान्यवर कांशीराम यांच्या स्मृर्ती दिनी बहुजन समाजाला विसरता येत नाही 

Friday, October 2, 2015

रिपब्लिकन कार्यकर्ते व नेत्याचा अहंकार ?

रिपब्लिकन कार्यकर्ते व नेत्याचा अहंकार ?


भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील दलित शोषित पिडीत आदिवाशी मागासवर्गीय समाजाचा म्हणजे बहुजन समाजाचा रिपाई म्हणूनच ओळखला जातो.तसा भारतातील सर्वात मोठी संख्या असणारया समाजाचा हा राजकीय पक्ष आहे. डॉ.भिमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून हा पक्ष उदयास आला.या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्र होते.शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या सामाजिक संघटनेने राजकारणात उतरून  निवडणुकीत भाग घेतल्यामुळे अनेक समाजाचे समीकरण बदललेले होते. त्याचमुळे त्याची राजकीय पक्षात गणती होत होती.
शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती.त्याच्या महापरी निर्वाणा नंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या निष्टावंत अनुयायांनी रिपाई ची स्थापन केली.पण सुरवात पासूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहासच अहंकाराचा आणि फाटाफुटींनी भरलेला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या एतिहासिक रिपाई प्रक्रियेचे एकूणच वर्णन करता येईल. त्यामुळेच रिपाई आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द झाले आहेत.स्वार्थ व अहंकार या शब्दाला यांनी खूप महत्व दिले आहे.आज ही यावरच यांची संपूर्ण इमारत उभी आहे.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ बौद्ध धम्माची दिक्षा देताना त्यात त्यांनी त्रिसरण,पंचशील,आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या हे सर्वच कार्यकर्ते नेते विसरले आहेत म्हणून रिपाई किंवा इतर समाजिक,धार्मिक संघटना नेहमी अहंकारा पायी फुटतात असे म्हटले तर चूक ठरणार नाही.  
   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष म्हणून ओळखणारा रिपाई पहिल्यांदा फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्ष स्थापने नंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हा ही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे -गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले.म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्या कडेच गेले.पुढे आर डी भंडारे आणि रुपवते कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे.आत्तापर्यंत या पक्षाची ५० हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला.रिपाई नांवा शिवाय हे स्वताचे अस्तित्व दाखऊ शकत नाही.
 आत्मपरीक्षण करण्याची तयारी नसल्या मुळे मी बरोबर बाकी सर्व चूक हे सिद्ध करण्यात या नेत्यांनी आपली "व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात येउच शकत नाही ?" अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळ संपली आहे  पुस्तकरुपी निष्कर्षा नंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीचे काम सोडून दिले आणि डाव्या विचाराच्या विविध गटांना जवळ करून नक्षलवादी विचाराच्या तरुणाना जाहीर पाठिंबा दिला त्यातूनच महाराष्ट्र लोकशाही आघाडी निर्माण झाली.प्रा.जोगेंद्र कवाडें सारखा प्रामाणिक नेता खासदाराचा मागच्या दराने आमदार झाला.आणि रिपाई मधील उरला सुरला प्रामाणिकपणा संपवला.रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहली असा धोक्याचा गंभीर इशारा देणाऱ्या बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा खूप झाली.पण ते केवळ कार्यकर्त्याच्या लेवलवर ती बुद्धीजीवी वर्गाच्या पातळीवर झाली असती तर समाजाला नेमखी दिशा देता आली असती.परंतु बहुसंख्य बुद्धीजीवी भिती पोटी सत्य मांडण्याचे धाडस करीत नाही. अनेकांनी आंबेडकरी चळवळ संपली नसल्याचे दावे केले, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण दिले नाही.आज आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले संपूर्णपणे उध्स्त झालेले (वैचरिक पातळीवर) स्पष्ट दिसतात. 
   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल एक पत्र १ ऑक्टोबर १९५७ रोजी 'प्रबुध्द भारत' मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाची घटना मानली जावी असा सर्व नेत्याचा आग्रह होता. त्यात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील, पक्षाच स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन, आपल्या अनुयायांना बाबासाहेब सांगतात, 'हा पक्ष देशातील सर्व दलित, पिडीत आणि शोषित जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल. अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध आणि मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी स्विकारलेला असेल. शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपल कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करावी. दुस-या पक्षाशी सहकार्य करतांना आपला पक्षाच्या तत्वज्ञान, ध्येय आणि उदिष्ट यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. नेता एकच असावा आणि पक्षही एकच असावा. पक्षाच चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृतीमधिल प्रतिक तर, अशोक चक्रांकित निळा झेंडा हे निशाण असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्टपणे मांडलेले होते.
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची नागपूर दिक्षा भूमीवर स्थापना झाली होती. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूकात पक्षाने दैदिप्यमान, नेत्रदिपक यश संपादन केले होते. त्यावेळी त्याची राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी होती,पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.त्या काळी एका मान्यताप्राप्त नेत्याचा एक मंत्र होता गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद,अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली. इतर राजकीय पक्षांशी तडजोड करीत.प्रत्येक गटाचे नेतृत्व बेफिकीर, दिशाहीन बनत गेले. गटा तटाच्या निच राजकारणामुळे आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात कार्यरत होत गेले.या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा फार मोठा बुद्धिजीवी वर्ग अलिप्त राहिला.आज आमचे काही दैनिक आहेत पण त्या दैनिकाच्या संपादकाचे आंबेडकरी चळवळी बाबत कोणत्याही विषयावर एक मत होत नाही.राजकीय नेत्या सारखे ते एकमेकाच्या जवळ बसून किमान एक कार्यकार्म बनवून समाजा समोर भूमिका मांडण्याची हिंमत दाखवत नाही.मग समाजातील ९३ % असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन कोण करेल ?.
१९२७ ते १९५६ पर्यंत दलित शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. रिपब्लिकन पक्षाच्या गटा तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले आणि ते करण्यास भाग पडणारा कोणी पदवीधर प्राध्यापक,डॉक्टर,वकील,इंजिनियर नव्हता.आंबेडकर चळवळ संपली या छोट्या पुस्तकात लेखक बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐक्यासाठी उपोषण करणारे कोण आहेत आणि त्याचे शिक्षण व रोजगार काय आहे हे नांवासह दिले आहे.सर्व असंघटीत कामगार मजूर होता हे लक्षात घ्या.आताही त्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण समाजात असंघटीत कामगारंचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यांच्या पाठीवर कोण कधी हात ठेऊन आपले करेल हे सांगता येत नाही.रिपाईच्या सर्व बालेकिल्ले कुठे आहेत हे शोधावे लागेल.अहंकार, मतभेद, प्रलोभन, आमिषापायी आंबेडकरी चळवळी तील सामाजिक, राजकीय निष्ठा गौण ठरत आहे. आज आपला सामाजिक, राजकीय पाया काय आहे ? ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच समाजासमोर,चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.अत्याचार आणि भावनिक प्रश्नापुरती चळवळ फक्त लढते आहे.पण निकाल काय ?. 
  बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आपण काय अवस्था करुन ठेवली आहे ? पक्षाची राजकीय मान्यता, निवडणूक चिन्हही आपण केव्हाच गमावून बसलो आहोत. अत्याचार, भावनिकता आणि बाबासाहेबांच्या नावाचे भांडवल करुन अजून किती सोयीच राजकारण करणार आहोत? राजकारणात बेरीज चालते,आपण तर वजाबाकी व भागाकार करीत आहोत. आपली निर्णायक बलाढ्य शक्ती असतांना, आपण राजकारणात अदखलपात्र का ठरु लागलो ? आंबेडकरी चळवळ राजकीय, सामाजिक चळवळीचे होत असलेले पतन आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद आहे का ? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक गटा तटाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर???...

  राजकारण कशासाठी, कोणासाठी आणि का करायचे ? ३ ऑक्टोबर २०१५ रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ५८ वर्ष पुर्ण होत आहेत.गेल्या आठदिवसा च्या वृत्तपत्रातील बातम्या पाहिल्या तर काही रिपाई गटाची मान्यता रद्ध करण्यात आल्याचे वाचण्यात येत आहे.कारण त्यांनी रीतसर हिसाब ठेवला नाही आणि सादर केला नाही.तीच परिस्थिती सामाजिक धार्मिक शौक्षणिक संस्था,संघटना यांची आहे.मग आता कोणता रिपाईचा गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. म्हणून सर्व गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनी प्रथम आपल्यातील अहंकार सोडून दयावा आणि आपल्या परीसारतील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.सर्व नेत्यांना भीमटोला मारून भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच रिपाईचा नेता असेल.रिपाईच्या वर्धापन दिना निमित्य एक संकल्प करूया आणि रिपाई अहंकार मुक्त करून नवा इतिहास घडवूया 

Sunday, September 27, 2015

खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील

   गात शिक्षण देणारया संस्था खुप आहेत.आणि त्या संस्थाचे उदिष्ट पैसा कमविणे हाच असतो .ह्या सर्व खाजगी कंपन्या झाल्या आहेत.सुजाण नागरिक घडविणे आणि देशाचा विकास करण्याचा उदेश या शिक्षण संस्थाच्या संचालकाचा नाही.विद्यार्थी दसे पासूनच जर विद्यार्थांना प्रवेश घेताना  भष्ट्राचार करून शिक्षण घेत असतील तर पुढे कोणत्याही पदव्या त्यांनी घेतल्या तर त्याचा उदेश फक्त पैसा कमविणे हाच असणार आहे.त्यांना देशाच्या विकासाशी कोणते ही देणेघेणे नाही. दिनाक ४ ऑक्टोबर १९१९ ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. त्यावेळी १९१९ ला उदिष्ट लक्षवेधी होते. १) शैक्षणिक दुष्ट्या गोरगरीब मागासवर्गीय समाजात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ते वाढविण्यास मदत करणे.२)मागासलेल्या समाजात गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.३) निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांत बंधुभाव निर्माण करणे.४) अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.५ )संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.६ ) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.७ ) बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.असे शिक्षण देणारे संस्था संचालक शोधून हि सापडणार नाहीत..रयत शिक्षण संस्था ही भी आज सत्यशोधक महात्मा फुलेच्या वैचारिक वारसदार भाऊराव पाटील यांच्या धेय्य धोरणा नुसार चालत नाही या संस्थेत पूर्ण चातुर्वर्ण आणि गर्वसे कहोचा चा बोलबाला आहे.
    कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म २२ सप्टेंबर १८८७; कुंभोज,जिल्हा कोल्हापूर,महाराष्ट्र येथे झाला.ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.लहानपणा पासूनच भाऊराव बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड होती.अस्पृश्यता पाळणाऱ्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला होता.पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले.याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळीं बरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले होते. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह त्यांनी सुरू केले होते. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला होता.त्यामुळे त्यात त्यांनी समाजात परिवर्तन घडविण्या साठी प्रथम शिक्षण संस्थाची सुरवात केली.त्याच्या कार्याला डॉ नागनाथअण्णा नायकवडी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची प्रथम देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.आणि इतिहास लिहला गेला.
    मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलीला शिक्षण घेण्या साठी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली होती. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.जून १६, इ.स. १९३५रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
   करवीर नगरीत सत्यशोधक  समाजाचे  आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या  संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक  चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर  अण्णा तर  राजर्षी  शाहू  महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात  सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक  समाजाच्या विचाराने भारावलेली  एक पिढी त्यांनी  घडविली. जेव्हा  सातारा जिल्ह्यात सत्यशोधक  समाजाने  लोक  जागृतीसाठी  जलसे काढले  तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी  मागेपुढेही  पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधि‍वेशन  घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी  एक खास  संस्था   काढण्याची  कल्पना  मांडली आणि ठराव  रुपाने त्या अधिवेशनात त्यास  मान्यता मिळाली.  अशा रितीने रयत शिक्षण  संस्थेचे बीज सत्यशोधक  समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले.  वृक्षाखाली  गौतम  बुध्‍दांना  ज्ञान  प्राप्त झाले.  बहुजन  हिताय ! बहुजन  सुखाय !! हे गौतम  बुध्‍दांचे संदेश आहे म्हणून  संस्थचे बोधि‍चिन्ह वटवृक्ष आहे.
    देशातील  भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कराड येथे ‘(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.हाच आदर्श मराठा समाजा ने कायम डोळ्या समोर ठेवला असतात तर आज राज्यात मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली नसती.कारण आज राज्यात नव्हे तर देशात शाळा महाविद्यालय जरी मराठा समाजाच्या असल्या तरी त्याची शिक्षण देणारी यंत्रणा भटा ब्राम्हणा च्या हाती आहेत. त्यांना बहुजन हिताय बहुजन सुखाय नको आहे.
  महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.हा ऐतिहासिक इतिहास बहुजन समाजातील लोक विशेष मराठा समाजातील तरुण वाचत नाही.म्हणून त्यांना सांगावे वाटते जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडविण्यासाठी झटतो.मागास्वर्गीय समाजाची शिक्षण आणि नोकरीतील प्रगती पाहून त्याचे आरक्षण बंद करण्या करिता नाना प्रकारे जनांदोलन उभारल्या जाते.त्यांनी मागासवर्गीय समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बदल घडविण्या साठी फुले,शाहू,आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एतेहासिक त्याग आणि संघर्ष आहे हे कोणी विसरू नये.म्हणून या खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या २२ सप्टेंबर जयंती होती मुंबईच्या मराठी वृत्तपत्रा नी साधी दाखल कर्मवीर भाऊराव पाटील यांची घेतली नाही.म्हणजे किती मराठी पत्रकार संपादक कोणत्या संताची महापुरुषांची  दाखल घेवावी या बाबत दक्ष आहेत हे दिसून येते हा लेख जयंतीनिमित्त लिहला होता.पण एकाही पेपरने (जनतेचा महानायक सोडून )तो प्रसिद्ध केला नाही म्हणून खंत वाटते.इतिहास लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्व कमी होत नाही.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार

पुणे करार भ्रम आणि वास्तव


भारत देश स्वत्रंत झाला तेव्हा समतावादी लोकांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच होती.आणि विषमतावादी लोकांची व संघटनाची संख्या खूप मोठी होती.तेव्हा सातासमुद्रापार ब्रिटीश सरकार बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम मागसवर्गीय समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी वैचारिक संघर्ष करीत होते.त्यांनी जगातील विद्वानां समोर भारतातील बहुजन समाजाची सत्य परिस्थिती मांडली  होती.त्यामुळे त्याच्या संघर्षाला यश प्राप्त झाले होते.हा इतिहास वाचून कोणी बदलू पाहत होता.ज्याला हे ऐकणे व वाचणे अशक्य झाले होते.त्यांनी पुण्याच्या जेल मध्ये आमरण उपोषण सुरु केले.त्याचा शेवट २४ सप्टेंबर १९३२ ला पुणे येथे झाला.म्हणून त्याला पुणे करार असे म्हणतात.तो करार एम के गांधी आणि डॉ.बाबासाहेबा आंबेडकर यांच्यात झाला.त्याचा धिक्कार खुद बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.पण तडजोड करून.
  बामसेफ,मूलनिवासी,अम्बस,भारत मुक्ती मोर्चा सारख्या काही संघटना,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार आणि आंबेडकरी चळवळ दुषित करण्याचा जीवतोड मेहनत करीत आहे.पुणे करार सारखे विषय घेऊन गेल्या २५ -३० वर्षामध्ये आंबेडकरी चळवळी तील लोकांमध्ये जात आहेत. इतक्या वर्षात स्वतःलाच मुक्ती नाही देऊ शकले तर ते भारताला बहुजन समाजाला काय मुक्ती देणार ? विशिष्ट समाजाला लक्ष करून विविध जाती पाती जोडून शिकलेल्या पण तेवढाच प्रकारे स्वताच्या स्वार्था साठी लढणाऱ्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे अनेक समाज आंबेडकरी चळवळी पासून दूर जात आहे .गेल्या खूप दिवसापासून पुणे करार या विषयाचे अनेक व्याख्यान,परिसंवाद,देशभर भाषण देणारे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष समाजाला कोणताही फायदा देऊ शकला नाही.असे चित्र निर्माण करून त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असे यांना पुणे कराराचा धिक्कार करून दाखवून दयाचे असते.पण त्यावेळची परिस्थिती लक्षात न घेता.
  २४ सप्टेंबर १९३२ ला जो करार गांधी आणि बाबासाहेबामध्ये झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो.बाबासाहेबांनी केलेल्या काही मागण्यावर एम के गांधीचा प्रखर विरोध होता त्यामुळे त्या विरोधात गांधीनी  आमरण उपोषण सुरु केले होते त्यात महत्वाची बाब होती की अस्पृश्यांना वेगळ्या राखीव जागा आणि अस्पृश्यांसाठी २ मतदानाची मागणी, मतदानाचे दोनवेळा अधिकार हा इतर वर्गापासून विपरीत मागणी होती आणि त्यामुळे देशातील सर्व उच्च वर्णीय वर्गीय समाजात प्रचंड चीड त्यावेळी निर्माण झाली होती. ती आज ही अहमदनगर जिल्ह्यातील घटना पाहून दिसते.मग आठवा तेव्हा काय परिस्थिती असेल.पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या कडे खैरलांजी खर्डा जवखेडा,सोनई या भीषण हत्याकांडा बाबत कोणती ही ठोस भूमिका नाही.
   गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो समझोता झाला तो पुणे करार केवळ दोन व्यक्तिचा नव्हता तर समतावादी आणि विषमता वादी समाजातील होता. एकाबाजूला असंघटीत कष्टकरी हात मजुरी करणारा समाज तर दुसरीकडे या सर्व मागासवर्गीय समाजाचे शोषण करून आय्याशी पणे जगणारा समाज होता.त्यातील हा संघर्ष होता.
   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा आग्रह होता की, अस्पृश्यांना समतेचे सामाजिक व राजकीय हक्क त्यांचा एक निसर्गदत्त अधिकार म्हणून मिळाले पाहिजेत, तर महात्मा गांधी अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे भूतदयावादी दृष्टिकोनातून पाहत होते. बाबासाहेबांना अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा एक राजकीय हक्क म्हणूनच मिळाला पाहिजे, असे वाटत होते, तर महात्मा गांधी अस्पृश्यांना हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग मानीत होते. म्हणून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास त्यांनी प्राणांतिक विरोध केला. महात्मा गांधी हे स्वत:स तमाम अस्पृश्यांचे नेते म्हणवीत होते, तर बाबासाहेब गांधीजींचा हा दावा खोडून काढताना आपणच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहोत, हे ठासून सांगत होते.ब्रिटिश सत्तेने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यावर महात्मा गांधींनी येरवडा जेल मध्ये प्राणांतिक उपोषण करताना अशी भूमिका घेतली होती की,अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच एक अंग असल्यामुळे हिंदूंचे ऐक्य फुटणे आपणास मान्य नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मुस्लिम-शीख व ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे जर देशाचे व समाजाचे ऐक्य धोक्यात येत नसेल तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे ते कसे काय धोक्यात येऊ शकते? महात्मा गांधींनी तरीही आमरण उपोषण करून बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून द्यायला भाग पाडले व तत्कालीन विधिमंडळात 148 राखीव जागा तसेच स्पृश्य हिंदूंच्या जागांपैकी मध्यवर्ती विधिमंडळातील 10 टक्के जागा अस्पृश्यांना देण्याचे मान्य करणारा पुणे करार केला. 
   25 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या या पुणे कराराचा एक राजकीय फायदा असा झाला की, राजकीय पक्षांचे लक्ष अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे वेधले गेले. महात्मा गांधी मंदिर प्रवेशाच्या बाजूचे झाले. शिवाय पुणे करारामुळेच आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत यावर शिक्कामोर्तब झाले होते. बाबासाहेब आंबेडकर पुणे करारावर भाष्य करताना म्हणाले, ‘महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेतच अस्पृश्यांच्या राखीव जागांना मान्यता दिली असती तर गांधीजींवर उपोषणाची पाळी आली नसती.’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘पुणे करार हा अतिपवित्र असा करार मानून तो अस्पृश्य बंधूंनी सद्भावनेने आणि प्रामाणिकपणे पाळावा.’ पुणे कराराची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अशी असताना बामसेफ सारख्या काही संघटना पुणे कराराची नादानपणे धिक्कार करीत असतात. धिक्कार करणारांना एवढेही भान राहत नाही की, पुणे करार एकट्या महात्मा गांधींचा नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही आहे. त्या करारावर महात्मा गांधीं बरोबरच बाबासाहेबांचीही स्वाक्षरी आहे. तेव्हा आपण पुणे कराराचा धिक्कार करीत असताना कळत-नकळत बाबासाहेबांना कमी लेखून त्याचा हि धिक्कार करीत नाही ना ?.
  गांधी-आंबेडकर यांच्यात अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर तीव्र संघर्ष झाला हे खरे, पण म्हणून गांधी-आंबेडकर संघर्ष हिंदुत्ववादी संघ परिवारासारखा विखारी नव्हता. बाबासाहेबांनी महात्मा गांधींवर कठोर टीका केली, पण या टीकेचे स्वरूप दृष्टिकोनाची, विचारांची मतभिन्नता असी होती. बाबासाहेबांनी महात्मा गांधींबरोबर पुणे करार करायला नको होता असे आजही ज्यांना वाटते व आततायीपणे जे महाभाग पुणे कराराची होळी करून धिक्कार करतात त्यांनी हेही समजून घेतले पाहिजे की, वाटाघाटीत देवाण घेवाण करावी लागते. महात्मा गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध जेव्हा प्राणांतिक उपोषणची सुरुवात केली होती तेव्हा देशात स्फोटक वातावरण निर्माण झाले होते. बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यांच्यावर अत्यंत प्रक्षोभक आणि विखारी भाषेत टीका होऊ लागली होती. ‘त्या’ उपोषणात समजा, महात्मा गांधींच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर दलित समाजाचे काय झाले असते?. याचा कसलाही सारासार विचार न करता पुणे कराराच्या 83 वर्षांनंतरही आज काही अतिहुशार लोक या करारास विरोध करीत असतील तर त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजला नाही असे माझे स्पष्ट मत आहे

  भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्यांचा काहीही दोष नव्हता अशा शिखांचे भीषण हत्याकांड झाली.तसेच नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केल्यावर काही ब्राह्मणांचीही घरे जाळली गेली. महात्मा गांधींशी पुणे करार न करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करून तसेच संकट बाबासाहेबांनी आपल्या समाजावर ओढवून घ्यायला पाहिजे होते काय ?.
  पुणे कराराने सांसदीय संस्थांतील राखीव जागांचे तत्त्व मान्य केले. परिणामी बाबासाहेबांनी घटनेत मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक सोयींची तरतूद करतानाच नोकरयाचे ही आरक्षण मिळवून घेतले, पण आजची खरी अडचण अशी आहे की, सरकार मागासवर्गीयांचा सरकारी सेवेतील अनुशेष भरण्याची टाळाटाळ करते. त्यांची पदोन्नती रोखून धरते. कहर म्हणजे महाराष्ट्र सरकारने अलीकडेच खासगी विद्यापीठ विधेयक संमत करताना त्यातून मागासवर्गीयांसाठी घटनेने मान्य केलेले आरक्षणच नाकारले. भारतीय राज्यघटना समतेवर आधारलेली आहे. घटनेनुसार नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मज्जाव आहे, पण प्रत्यक्षात राज्यकर्ते कधी राजकीय फायद्यासाठी, तर कधी गुणवत्तेच्या नावाखाली भेदभाव करून घटनेच्या समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.अशा प्रश्नावर देशातील तमाम सवलती घेणाऱ्या कामगार कर्मचारीवर्गाचे राष्टीय संघटना करून सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभे करून लढाऊ भूमिका न घेता काही संघटना 83वर्षाच्या पुणे कराराचा मुद्दा उपस्थित करून आपली शक्ती वाया घालवितात.आणि तमाम बहुजनांना मूर्ख बनवितात.पुणे कराराचा धिक्कार करण्या पेक्षा जे गांधी आंबेडकर यांना जमले नाही समजले नाही.ते आपण करून दाखवा.कोणते बहुजन आहेत?.त्याचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षणाची तयारी ठेवा आणि त्यांना एकत्र करा.

Thursday, September 24, 2015

भैय्यासाहेब स्मृतिदिना निमित्त आत्मचिंतन


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत कोणताही कार्यकर्ता आपल्या घरादाराची परवा न करता झोकून देत असतो.आणि चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याची कधीच खंत नसते.कारण त्याच्या नसानसात त्या बाबासाहेबाचे वैचारिक विचार भरलेले असतात.दलित शोषित वंचित समाजाच्या न्याय हक्क साठी ज्या डॉ बाबासाहेबांनी आपल्या स्वताच्या कुटुंबातील बायको मुलाची परवा न करता रात्र दिन अभ्यास करून संघर्ष केला.बाबासाहेब नावाच्या ज्ञानसुर्य आणि रमाई नावाच्या त्यागमुर्तीच्या पोटी १२ डिसेंबर १९१२ ला जन्मलेले भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर.१७ सप्टेंबर १९७७ ला त्याचे निधन झाले  त्याच्या स्मृतिदिनानिमित्त आत्मचिंतन  
आज देश भरातील कार्यकर्ते नेते.आपल्या मुलाना सर्व सुविधा असताना त्याचे योग्य पालन पोषण करू शकत नाही.मग तेव्हा सर्व आर्थिक परिस्थती बेताची असताना बाबासाहेबांच्या अपेक्ष्यांच्या भाराने दबून राहिलेले भय्यासाहेब.परीस्थितीतीने दिलेल्या चटक्यांनी जीवघेण्या आजाराशी अहोरात्र लढणारे भय्यासाहेब.बापाचे महापुरुषत्व पेलतांना स्वतःमधल्या सामान्यत्वाला बळी पडलेले भय्यासाहेब.बाबासाहेबांच्या महापरी निर्वाना नंतर स्वतःसोबत संपूर्ण परिवाराला समाजासाठी, धम्मकार्या साठी झोकून देणारे भय्यासाहेब.आणि गटबाजी गावकी भावकीच्या स्पर्धेपासून लांब राहू पाहणारे भय्यासाहेब त्यामुळे सदैव समाजातून दुर्लक्षित झालेले.त्यागाचा बळी ठरलेले.महापुरुषाचा वारसा लाभला असतांना उपेक्षिताचे जीवन जगणारे.समाजाच्या रोषाचे बळी ठरलेले भैय्यासाहेब आंबेडकर.
भय्यासाहेब लहानपणा पासूनच न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले होते. त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी मीराताईंशी झाले . भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले.त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला. त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता. नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते. बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा " थॉट ऑफ पाकीस्थान " हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ " फेडरेशन वेरसुस फ्रीडोम " हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित " बौद्धपर्व " हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर ते वापर करीत असत. भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झालेच पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते . महाडच्या चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला .चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी मुंबई महानगरपालिका कडे ४० बाय ४० ची जागा मागितली मुंबई महानगरपालिका ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला .अखेर मुंबई महानगरपालिका सुधार समिती ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . मागसवर्गीय फेडरेशन आणि रिपाई पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही मोठ्या प्रमाणत दान देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत पायपीट करून समाजाला दान देण्याचे आवाहन करीत होते. १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस " अमृत महोत्सव " म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले.या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ.बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून " भीम -ज्योत " "महु ते मुंबई " काढण्याचे ठरविले व २७ मार्च १९६६ रोजी "भीम -ज्योत " भारताचे मजूर मंत्री ना.बापू जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले. बाबासाहेबांच्या महापरी निर्वाणा नंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. "भारत बौद्धमय करीन " हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला होता.भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधान परिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. " बौद्ध जीवन संस्कार पाठ " या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव "महापंडित काश्यप " असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले " आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा " आपण आमच्या सोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ . स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले " मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा .महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले होते . जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व कसे उभारायचे. याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली होती. हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही. हीच खरी शोकांतिका ठरली. याच गृहीतकांवर आधारित भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू सापडू शकतील.त्याच प्रमाणे आजच्या सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्याच्या कार्यकर्त्याच्या मुलामुलीचे नाही नाना प्रकारच्या तडजोडी करून मुलाचे लाड पुरविल्या जातात.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तीमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडतांना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिपेक्षात परीस्थितीतीय बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंठकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांनी बाबासाहेबांच्या परि भाय्यासाहेबावाराची केलेली ही प्रतारना आहे. बाबासाहेबांनी या समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड अश्याप्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराची (मुलाची) प्रतारना करून जर आम्ही करीत असू तर आम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहतो का ? भैय्यासाहेबांच्या स्मृती दिना निमित्य आपण पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.भैय्यासाहेबांच्या  स्मृतिदिना निमित्य त्यांना कोटी कोटी प्रणाम 

विषमतावादी शिक्षक दिन

विषमतावादी शिक्षक दिन
भा
रत हा विषमतावादी विचारांचे पारंपरिक रीतिरिवाज साजरे करणाऱ्या जातिवादी शिक्षण देणाऱ्याचे समर्थन करणारा देश आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.कारण  देशातील सर्व शिक्षण संस्था डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतात पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात.
   डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केल्या जातो. पण आता मानसिक गुलामगिरिच्या एक एक श्रृंखला तुटत आहेत गुलामगिरीची असंख्य प्रतिक आता लवकरच संपणार आहेत पण त्यासाठी गरज आहे वैचारिक प्रबोधनाची. देशातील बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता जोतीराव फुले आहेत हे ठाम पणे मांडणारे शिक्षक आणि विद्यार्थी तयार होणार नाहीत तो पर्यन्त शासकीय डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन साजरा होत राहील.
   राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे.असे डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी लिहलेल्या चरित्र ग्रंथात सांगितले आहे (संदर्भ - as Radhakrishnana a Biography -Page 10) म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते... जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरु केली होती. १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली होती म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केली म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते आणि आहेत. जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केली नाही. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुळेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली. शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले.शिक्षणा अभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे.याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा त्यांच्या तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता... तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या म्हणजे देशातील पाहिले शिक्षक हे राष्टपिता महात्मा जोतीराव फुलेच होते. डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केली नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही. बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास ब्राम्हण लोकांचा तिव्र विरोध होता.त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविणाऱ्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही.किंवा मुला मूली कडून कोणतीही फ्री घेतली नाही गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले.यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान दिले नाही.त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले या पाठीमागे त्यांची किती तळमळ होती हे लक्षात घ्या कारण त्यांना समाजसेवा करायची नव्हती तर समाज परिवर्तन करायचे होते.
    डॉ.राधाकृष्णन यांनी बहुजनांसाठी विनावेतन तर सोडाच पण वेतन घेउन देखिल शिकविले नाही.याउलट भरपूर पागार घेउन फक्त उच्चभ्रू समाजाच्या मुलांना शिकविले. उच्चभ्रू समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते मद्रास, हैद्राबाद, कलकत्ता, बनारस इ. विद्यापिठात गेले.पण एकाही खेड्यात जाउन बहुजनांच्या मुला-मुलींना शिकविले नाही.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षते खाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले होते.तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर ब्राम्हण शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.गोर-गरीब, कष्टकारी, कामगार,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले.असे काम डॉ. राधाकृष्णन यांनी कधीच केले नाही.तरी शिक्षक दिनाचे हक्कदार कसे?.
   राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली. डॉ. राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केला. त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला होता. त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान नाही काय?.जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तज्ञ होते.खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केली.त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर टाटा, बिर्ला, अंबानी पेक्षा तात्याराव श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या होत्या.बहुजनांना शिक्षण मिळाल्या शिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव यांनी शाळा सुरु केल्या. डॉ.राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मिळकतिचा एक रुपया देखिल बहुजनांच्या शिक्षणांसाठी खर्च केला नाही. देशातील ज्वलंत समस्या निवारण्यासाठी जोतीरावनी सनातनी ब्राम्हण समाजा विरुद्ध निर्भयपणे लढा दिला.
  जोतीराव यांनी बालविवाह ला कडाडून विरोध केला तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांचा विचार न करता ११ ते १६ वर्षी केली त्यांच्या मुलीने नवरय मुलाला साधे पाहिले देखिल नव्हते. म्हणजे संपूर्ण जगात तत्वज्ञानावर व्याख्याने देणाऱ्या अमेरिका, इंग्लड, रशिया इ. राष्ट्रात प्रदीर्घ वास्तव केलेले असताना देखिल स्वतःच्या मुलींचे त्यांनी बालपणीच विवाह केले.विवाहा बाबत ते म्हणतात की लग्न ही स्वर्गात ठरवली जातात म्हणजे ते किती सनातनी प्रतिगामी विचारांचे होते यावरून दिसून येते.या उलट जोतीराव यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठविला होता.आणि समाजात जनजागृती केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला आणि वाढविला. तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे होते ते आज ही सर्व मानव जातीच्या कल्याणा करीता वापरता येते.डॉ.राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी "राधाकृष्ण अ बायोग्राफी" या ग्रंथात डॉ. राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे क्रांतिबा जोतीराव फुले कुठे आणि हे डॉ राधाकृष्ण कुठे?.

डॉ राधाकृष्ण यांचा समाज त्यावेळी झोपला होता पण आज सर्वत्र जागा आहे.ज्या स्रियांना शिकण्यासाठी बंदी होती.त्याच समाजाच्या स्रिया आज शिक्षणात पुढे आहेत.त्याच्यावर जोतीराव आणि सावित्रीबाई जे उपकार केले आहेत ते या स्रिया विसरतात.हे फुले दांपत्य जर नसते तर ब्राम्हणाच्या स्रिया कुठे असत्या ?.या स्रियांना त्याच्या समाजातील पुरुष किती किंमत देतात यांना नाही.पण जोतीराव फुले यांनी सावित्रीबाई ना कधीही स्त्री म्हणून गौण लेखले नाही.याउलट त्यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर केला त्यांच्यावर विश्वास ठेवला.जोतीराव यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व प्रकारे मदत केली जोतीराव सावित्रीमाई यांना नेहमी अहो-काहो असे आदराने बोलत असत.डॉ राधाकृष्णन यांनी मात्र त्यांच्या पत्नी शिवकम्मू यांना स्वातंत्र दिले नाही त्यांना शिकविले नाही म्हनुनच त्यांचे व्यक्तिमत्व कोमेजुन गेले.स्त्री शिक्षणासाठी एकही कार्य राधाकृष्णन यांनी केलेले नाही.जोतीराव यांनी स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र व शिक्षण तर दिलच पण देशातील सर्व जातिधर्माच्या मुलींना शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी दिले,ती प्रचंड संघर्ष करून  म्हणून त्यांच्या शाळेत शिकणारी मातंग समाजातील विद्यार्थिनी कु.मुक्ता साळवे ही धर्माबाबत अप्रतिम निबंध लिहू शकली.जोतीराव यांच्या स्त्रिस्वातंत्र्याचे हे फल आहे तर डॉ. राधाकृष्णन यांचे मात्र स्त्रियांबाबताचे विचार हे खालच्या पातळीवरचे होते. स्त्रियांमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता जास्त असते सेवावृत्ति हीच स्त्रियांची मूळ प्रवृत्ति आहे.असे म्हणण्या मागे मला नाही वाटत की त्यांना स्त्रियांबद्दल काही सहानभूति होती ते यामागे स्त्रियांना गुलाम ठेवणे हाच हेतु त्यांचा आहे. तरी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार की शिक्षणाचे महत्व समजावून सांगणारे व स्वखर्चाने शाळा काढून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करा. याचा सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून विचार करा व निर्यय घ्या तुम्हीच विचार करा कि खरा शिक्षक दिन कोणता राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर कि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर  ?? (संदर्भ-  राधाकृष्ण अ बायोग्राफी - Page 10,)

पुणे करार धिक्कार करण्या पूर्वी

पुणे करार धिक्कार करण्या पूर्वी 
भारत देश स्वत्रंत झाला तेव्हा समतावादी लोकांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच होती.आणि विषमतावादी लोकांची व संघटनाची संख्या खूप मोठी होती.तेव्हा सातासमुद्रापार ब्रिटीश सरकार बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम मागसवर्गीय समाजाच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी वैचारिक संघर्ष करीत होते.त्यांनी जगातील विद्वानां समोर भारतातील बहुजन समाजाची सत्य परिस्थिती मांडली  होती.त्यामुळे त्याच्या संघर्षाला यश प्राप्त झाले होते.हा इतिहास वाचून कोणी बदलू पाहत होता.ज्याला हे ऐकणे व वाचणे अशक्य झाले होते.त्यांनी पुण्याच्या जेल मध्ये आमरण उपोषण सुरु केले.त्याचा शेवट २४ सप्टेंबर १९३२ ला पुणे येथे झाला.म्हणून त्याला पुणे करार असे म्हणतात.तो करार एम के गांधी आणि डॉ.बाबासाहेबा आंबेडकर यांच्यात झाला.त्याचा धिक्कार खुद बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.पण तडजोड करून.
  बामसेफ,मूलनिवासी,अम्बस,भारत मुक्ती मोर्चा सारख्या काही संघटना,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार आणि आंबेडकरी चळवळ दुषित करण्याचा जीवतोड मेहनत करीत आहे.पुणे करार सारखे विषय घेऊन गेल्या २५ -३० वर्षामध्ये आंबेडकरी चळवळी तील लोकांमध्ये जात आहेत. इतक्या वर्षात स्वतःलाच मुक्ती नाही देऊ शकले तर ते भारताला बहुजन समाजाला काय मुक्ती देणार ? विशिष्ट समाजाला लक्ष करून विविध जाती पाती जोडून शिकलेल्या पण तेवढाच प्रकारे स्वताच्या स्वार्था साठी लढणाऱ्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे अनेक समाज आंबेडकरी चळवळी पासून दूर जात आहे .गेल्या खूप दिवसापासून पुणे करार या विषयाचे अनेक व्याख्यान,परिसंवाद,देशभर भाषण देणारे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष समाजाला कोणताही फायदा देऊ शकला नाही.असे चित्र निर्माण करून त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असे यांना पुणे कराराचा धिक्कार करून दाखवून दयाचे असते.पण त्यावेळची परिस्थिती लक्षात न घेता.
  २४ सप्टेंबर १९३२ ला जो करार गांधी आणि बाबासाहेबामध्ये झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो.बाबासाहेबांनी केलेल्या काही मागण्यावर एम के गांधीचा प्रखर विरोध होता त्यामुळे त्या विरोधात गांधीनी  आमरण उपोषण सुरु केले होते त्यात महत्वाची बाब होती की अस्पृश्यांना वेगळ्या राखीव जागा आणि अस्पृश्यांसाठी २ मतदानाची मागणी, मतदानाचे दोनवेळा अधिकार हा इतर वर्गापासून विपरीत मागणी होती आणि त्यामुळे देशातील सर्व उच्च वर्णीय वर्गीय समाजात प्रचंड चीड त्यावेळी निर्माण झाली होती. ती आज ही अहमदनगर जिल्ह्यातील घटना पाहून दिसते.मग आठवा तेव्हा काय परिस्थिती असेल.पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या कडे खैरलांजी खर्डा जवखेडा,सोनई या भीषण हत्याकांडा बाबत कोणती ही ठोस भूमिका नाही.
   गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो समझोता झाला तो पुणे करार केवळ दोन व्यक्तिचा नव्हता तर समतावादी आणि विषमता वादी समाजातील होता. एकाबाजूला असंघटीत कष्टकरी हात मजुरी करणारा समाज तर दुसरीकडे या सर्व मागासवर्गीय समाजाचे शोषण करून आय्याशी पणे जगणारा समाज होता.त्यातील हा संघर्ष होता.
   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा आग्रह होता की, अस्पृश्यांना समतेचे सामाजिक व राजकीय हक्क त्यांचा एक निसर्गदत्त अधिकार म्हणून मिळाले पाहिजेत, तर महात्मा गांधी अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे भूतदयावादी दृष्टिकोनातून पाहत होते. बाबासाहेबांना अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा एक राजकीय हक्क म्हणूनच मिळाला पाहिजे, असे वाटत होते, तर महात्मा गांधी अस्पृश्यांना हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग मानीत होते. म्हणून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास त्यांनी प्राणांतिक विरोध केला. महात्मा गांधी हे स्वत:स तमाम अस्पृश्यांचे नेते म्हणवीत होते, तर बाबासाहेब गांधीजींचा हा दावा खोडून काढताना आपणच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहोत, हे ठासून सांगत होते.ब्रिटिश सत्तेने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यावर महात्मा गांधींनी येरवडा जेल मध्ये प्राणांतिक उपोषण करताना अशी भूमिका घेतली होती की,अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच एक अंग असल्यामुळे हिंदूंचे ऐक्य फुटणे आपणास मान्य नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मुस्लिम-शीख व ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे जर देशाचे व समाजाचे ऐक्य धोक्यात येत नसेल तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे ते कसे काय धोक्यात येऊ शकते? महात्मा गांधींनी तरीही आमरण उपोषण करून बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून द्यायला भाग पाडले व तत्कालीन विधिमंडळात 148 राखीव जागा तसेच स्पृश्य हिंदूंच्या जागांपैकी मध्यवर्ती विधिमंडळातील 10 टक्के जागा अस्पृश्यांना देण्याचे मान्य करणारा पुणे करार केला. 
   25 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या या पुणे कराराचा एक राजकीय फायदा असा झाला की, राजकीय पक्षांचे लक्ष अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे वेधले गेले. महात्मा गांधी मंदिर प्रवेशाच्या बाजूचे झाले. शिवाय पुणे करारामुळेच आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत यावर शिक्कामोर्तब झाले होते. बाबासाहेब आंबेडकर पुणे करारावर भाष्य करताना म्हणाले, ‘महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेतच अस्पृश्यांच्या राखीव जागांना मान्यता दिली असती तर गांधीजींवर उपोषणाची पाळी आली नसती.’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘पुणे करार हा अतिपवित्र असा करार मानून तो अस्पृश्य बंधूंनी सद्भावनेने आणि प्रामाणिकपणे पाळावा.’ पुणे कराराची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अशी असताना बामसेफ सारख्या काही संघटना पुणे कराराची नादानपणे धिक्कार करीत असतात. धिक्कार करणारांना एवढेही भान राहत नाही की, पुणे करार एकट्या महात्मा गांधींचा नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही आहे. त्या करारावर महात्मा गांधीं बरोबरच बाबासाहेबांचीही स्वाक्षरी आहे. तेव्हा आपण पुणे कराराचा धिक्कार करीत असताना कळत-नकळत बाबासाहेबांना कमी लेखून त्याचा हि धिक्कार करीत नाही ना ?.
  गांधी-आंबेडकर यांच्यात अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर तीव्र संघर्ष झाला हे खरे, पण म्हणून गांधी-आंबेडकर संघर्ष हिंदुत्ववादी संघ परिवारासारखा विखारी नव्हता. बाबासाहेबांनी महात्मा गांधींवर कठोर टीका केली, पण या टीकेचे स्वरूप दृष्टिकोनाची, विचारांची मतभिन्नता असी होती. बाबासाहेबांनी महात्मा गांधींबरोबर पुणे करार करायला नको होता असे आजही ज्यांना वाटते व आततायीपणे जे महाभाग पुणे कराराची होळी करून धिक्कार करतात त्यांनी हेही समजून घेतले पाहिजे की, वाटाघाटीत देवाण घेवाण करावी लागते. महात्मा गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध जेव्हा प्राणांतिक उपोषणची सुरुवात केली होती तेव्हा देशात स्फोटक वातावरण निर्माण झाले होते. बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यांच्यावर अत्यंत प्रक्षोभक आणि विखारी भाषेत टीका होऊ लागली होती. ‘त्या’ उपोषणात समजा, महात्मा गांधींच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर दलित समाजाचे काय झाले असते?. याचा कसलाही सारासार विचार न करता पुणे कराराच्या 83 वर्षांनंतरही आज काही अतिहुशार लोक या करारास विरोध करीत असतील तर त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजला नाही असे माझे स्पष्ट मत आहे

  भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्यांचा काहीही दोष नव्हता अशा शिखांचे भीषण हत्याकांड झाली.तसेच नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केल्यावर काही ब्राह्मणांचीही घरे जाळली गेली. महात्मा गांधींशी पुणे करार न करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करून तसेच संकट बाबासाहेबांनी आपल्या समाजावर ओढवून घ्यायला पाहिजे होते काय ?.
  पुणे कराराने सांसदीय संस्थांतील राखीव जागांचे तत्त्व मान्य केले. परिणामी बाबासाहेबांनी घटनेत मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक सोयींची तरतूद करतानाच नोकरयाचे ही आरक्षण मिळवून घेतले, पण आजची खरी अडचण अशी आहे की, सरकार मागासवर्गीयांचा सरकारी सेवेतील अनुशेष भरण्याची टाळाटाळ करते. त्यांची पदोन्नती रोखून धरते. कहर म्हणजे महाराष्ट्र सरकारने अलीकडेच खासगी विद्यापीठ विधेयक संमत करताना त्यातून मागासवर्गीयांसाठी घटनेने मान्य केलेले आरक्षणच नाकारले. भारतीय राज्यघटना समतेवर आधारलेली आहे. घटनेनुसार नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मज्जाव आहे, पण प्रत्यक्षात राज्यकर्ते कधी राजकीय फायद्यासाठी, तर कधी गुणवत्तेच्या नावाखाली भेदभाव करून घटनेच्या समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.अशा प्रश्नावर देशातील तमाम सवलती घेणाऱ्या कामगार कर्मचारीवर्गाचे राष्टीय संघटना करून सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभे करून लढाऊ भूमिका न घेता काही संघटना 83वर्षाच्या पुणे कराराचा मुद्दा उपस्थित करून आपली शक्ती वाया घालवितात.आणि तमाम बहुजनांना मूर्ख बनवितात.पुणे कराराचा धिक्कार करण्या पेक्षा जे गांधी आंबेडकर यांना जमले नाही समजले नाही.ते आपण करून दाखवा.कोणते बहुजन आहेत?.त्याचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षणाची तयारी ठेवा आणि त्यांना एकत्र करा.

Saturday, July 11, 2015

रमाबाई हत्याकांडाचे काय झाले?.

रमाबाई हत्याकांडाचे काय झाले?. 

महाराष्ट्र सध्या अहमदनगर जिल्हात दलित बौद्धा अन्याय अत्याचार च्या विरोधात आक्रोश मोर्चा काढल्यामुळे गाजतोय अहमदनगर जिल्ह्यात ज्या दलित बौद्ध तरुणाच्या हत्या झाल्या त्याबाबत जिल्ह्यातील आंबेडकरी संघटना पक्ष सोडल्यास कोणाला ही वाईट वाटले नाही.पण प्रचंड आक्रोश मोर्चा काढल्यामुळे त्याच्यातील सैतान माणूस जागी झाला ?.नेमके सध्या महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेवर आहे.ज्या रमाबाई नगरातल्या हत्याकांडा नंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं होत आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला. पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने ही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली होती .हे विसरता येत नाही. मनोहर कदम साररखा जातीवादी अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. शिवाय, मनोहर कदम याच्यामुळे रमाबाई नगरात झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपका ही आयोगाने ठेवला होता. असं असतानाही राज्य सरकारने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार र्वष लावली. या संपूर्ण काळात विविध दलित संघटना आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे अखेर २० डिसेंबर २००२ रोजी कदम याला अटक करण्यात आली. पण कदमने मात्र कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचं सांगत रूग्णालयात अटकेचे दिवस काढले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कदम पोलीस गणवेषात न्यायालयात हजर होत असे. त्याच्या या कृतीमुळे साक्षीदारांवर दडपण येत असल्याचा आरोप करत त्याच्या निलंबना साठी गजानन लासूरे आणि अनिकेत देशकर या दोघा वकिलांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मंजूर केली. गंभीर गुन्ह्यचा खटला सुरु असलेला पोलीस अधिकारी गणवेषात आणि सेवेत असल्यास लोकांचा फौजदारी न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल, हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं. पण खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे रमाबाई नगरवासीयांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता. 
   ११ जुलै 1997 ला जातीवादी हरामखोर राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम याने भ्याडपणे गोळीबार केला. या गोळीबरात सुखदेव कापडणे ,संजय निकम ,बबलू वर्मा, अनिल गरुड, किशोर कटारनवर, संजय कांबळे, विलास दोडके, मंगेश शिवसरने, अमन धनावडे, कौसल्या पाठारे असे 10 जण शहीद झाले होते तर 23 जण जखमी झाले होते.आज (११ जुलै) रमाबाई नगर, मुंबई हत्त्याकांडाचा स्मृतिदिन आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात रमाबाई नगर हत्त्याकांडात भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला भिमसैनिकांवरील मोठ्या अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय होता. स्वतंत्र भारतात वावरणाऱ्या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समाजावरचा  द्वेष जगासमोर आणणारी ही घटना होती. या हत्त्याकांडत अनेक भीमसैनिकांना, माया बहिणींना,आबाल वृद्धांना आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे भिमसैनिकांसाठी हा काळा दिवस आहे.
   रामबाई हत्याकांडा नंतर अनेक जनांदोलन झाली .नामांतर साठी १६ वर्ष संघर्ष झाला.खैरलांजी ते,जवखेडा,खर्डा,सोनई,शिर्डी अहमदनगर जिल्हा राज्यातील दलित बौद्ध समाजा करिता जातीवादी मानसिकता असलेल्या सैताना चा उगमस्थान झाला आहे.रमाबाई हत्याकांडा पासून शिर्डीच्या हत्याकांडा पर्यंत सर्व आंबेडकरी संघटना राज्यात तालुखा जिल्ह्यात आपसातील मतभेद विसरून जनांदोलन करताना पोलीस स्टेशन वर सनद शीर मार्गाने नोंद करतात.पण न्यायलाया कडून न्याय मिले पर्यंत सर्व पुरावे नष्ट केल्या जातात.आणि मुख्य आरोपी पुराव्या अभावी सही सलामत सुटतात.मग आमची तरुण मुले विचारतात बाबा रमाबाई नगरातील हत्याकांडाचे काय झाले?.
      रमाबाई हत्याकांडा करिता ज्यांनी ज्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.तेच मुख्य आरोपी झाले.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली तो आणि त्याचा मुख्य सूत्रधार कधीच समोर आला नाही.जनआंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नेते नंतर स्वताला पोलीस कोर्टाचे चक्कर काटून हैराण झाले आणि कांग्रेसवासी  झाले. त्यामुळे ते ना आंबेडकरी समाजाचे राहिले ना रिपाईचे. आज रमाबाई नगर घाटकोपर चा फेर फटका मारल्यास हेच का ते रमाबाई नगर असा प्रश्न पडतो .रमाबाई नगरातील ४५ मंडळा च्या तरुण कार्यकर्त्यांना भेटा आणि एकच प्रश्न विचारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि गोळीबार करणाऱ्या मनोहर कदमचे काय झाले?.रामबाई नगरातील गोळीबारत निरपराध भिमसैनिक मारल्या गेले.त्या शहीदाना विनम्र अभिवादन करण्या शिवाय आपल्याला पर्याय नाही.कारण ज्यांनी रमाबाई हत्याकांड ज्यांच्या आशीर्वादाने मनोहर कदम यांने घडविले त्याचेच सरकार आज आहे.आणि दुखची बाब हि कि ज्या नेत्याने समाजा कडून कृत्र्या सारखा मार खल्ला तेच मान्यताप्राप्त नेता आज त्याच्या मांडीला मांडी लावून शिर्डीच्या आक्रोश मोर्च्याचा निषेध करून शिवसेना तालुखा प्रमुख कमलाकर कोतेची हिंमत वाढवतो.त्यामुळे एक मनोहर कदम जरी जेरबंद झाला तरी हजारो मनोहर कदमचे आत्मे प्रमोद वाघाच्या रुपात समोर येत राहतील.रमाबाई ते शिर्डी हत्याकाड घडविणारी प्रवृत्ती गाडण्यासाठी बंद करा ती गटबाजी सर्वांनी एक व्हा भीमाचे लेक व्हा आणि शहीदा ना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्हा.

Wednesday, July 8, 2015

९ जुले दलित पंथरचा स्थापना दिवस

९ जुले दलित पंथरचा स्थापना दिवस 


    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण च्या नंतर दलित चळवळीचे नेतृत्व समर्थ हीन झाले.लाचार होऊन गटबाजीत अडकले तेव्हा त्यांना समर्थ पणे तोंड देणारी आणि गोरगरिबांच्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी धावून जाणारी जी तरुण तडपदार जहाल युवक चळवळ उभी राहली. दलितांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे दलित पँथर. अमेरिकेतील निग्रो कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॉक पँथर या संघटनेचा प्रभाव दलित पँथरवर होता. १९६६ साली ह्यू.पी.न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पँथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलँड येथे केली होती. दरम्यानच्या काळात त्यावर अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून येत असत. सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमधे ब्लॅक पँथर या संघटने विषयी उत्सुकतेपोटी चर्चा होत असे. वास्तविक अशा प्रकारच्या संघटनेने आपल नेतृत्व करावे यासाठी त्यांनी प्रयत्‍न सुरू केले.
    महाराष्ट्रात १९७० च्या आसपास दलित मागासवर्गीय जातींवरील अन्याय अत्याचारांनी कळस गाठला होता.या सगळ्याचा परिपाक म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली आणि पँथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई ) येथे ९ जुलै १९७२ रोजी भरली. बैठकीत स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार आणि रिपाई नेतृत्व अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले. १५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पँथरमधे प्रवेश केला.प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे विचारपीठ वाटत होती.    रिपब्लिकन नेतृत्व हे उच्च जात वर्गीयाचे दलाल झाले होते.तेच आंबेडकरी चळवळी चे मारेकरी ठरले कारण रिपाईचा प्रत्येक गट म्हणजे सत्ता धारयांनी निर्माण केलेले संस्थान आणि त्याचा नेता म्हणजे संस्थानिक होते आज भी आहेत.त्याच मुळे आंबेडकरी चळवळ कायमची गटबाजीत विभागल्या गेली.तिला कायम आमदारकी खासदारकी चे गजर दाखवीत झुंजवत ठेवण्याचे कसब सत्ताधारी धनदांडगे, जातदांडगे यांनी दाखविले आहे.
     १९५७ ते १९७० च्या साचेबद्ध दलाल,धोकेबाज प्रवृत्ती विरुद्ध दलित पंथर नांवाची वीज कोसळली होती.तिने सम्रग व्यवस्था बदलून टाकण्याची घोषणा केली होती आणि जगातील सर्व क्रांतिकारी लढयाशी आपले ऐतिहासिक नाते सांगितले होते विशेषता अमेरिकेतील निग्रो कृष्णवर्णीयाची क्रांतिकारी संघटना ब्लॉक पंथर चे आदर्श उराशी बाळगले होते.आणि आपले शत्रू व मित्र यातील नाते स्पष्ट केले.आणि फुले,शाहू,आंबेडकरी विचारांवर आधारित एक क्रांतिकारक कार्यकम दलित पंथर च्या तरुण कार्यकर्त्यांनी दिला होता.या उठावाने सत्तेवर हल्ला बोल केल्याने सत्ताधीश आणि त्याचे संस्थानिक दलाल दलित नेतृत्व आरपार हादरून गेले होते.परंतु सांस्कृतिक पातळीवर लढाऊ भूमिका मांडणारया दलित पंथरला उच्चजातवर्गीय शासन यंत्रणेने प्रचंड दमन करून खतम केले.
   कल करो सो आज, आज करो तो अभी, अशी भूमिका घेणारे सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणार्‍या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले जात होते.त्यामुळे शहरातील सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा तरुण खेड्या पाड्यातील अन्याय अत्याचार पाहून पेटून उटत होता..त्या अन्याय,अत्याचारला वाचा फोडण्यासाठी पुढेया आणि नेतृत्व करा असे कधीच कुणाला सांगण्याची गरज पडली नाही.स्वताहून तरुण स्थानिक पोलीस आणि प्रशासनाशी लढत होते.यामुळेच दलित पंथर चा इतिहास झाला.
पँथरने आपल्या जाहीर केलेल्या भूमिकेत म्हटले होते.दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला सार्‍या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने, शिक्षणातील उदारमतवादाने आमच्यावरील अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही. आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू. या प्रचंड समूहांतील संघर्षामधून क्रांतीची लाट येईल. सनदशीर अर्ज, विनंत्या, सवलतीच्या मागण्या, निवडणुका, सत्याग्रह यामधून समाज बदलणार नाही. आमच्या समाजक्रांतीच्या कल्पना व बंड या कागदी जहाजाला पेलणार नाही. त्या मातीत रुजतील, मनात फुलतील, पोलादी वहानातून सणसणत अस्तित्वात येतील -दलित पँथर या चळवळीचे लढाऊ आणि आक्रमक रूप म्हणून लोकांच्या पुढे आले होते.ज्यांनी हे मांडल ते त्यावेळी खूप प्रामाणिक होते.जेव्हा त्याच्या मुख्य उधिष्टा पासून दलित पंथर ची तरुण नेते मंडळी भटकली आणि दिशा हीन झाली.त्यांचे जिवंत पाणी थडग बांधल्या गेले.
    आज महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळी तील लोकांना वाटते दलित पंथर सारखी संघटना हवी.पण आज जी काही नेते मंडळी आहे ही सर्व दलित पंथर च्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा केलेले नेते आहेत. तडजोडी च्या राजकारणामुळे त्याकाळची रिपाई लाचार झाली होती.त्या पेक्षा जास्त सवाई बनेल नेतृत्व आज तालुखा,जिल्हा राज्यात निर्माण झाले आहे.आजची सर्व नेते मंडळी अन्याय,अत्याचार झाल्यावरच कामाला लागते, अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिलेला सनदशीर मुलभूत अधिकार त्यातून दलित मागासवर्गीय समाजाचा सर्वगिन विकास आणि कल्याण झाले पाहिजे.त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे कायदे,योजना याची माहिती आजचे कार्यकते आणि नेते घेत नाही.दलित पंथर नी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली भूमिका सर्वच विसळले आहेत. दलित पंथर सारखी संघटना हवी असेल तर त्याचा जाहीरनामा स्वीकारला पाहिजे दलित पंथर चळवळीत जे जे शहीद झाले त्यां सर्वाना दलित पंथर स्थापना दिना निमित्य विनम्र अभिवादन!.

Thursday, June 25, 2015

राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.
   महाराष्ट्र राज्यात विशेष मराठा समाजात आज ही राजर्षी शाहूमहाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात नाही.मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३२ कक्षा गेल्या २५ वर्षात शिवाजी महाराज , शाहूमहाराज समजावून सांगत आहेत.आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिल्यामुळे, विशेष मराठा समाजातील सत्ता धारयांच्या गोटात उलटा पालट झाली.यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.म्हणून मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा समाजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.
    सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संता, महंता, राजे, महाराजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.
   बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघड ठेवला.
     छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे.  
   बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळी तील लोकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.
   आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले.हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळी तील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आम्हाला शाहु महाराज,सयाजी महाराज, कबीर, महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले.आम्ही ते अभ्यासले म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतो.पण त्याचा अर्थ खेड्या पाड्या तील मराठा समाजातील लोक महार माजले त्यांना जास्त माझ आला असा काढतात.राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्य सर्व मराठा समाजाला नम्र आवहान आहे की प्रथम शाहु महाराज समजून घ्या त्यानंतर आपले खरे शत्रु कोण व खरे मित्र कोण हे समजून येईल.हीच राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्य सर्व बहुजन समाजाला विशेष मराठा समाजा ला विनंती.जयंती निमित्य सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!