हुकुशाहाच्या टाचे खाली प्रजासत्ताक दिन?.
२६ जानेवारी हा भारताचा ७४ प्रजासत्ताक दिन आहे.७५ व्या वर्षात आपण प्रवेश करणार आहोत.प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे.त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला पाहिजे.आणि काही नां तो आहे.म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती,गाव,विभाग,मोहल्ला,तालुका,जिल्हा, शहर,राज्य,आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्याउत्साहाने साजरा केला जातो.ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधाना नुसार देशाचा राज्य कारभार सुरु झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले.त्यासाठी २,९६,७२९ रुपये एकूण खर्च आला दररोजचा जमा खर्च त्यांनी लिहून ठेवला.२५ नोव्हेंबर १९४९ ती लिहलेली घटना सादर करण्यात आली त्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला? भारतीय संविधानामुळे.भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे.मग,ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मानसंविधान निर्मात्याला,जन्मदात्याला,घटनेच्या शिल्पकाराल दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा-कॉलेजानी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा.आज पर्यंत तसे कोणी केले नसेल.आता पासून आपण करूया.ज्यांनी केले व जे करीत आहेत, त्यांचा कित्ता आपण गीरवूया. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा, काही ठिकाणी अशी प्रथा सुरु झाली आहे आता आपण सुरु करूया,शासन सुरु करील याची वाट पाहत बसू नये.डॉ.बाबासाहेबां बद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया. आपण केले कि तो शासनाला निर्णय घ्यावाच लागतो. इंदू मिलचे आंदोलन आपणच केले ना? मग शासनाला जाग आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले. ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' आणि ज्या दिवसापसुन संविधांची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन '. २००८ पासून महाराष्ट्र शासनाने जीआर काढून २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात २६ नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा. असा जीआर काढावा. शासन करील तेव्हा करील. आपण मात्र आता पासून सुरुवात करू आणि डॉ.बाबासाहेब किती मोठे ही जगाने मान्य केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण यादेशातील जातीयवाद्यांना खुपते आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख टाळतात. अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात. डॉ.बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना.कारण डॉ.बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला. त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत असली पाहिजे.म्हणून तर ते डॉ.बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण,महत्व आणि कर्तत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्याच दिवशी हे जातीयवादी कपट कारस्थानाणे नवीन सण किंवा नवीन धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतु हाच की त्यादिवशी डॉ.बाबासाहेबांच्या मोठेपणाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये किंवा लोकांना कळू नये.उदाहरण द्यायचे झाले तर २६ जानेवारीचे देवूया. गेल्या ८ ते ९ वर्षापासून २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी सत्य नारायणाच्या महापूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवडे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत हि पूजा होवू लागली आहे.यापूर्वी २६ जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती? आणि आताच ती का घालण्यात येते? कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे. सत्यनारायणाच्या महापूजेचा आदेश दिला कोणी? व आला कुठून? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टर हून आला. कुणाला कळाले नाही. कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे.सरकारी कार्यालय,शाळा,कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण महापूजेचे महत्व वाढत आहे,वाढवीले जात आहेत. म्हणून भिमानुयायांचीही जबाबदारी वाढत आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे महत्व गर्जत आणि गाजत सांगितले पाहिजे. प्रजासत्ताक दिनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे.राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत.जातीयवाद्यांना डॉ. बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही. म्हणून ते डॉ.बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत.डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही.म्हणून ते आता सांगू लागले आहेत कि,भारताचे संविधान हे काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिले नाही.सात जणांच्य घटना समितीने लिहिले आहे.तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याच वेळी,तिथल्या तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठाम पणे सांगितले पाहिजे की, होय,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे.तेच संविधानाचे शिल्पकार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर,एन.गोपालस्वामी अय्यंगार,डी.पी.खेतान,कृष्णास्वामी अय्यर, बी.एल.मित्तल,के.एम.मुन्शी व सय्यद अहमद अब्दुल्ला हे सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते.घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते,तर डॉ.राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३८९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर) फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबाबदारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोघेजण परदेशात गेले.अन्य दोघे सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकचे निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता. उरले फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर.त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत.म्हणून आपण कुठे ही आणि केव्हा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना, 'भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर', असाच उल्लेख केला पाहिजे.कारण डि.लिट.कोणी ही मिळवू शकतो किंवा भारतरत्न किताब कोणाला ही मिळू शकतो.मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरच.अन्य कोणालाही होता येणार नाही.म्हणून प्रजासत्ताक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करूनच साजरा करावा !.लोकशाहीचे बोट पकडून काही लोक आज सत्ताधारी झाले आहेत. त्यांनी हुकूमशाही राबविण्यास सुरवात केली आहे.अशा वेळी आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या समाजाची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी मी मोठा तू मोठा असे करत बसण्या पेक्षा ज्यांच्या मागे खऱ्या अर्थाने जनमत आहे त्यांच्या सोबत राहिले पाहिजे.तरच आता च्या परिस्थितित मनुवादी मानसिकतेला आपण टक्कर देऊन उभे राहू शकतो.अन्यता गुलामगिरी आपणच लाधून घेण्यास जबाबदार असणार आहोत. दुसऱ्यांना दोष देता येणार नाही. प्रजासत्ताक दिनाचा अर्थ आपणास समजला असेल तर तश्या पद्धतीने आपणास वागावे लागेल.व्यक्तीगत,राजकीय गट बाजीचे मतभेद बाजूला ठेऊन सर्व समाजाने संघटित झाले पाहिजे आणि राजकीय पर्याय दिला पाहिजे. तरच भारतात प्रजासत्ताक सरकारे निवडून येतील.अन्यता ई व्ही एम मशीन द्वारे सर्व सरकारी यंत्रणा हुकुशाहाच्या टाचे खाली असल्यामुळे प्रजेला निपक्षपाती न्याय मिळणे अशक्य आहे.त्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवस अगोदर २२ जानेवारील जय श्रीराम चे वादळ निर्माण करण्यात आले आणि त्यात संपूर्ण देश वाहून गेला. वरुण जरी वादळ शांत वाटत असेल पण आत प्रचंड असंतोष आहे तो अजून शांत झालेला नाही.तो लोकसभेच्या निवडणूकी पर्यन्त घोंघावत राहील. याची सर्वच भारतीयांनी काळजी घ्यावी. आणि शांत राहावे यातच सर्वांचे हित आहे. म्हणून ७४ वर्षाचा प्रजासत्ताक दिन अर्थपूर्ण समजून साजरा करावा. ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९. भांडुप,मुंबई.
