डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक किर्तीचे स्मारक बनावे या करिता काही राजकीय नेते आपल्या चेल्या चापटयांना घेऊन आंदोलन करून सरकारला अडचणीत आणण्याचे काम करीत होते.त्या मागचा प्रामाणिकपणा किती आणि राजकारण किती हा मुख्य संशोधनाचा माझा विषय आहे.डॉ बाबासाहेबाचे विचार हे नेहमी क्रांतिकारी असत.समाज सेवा करण्या करिता त्यांनी कधीच काम केले नाही आणि करू दिले नाही समाज परिवर्तन हाच त्याचा मुख्य उदेश असायचा.आज आंबेडकरी चळवळ राजकारणाच्या गटातटात विभागली असल्या मुळे त्याच्या समाज परिवर्तनाच्या लढाईची धार बोथड झाल्याची काहीना वाटते.स्वार्था करिता काही नेते गोरगरीब कष्टकरी समाजाचा सौदा करून आमदारकी खासदारकी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात.तर काही नेते गोरगरीब कष्टकरी समाजाच्या मुलभूत समस्या वर न बोलता न लढता बहुजनाचे भावनिकदृष्ट्या नेते बनतात. त्यात ते अयशस्वी झाले कि सत्यापासून लांब पाळतात.ज्या समाजात आपल्याला राहायचे आहे. त्याच समाजाचे नेते म्हणून मिरवायचे आहे.त्याच समाजाच्या पोटा पाण्याच्या प्रश्नावर न लढता केवळ राजकीय महत्त्वकांक्षा बाळगून काम करणे म्हणजे आंबेडकरी क्रांतीकारी विचार आणि चळवळ नाही.माफ करा वाचका नो आणि भक्तानो १९२७ ते १९३६ पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई असंघटीत कष्टकरी शेतमजूर यांच्या स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याची होती.त्यामुळेच हा असुशिक्षित अज्ञानी असंघटीत कष्टकरी शेतमजूर चळवळीत हिरीरीने भाग घेत होता.तोच समाज आज खेडे सोडून शहरात आला.आणि असंघटीत बांधकाम कामगार झाला.खेड्यातील सालदारी गावकी, महारकी करणारा अल्प भूधारक शेतमजूर झाला.तोच या देशातील सर्वात मोठा मतदार आहे.आंबेडकरी चळवळी तील किती नेते या असंघटीत कामगार मजुरांना संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारा करिता लढतात.इंदुमील करिता जीवाचे रण करणारया नेत्यांना हे माहित आहे काय?.
इंदुमिल स्मारक शिल्पकार कोण?
इंदुमिल स्मारक शिल्पकार.भाजपच ठरणार आहे.कारण ते सत्ताधारी आहेत त्याचे नांव आणि कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहल्या जाणार आहे .त्याचा राजकीय लाभ ते अनेक वर्ष घेणार आहेत.आंबेडकरी चळवळी तील गल्लीबोळातील नेत्यांना किंवा स्वयम घोषित संस्थापक राष्टीय अध्यक्ष यांना आणि समाजाला मिळणार नाही या पुढे स्मारकाच्या वेगवेगळ्या समितीच्या सभासद पदा करिता त्यांना संघर्ष करण्याचा अधिकार ही त्यांना राहणार नाही. तुमच्या जागी तुमच्या समाजातील अन्य नेते जे भाजपच्या जनसंघटना,पक्षा मध्ये किर्याशील आहेत त्याची वर्णी लागेल.हे जागृत समाज बांधवानी विसरू नये.कामाची सुरवात झाली नाही तर बाबासाहेबाचा पुतळा किती उंच असेल?. एक हात वर एक हात मागे कि एक हात वर एका हातात संविधान ?.भव्य गार्डन कि स्मारक काहीच स्पष्टीकरण नाही.आंदोलन करणारे नेते दररोज एक चुक पुढे करून सरकारला धमकी आणि इशारा देत आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार मानणारा समाज संविधानच मानत नाही असे म्हटल्यास काही भक्तांना राग येणे स्वाभाविक आहे.म्हणून मी फक्त इथे इंदुमील स्मारक आणि सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलना बाबत काही लक्षवेधी घटना कडे लक्ष वेधू इच्छितो. सत्ताधारी राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्या शिवाय काही आंदोलन यशस्वी होत नाहीत.अन्यता प्रसिद्ध कामगार नेते विजय कांबळे शरद पवार साहेबाचा आशीर्वाद घेऊन कधीच इंदुमिलचे शिल्पकार झाले असते.
6 डिसेंबर 2011 ला आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलचा ताबा घेतला कसा घेतला. आणि हा ताबा जवळ जवळ 18-19 दिवस कसा राहिला होता. सहा डिसेंबर हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापारीनिर्वाण दिन म्हणून देशा विदेशातील लोक ३ डिसेंबर पासून दादरच्या चेत्यभूमी ला मानवंदना देण्या करिता दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक येतात.नेमखे पाच आणि सहा तारखेला कोणत्याही गल्लीबोळातील नेत्याने या दिवशी जनआंदोलन केल्यास त्याला आणि त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पकडून जेल मध्ये टाकु शकतात पण त्याला नेत्याला अटक केल्यास आंदोलन चिगळून हिंसाचार,जाळपोळ होऊन निरपराध माणसाचा बळी जाऊ शकतो.(भारतीय सविधाना नुसार) ५ व ६ डिसेंबर २०११ ला असे आनंदराज आंबेडकर यांच्या आंदोलनकर्त्या सोबत पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर काय घडले असते?. याचा विचार करताच अंगावर काटा उभा राहतो.चेंगराचेंगरीत किती लोक घायाळ झाले असते?.कितीचा बळी गेला असता?.त्यातून एकाच वेळी आठवले साहेब,कवाडे सर,बाळासाहेब इतर नेते संपविण्या साठी सर्व कॉंग्रेस प्रणीत मिडिया काम करीत होती. त्यातून एकमेव नेते म्हणून आनंदराज राष्टीय नेते झाले असते त्यासाठी कॉंग्रेसने मुंबई ते दिल्ली पायघड्या टाकल्या होत्या.त्याला शरदचंद्र पवार साहेबांनी कसा सुरुंग लावला याचे वर्णन त्याकाळचे मान्यता प्राप्त वर्तमान पत्र तपासून पहा.समाजावर होणारया अन्याय अत्याचाराच्या लक्षवेधी घटना असताना त्यावर संघशक्ती निर्माण करून इतर नेत्या पेक्षा वेगळे अस्तीस्व निर्माण करणारा नेता समाज परिवर्तनाची योजना घेऊन समाजात जातो.तो खरा नेता असतो.कोणती हि योजना नसताना नेता बाण्याचा हा शॉटकट सध्या आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण करीत आहे.यावर बोलणे आणि लिहणे म्हणजे जीवाची बाजी लावणे आहे.
इंदुमील चे जागतिक किर्तीचे स्मारक कसे बनेल ?. या सरकारने जागतिक कीर्तीच्या वास्तू विशारद कडून गोबल टेंडर मागविले पाहिजे होते.तसे न करता चेत्यभूमी विकास आरखडा ज्या शशी प्रभूनी बनविला त्याला सर्व पक्षीय नेत्यांनी आणि जाणकारांनी प्रचंड विरोध केला.त्यालाच इंदुमील स्मारक करिता वास्तू विशारद म्हणून नेमणूक केली.म्हणून या सरकारची पुढील रणनीती,आराखडा काय असेल याची कल्पना करण्यास हरकत नाही.कॉंग्रेस सारखे भिजत घोगळ ते ठेवणार नाहीत त्यांना जे हवे ते लवकर पूर्ण करतील. आणि देशातील दलित बहुजन समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार जो एक वर्ग आहे.त्याचे समर्थन मिळवतील.दलित बोद्ध इतर सर्व मागासवर्गीय जाती जमातीला ते पक्ष संघटनेत प्राधान्य देऊन आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी विचाराचे समर्थन करणाऱ्यांची गोची करतील.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घर आणि इंदुमील स्मारक यांचे ते शिल्पकार ठरले आहेत..त्याला दिशाहीन झालेला बोद्ध समाज आणि राजकीय स्वार्थाने पछाडलेले नेते जबाबदर आहेत.यावर एकच उपाय असंघटीत कामगार असलेल्या समाजानी संघटितपणे सुशिक्षित,सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना बाहेर कडून राजकीय गटबाजी संपवण्यासाठी विभागा विभागात बैठका घेऊन एक पक्ष,एक नेता,एक उमेदवार निवडणे.स्वतचे मतदार संघ तयार करून निवडणूक लढविणे.मग बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारता येईल.साडेबारा एकर साठी ज्या नेत्यानी जो संघर्ष केला तोच स्वताचे मतदार संघ बांधण्या साठी केला असता तर आज चित्र वेगळे असते.उतर प्रदेशात मायावतीने १२०० एकर भूमी वर महापुरुषाचे भव्य स्मारक बनविले.त्या करिता किती जनआंदोलन करावा लागला?.इतिहास वाचा.बाबासाहेबांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून सतत गौरवने सोपी आहे.त्याची अंमलबजावणी करणे सोपी नाही म्हणून आम्ही शासन करती जमात न बनता आंदोलन करणारी जमात बनत राहिलो.आता हे थांबविले पाहिजे दहावीस वर्षांनी तरून मुलांनी आपल्या वडीलधारयांना विचारले कि इंदुमील स्मारकाचे शिल्पकार कोण त्यांच्या जवळ कोणते उतर असेल?.समाजातील थोर विचारवंत,साहित्यिक,शोध पत्रकारिता करणारे पत्रकार काय इतिहास लिहून ठेवतील ?.कोणत्या बाबत आपले एकमत होते आणि आहे.आमचे आईवडील आजोबा असुशिक्षित अज्ञानी होते तरी ते आंबेडकरी चळवळीच्या मागे उभे राहिले म्हणून मी आज मान्यताप्राप्त नेत्याच्या विरोधात लिहू व बोलू शकतो.आजची युवा पिढी जिथे गूढ खोबर,आणि होडींगवर फोटो,बिर्याणी बियर,रम होडका मिळेल तिथे आपली शक्ती खर्च करताना दिसते.त्याचा एकाही नेत्यावर विश्वास राहिला नाही.त्यांना योग्य मार्ग दाखविणे गरजेचे आहे ते आव्हान कोणी स्विकारण्यास तयार नाही सर्व शॉटकट स्वीकारतात मग चळवळी चे होणार काय ?.