कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई !.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ २००७ ला पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला.देशातील पहिली दलित महिला देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय दलित महिला नेता ठरली.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे.उतर भारतात कांशीराम यांनी जी समाज प्रबोधनाची मोहीम राबविली त्यामुळेच कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई असा नारा दिल्या जातो.
महापुरुषाची विचारधारा सांगणारी जी बसपा देशातील बहुजन समाजाला जागृत करून सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!." ती बसपा २०१२ च्या विधान सभा निवडणुकीत चारीमुंड्यचीत झाली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उरलीसुरली प्रतिष्ठा मातीमोल झाली.त्यामुळे देशातील दलित समाज आपल्या १९३२ च्या परिस्थितीत होता तिथे येऊन थांबला.ज्या चातुर्वर्ण्य,मानुवादाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात.आणि त्याचा वापर समाजाला तोडणारया हत्यार म्हणून कसा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि सयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे दलित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.
कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही.सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे जिल्ह्याला दिली म्हणजे बहुजन समाजात आर्थिक क्रांती झाली नाही.त्यामुळे दलित समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले "जिसकी संख्या भारी,उतनी उसकी भागेदारी" संपली.जिसका पैसा भारी उतना उसका पद भारी झाली.त्यामुळे घरादाराची परवा न करता बसपा साठी काम करणाऱ्या जीवदानी कॅडर चे मरण झाले.आणि त्यामुळेच चमचा युग काय करू शकते.हे २०१२ च्या निवडणुकीने दाखवून दिले.
मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून मान्यवर कांशीराम यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने देणगी,बुद्धी,वेळ आणि पैसा मिळविला त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात हि सायकलवरून झाली.पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली.त्यामुळे ते खूप कोध्रीत झाले.त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले व सायकल मिळवून दिली.तेव्हा ते खूप खुश झाले.मनोहर काटे या कार्यकर्त्याना सांगितले सायकल हि माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.
कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने अशे धाडस केले नाही.कांशीराम यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.
कांशीरामजी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करतात.आमदार,मंत्रीमंडळ, कैबिने टचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात.कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समजतील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समजतील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा मान्यवर कांशीराम यांच्या स्मृर्ती दिनी बहुजन समाजाला विसरता येत नाही
No comments:
Post a Comment