कोकणात तीन दिवसांचा माझा हा तिसरा दौरा झाला, तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळ सांगून कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वतंत्र मजदूर युनियनशी विचारांने जोडणे हाच प्रमुख उद्देश होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सफाई कामगारांची पहिली युनियन स्थापन केली ती १९३४ ला त्यावेळी बहुसंख्येने सफाई कामगार हे कोकणातील होते आणि आजही महानगरपालिका मध्ये घन कचरा व्यवस्थापन सह इतर विभागात कोकणातील कामगार माणूस लक्षवेधी संख्येने आहेत. गावकी भावकीत तो जो शिस्तबद्ध असतो, तसाच तो आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीत नेतृत्व करण्यासाठी लक्षवेधी असला पाहिजे होता.कारण त्यांचे वडील आजोबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते, तोच त्यांना प्रेरणादायी आदर्श असला पाहिजे होता. कोकणातील माणूस कधी कधी गर्वाने सांगतो बाबासाहेब आंबेडकर कोकणातील होते. आंबावडे,त्यांचे मुळगांव, रमाईचे जन्म गांव वनंद,मंडणगड, दापोली रत्नागिरी जिल्हा हे सर्व चळवळीचे प्रमुख प्रेरणादायी केंद्र आहेत.त्याच पद्धतीने कोकणातील महाड चवदार तळे आंदोलन दोन कारणाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले आहे. एक चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह तर दुसरे मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन. त्यामुळेच कोकण विभाग हा आंबेडकरी चळवळीचा प्रथम संघटन, सत्याग्रह,आंदोलन, संघटन कौशल्य,वक्तृत्व नेतृत्व घडविणारे केंद्र समजले पाहिजे.परंतु असे काही मला दिसले नाही.
Friday, March 5, 2021
लीडर जन्माला येत नाहीत,ते घडवावे लागतात.
मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?.
मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?.
महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा आणि मराठी माणसावर प्रेम व्यक्त करण्याची यांची पद्धत समजून घेतले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा हे कुसुमाग्रजांच्या जन्म पासून झाली. ते सर्व देश मान्य करतो मग महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती यांची जन्म तारीख तीस बत्तीस वर्षांनी इतिहास संशोधक विचारवंत्यांच्या समितीनी १९ फेब्रुवारी हीच रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता तो अजूनही मराठी भाषा आणि माणसांचे हृदय सम्राट आणि त्यांचे वैचारिक गुलाम सैनिक शासन निर्णय मान्य का करीत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज मराठी नव्हते काय?.त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.त्यांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, जेधे,जवळकर हे मराठी माणसं नव्हते त्यांची भाषा मराठी नव्हती?. राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ पंजाबराव देशमुख हे मराठी माणसं नव्हती काय?.त्यांची भाषा मराठी नव्हती काय?.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले असे खूप गौरवाने सांगितले जाते. त्यांनी आपल्या मातृभाषेला गौरव प्राप्त करून दिला असे म्हटले जाते.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात मराठी मातृभाषा वापरल्या जात होती असे इतिहास सांगतो.आणि सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आज ते सत्य मराठी भाषा वापरात होती हे मान्य करतात.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियात छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा व गिरणी कामगारांच्या जीवनावरील "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते कायली" लावणी किंवा फकडं कोणत्या भाषेत गायिली होती.शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर,शाहीर साबळे संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह आंदोलने यात जनजागृती करणारी भाषा मराठीच होती. व प्रबोधनकार ठाकरे यांची भाषा मराठीच होती म्हणजे मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?.खरा इतिहास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.महाराष्ट्र राज्य व मराठी,मराठी भाषा आणि मराठी माणूस जातीमुळे गौरविण्यात येतो. आता तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाने जागे झाले पाहिजे,मराठी भाषा मराठी शाळा वाचल्या तर मराठी माणूस वाचेल अन्यता महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणूस उपरा ठरणार आहे.मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे ?.परप्रांतीय बिल्डर, ठेकेदार भांडवलदार यांना मदत करून आपल्याच घरादारावर जेसीबी चा नांगर फिरवतील.मराठी माणसा जागा हो छत्रपतीचा मावळा हो!.जात,धर्म,पंथ विसरून स्वराज्य निर्माण करण्याचा धागा हो.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई,
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना, संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन.
