Wednesday, May 20, 2015

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ आणि समाज चालला कुठे ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ आणि समाज चालला कुठे ?
      धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ५८ वर्ष पूर्ण होत असताना.त्यांनी दिलेले धम्म आज हि समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे हि राहलो असे म्हणता येत नाही.बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा  असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती,नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होते. मातृसंस्था चे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे पाहतात.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभाव च्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात.त्यामुळे आम्ही " बुद्ध आणि त्याचा धम्म " हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व आंबेडकरी चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकराणी असंघटीत अशिक्षित दलित शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित दलित शोषित समाजाची काय अवस्था असेल.या चिंतेने ते सतत तळमळत.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्या साठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला.इंग्लंड ,अमेरिका,रशिया,या सारख्या देशातून उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला.आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद ,संघटना,व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही.कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.आजचे नेते एका आमदार,खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती धम्मभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमी च्या वापराची [व्यापराची ] 
     त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे दलित शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त(अंधश्रद) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.मनुस्मुर्ती जाळली,महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश महणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले ,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली. दलित शोषित समाजाला  स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविणार.आणि आज खरेच दलित शोषित समाजात जास्तीच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकर समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाले.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखळ्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.
  माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही "बुद्ध आणि त्याचा धम्म " वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्तरंजित सामाजिक धार्मिक क्रांती केली.आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये.तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे . याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता "सर्वधर्मसमभाव "ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.
     बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो.शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला, काल्पनिकतेला,कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे ?.याचे गांभीर्याने विचार झाला पाहिजे.

बाबा तुमच्या चळवळीची कशी दुर्दशा झाली

बाबा तुमच्या चळवळीची कशी दुर्दशा झाली


    निसर्गाचा नियम आहे जो जन्मा येतो.तो एक दिवस मृत्यू पावतो.निसर्ग नियमाने सर्वच प्राणी माणस जगतात काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्या साठी खातात.कोण किती दिवस जगला त्याला काही महत्व नाही.कसा जगला आणि काय केले त्याला जगात खूप महत्व आहे.भारतात असा एकमेव व्यक्ती आहे जो केवळ एक पाव खाऊन व दोन गिलास पाणी पिऊन शिक्षण घेत होता त्याच्या त्या परिश्रमाने त्यागाने त्याने आपले नांव अजरामर करून ठेवले तो जाऊन आज ५८ वर्ष झाले तरी त्याला देश विसरल्याला तयार नाही. असा एकमेव पुरुष नव्हे तर महापुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर त्याच्या मृत्यूला महापरिनिर्वाण दिन म्हणतात.तो बहुजन समाजा करिता दुखाचा दिवस आहे असे म्हटल्या जाते पण गेल्या काही वर्षा पासून महार,दलित,बौद्ध समाज व त्याच्या संस्था,संघटना,पक्ष महापरीनिर्वाण दिन आहे हे विसरले  आहेत. महापरीनिर्वाण दिनाला जत्रेचे स्वरूप आले आहे. म्हणून म्हणतो बघाना बाबा तुमच्या चळवळीची कशी दुर्दशा झाली  
     डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार समाजाने वाजोटे ठरविले आहेत. या देशातील विविध जाती धर्माचे प्रांताचे लोक भारतीय संविधानाने एकत्र राहू शकतात असे अनेक विचारवंत सांगतात. हे जर शंभर टक्के खरे आहे.तर आंबेडकरी समाज एकसंघ का राहू शकत नाही.ज्यांनी ज्यांनी संविधान स्वीकारले त्याचा स्वभिमान जागा झाला आहे. त्याचे कल्याण व विकास झाला आहे. त्यामुळेच विविध संस्था,संघटना,पक्ष निर्माण होतात चौकटीत काम केले तर वाढतात.नाही केले तर संपतात.बाबासाहेबाच्या समता सैनिक दलाच्या धर्तीवर राष्टीय स्वयंसेवक संघ(आर एस एस ) निर्माण झाली असे सांगितल्या जाते.त्याच्या हजारो वेगवेगळ्या संस्था संघटना असल्या तरी त्याचे सामाजिक,शौक्षणिक,राजकीय उधिस्ट एक असते.म्हणून ते किती हि वेगवेगळे असले तरी एक असतात.या उलट आंबेडकरी चळवळीचे झाले आहे.ते विचाराने कितीही एक असले तरी ते कधीच एक नसतात,मग तो अन्याय,अत्याचार,हत्याकांडाची रमाबाई ,खैरलांजी,सोनई,खडी,जवखेडा असो.ते वेगवेगळे लढणारच. मग सांगा यांना एक बाबासाहेब मान्य आहे काय?. त्याच बाबासाहेबांनी लिहलेली भारतीय राज्यघटना,संविधान यांना मान्य आहे काय?.जर हे मान्य असेल तर कोणत्याही कुटुंबाची दुर्दशा होणारच मग ते प्रकाश असो की आनंद, उद्धव असो कि राज,तशी चळवळीची ही दुर्दशा होणारच कारण त्याला कोणतीही निमावली लागू नाही.
  महापरिनिर्वाण दिन एकाच महापुरुषाचा देशात मानला जातो.देशात अनेक सम्राट ह्र्दय सम्राट झाले.त्याचा स्मृर्तीदिन कधी आला आणि गेला तो कोणाला कळत सुद्धा नाही.पण डॉ.बाबसाहेब आंबेडकर असे महामानव आहेत त्याच्या स्मृतीदिनाची जगात दखल घेतल्या जाते. त्याच्या त्या महापरीनिर्वाण दिनाला काही लोक मोठ्या प्रमाणात गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. कोण आहेत ते ?.शिवाजी पार्क आणि परिसरात खेळणे,कपडे विकू नये असे सांगितल्या जाते.तरी मोठ्या प्रमाणात दुकाने का लागतात.मग दुकानदार कोण व खरीददार कोण?.कॅसेट सीडी चा मोठा आवाज करून गोंगाट करू नका असे पोलीस विनती करून सांगतात.तरी त्यांना न जुमानता आवाज करणारे कोण?.संविधानाच्या कलमानुसार पोलिसांनी कारवाई केली. तर काय होईल?.यावर चळवळीच्या नेत्याचे नियंत्रण आहे काय?.काय करते महापरीनिर्वाण समन्यव समिती ?.चैत्यभूमी विकास समिती ?.हे काही करू शकणार नाही.कारण यांना संविधानच मान्य नाही.काही कार्यकर्त्याची,नेत्याची वर्षभराची कमाई {एक ते आठ डिसेंबरमध्ये} या मधून होते असे अनेक अधिकारी खासगीत सांगतात.त्यामुळे महापरीनिर्वाण दिनाला हिणकस वळण लागताना दिसत आहे.त्याला एक नेता,एक संघटना,एक पक्ष जबाबदार नाही.त्याला जबाबदार आहे आंबेडकरी चळवळ आणि समाज जबाबदार आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीची दुर्दशा झाली.
चळवळीची दुर्दशा होण्यासाठी काही कॉम्रेड नी हातभार लावला असे म्हणणे चूक ठरणार नाही.इतर समाजाला महापरीनिर्वाण दिवसाचा खूप त्रास होतो,त्यांना एवढी गर्दी पाहून धडकी भरते ते माणस आहेत हेच काही लोकांना मान्य नाही त्याच्या अंगावरील कपड्याचा घाण वास येतो ते परिसारत घाण करतात.असे अनेक आरोप लावल्या जातात.हेच आरोप लावणारे इतर समाजाच्या नऊ / दहा दिवस चालणाऱ्या धांगडधिंगाला मोठया उत्सवाने स्वीकारतात.त्याचा वाहतूक ,ध्वनी प्रदूषण, त्याच्या कडून घाण होत नाही का ?. त्याची तुलना महापरीनिर्वाण दिनाशी होत नाही. आंबेडकरी चळवळ संघटना पक्षा बाबत त्यांना विचारले तर जे सत्य सांगणार नाहीत माहित असून त्यांना या बाबत विचारणे म्हणजे आंबेडकरी चळवळीत असंतोष पसरविणे नाही काय ?. 
बाबसाहेब च्या वेळी जिवाला जिव देणारे सहकारी आंबेडकरी चळवळीत होते अनेक समस्या वर अभ्यासपूर्ण माहिती घेवुन ते संघटना पक्ष चालवत होते.आजचे कार्यकर्ते नेते वाट पाहतात कधी कुठे पुतळयाची विटंबना होते कुठे आमच्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते कुठे अन्याय अत्याचार आणि हत्याकंड घडते आणि आम्ही मोर्च्या आंदोलन करून तोडपानी करतो त्याचे भांडवल करून आमच्या नांवाची पार्टी बनवितो.काही घडलेच नाही तर आम्ही गप्प बसणार नाही पुतल्याची स्वछता करून सुशोभीकरण करा.नाही तर आम्ही आमरण उपोषण करतो. या रेल्वे स्टेशनला हे नांव द्या नाही तर ते करतो अशी ही चळवळ बाबासाहेबाची होती काय ?.महापरी निर्वाण दिनी जन आंदोलन करून नेते बनू पाहणारे खरेच आंबेडकर वादी असू शकतात काय ?.याच्या घरी यांचा माय बाप मेले असते. त्यादिवसी यांनी असे आंदोलन केले असते?.याच दिवसी जेलभरो करून,सामुहिक आत्मदहन करणारे आंबेडकरी विचार आणि चळवळ पुढे नेणारे असू शकतात?.यांनी कोणी केली ही चळवळीची दुर्दशा?.माझ्या तमाम जागृत समाज बांधवा नो हिच वेळ आहे आपल्या बाबाच्या महापरीनिर्वाण दिनाच्या दिवशी आत्मचिंतन करण्याची आता किती वेळ सांगणार इतिहास वाचल्या वर इतिहास घडविता येतो. येणारी पीढी आपला 50 वर्षाचा इतिहास वाचेल.तेव्हा सांगा त्याना नामांतर साठी किती वर्ष लढ़लो आणि नामविस्तर करून समाधान पावलो.पुतला विटंबना झाल्या मुले रमाबाई हत्याकांड घडले.मनोहर कदम चे काय झाले.खैरलांजी,सोनाई,खर्डा,जवखेडा हत्याकंडाचा इतिहास लिहावा लागेल ते पुढील पिढी वाचेल नंतर बाबासाहेबाचा इतिहास वाचेल. तेव्हा ते विचारतील सांगना बाबा तुमच्या चळवळीची कशी दुर्दशा झाली. बाबासाहेबाना विनम्र अभिवादन करताना हा प्रश्न प्रत्येकानी स्वताला विचारवा हेच खरे विनम्र अभिवादन असेल.

जिजाऊमुळे मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव

जिजाऊमुळे मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव 
         छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व माता नी ठेवली तर आमच्यात हि छत्रपती शिवाजी महाराज सारखे शूरवीर निर्माण होतील.राष्ट्रमाता जिजाऊ हि इतिहास घडविणारी एक महान स्री झाली होती.स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब,शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती.त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती होती.हे जरी शंभर टक्के सत्य असले. तरी आज मराठयाच्या मनावर जिजामाते पेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आज ही कायम आहे.स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामाते ची म्हणजे एका स्री ची होती.परंतु गेले शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून "स्वराज्य" निर्माण करणे हि श्री ची इच्छा आहे.हे बिंबविले गेले.त्यामुळे जिजामाते पेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच महिलांनी जास्त पसंत केले आहे.
    मुलांना घडविताना त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्याच्यावर संस्कार केले जातात.त्यांना शाळा कॉलेज मधून हे शिकविल्या वर कोण कसा छत्रपती शिवाजी निर्माण होईल?.रामायणातील संस्कार कोणाला हि शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही.तर दुसर्यासाठी कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते.तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते.असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय व घरभेद्याशी लढाई केली नसती.शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे.हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हरले नाहीत.ती हिंमत लहानपणा पासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्याच्या मागे सदैव उभी होती.आज कालच्या माता मुलामुलीच्या मनात हिंमत निर्माण करण्या ऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात.त्याच्या पासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडनी करतात.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे.जी माता स्वताच्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते.ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते.ती जगा बाबत विचार करूच शकत नाही. त्यात एकादीच  जिजामाता, सावित्रीमाता,रमाईमाता,अहिल्या बाई ताराबाई असू शकते.त्याच जग प्रसिद्ध आहेत.
    परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना.जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्माता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दर्याखोर्यात राहणाऱ्या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते.तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी,वर्णबंदी,जातबंदी,रोटीबंदी,बेटीबंदी,शस्रबंदी,समुद्रबंदी होती. या सर्व बंदया प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावुन मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली.मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात.व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात.या मुंग्यांच्या एकजुटीतुन शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली.आणि सर्व जातीधर्मा च्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणाना मावळे म्हणून गोळा केले.सम्राट अशोकाच्या नंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतीच्या गादीचा वारसा निर्माण केला.चंदगुप्त मौर्या,सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली.जिजामाते मुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला.यांचे भान आजच्या शिवसैनिकांना बहुजनाना नाही.
    छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष,संस्था,संघटना जिजामाता ची जयंती साजरी करताना दिसत नाही.पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात.ममता,समता,करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते.मात्र छत्रपती शिवाजी महाराजाना आद्यदैवत मानणारे जेव्हा त्याच्या मातोश्री चे चरित्र हरण करून विटंबना केली जाते. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरत नाही.अन एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला जातो.यालाच आईचे व दाई प्रेम म्हणतात.राज्यातील मावळे नव्हे,तर बहुजन समाजातील काही कावळे,दादा,भाऊ,भाई,साहेब काका,माताचा वाढदिवस मोठ मोठे कटआऊट लावुन साजरे करतात.अन त्यांना राष्ट्माता जिजामाता.छत्रपती शिवाजी महाराजाची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही.अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या मराठी बहुजन कावळ्याचा निषेध करून स्वाभिमानी मराठा बहुजन समाजाला राष्ट्माता जिजाऊ च्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्माता जिजाऊच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम 

माता रमाई महिलांचे प्रेरणा स्थान


माता रमाई महिलांचे प्रेरणा स्थान 

         
ष्टकरी महिलांचे प्रेरणा स्थळ कष्टकारी महिला नेहमी आपल्या पतिदेवला सर्वच कामात सतत मदत करीत असतात अशा महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई.माता रमाई बाबत आज प्रयन्त अनेक प्रकारचे लिखाण हे भावनिकच झाले आहे.रमाबाईच्या कष्ट त्यागाला भावनिक केल्या गेले आहे.भिमराव आंबेडकर यांना जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मना पासुन पत्नीची साथ होती.ती प्रेरणा खेडया पड़यातील व शहरातील झोपड़पट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीनी घेतली म्हणुन ते आंबेडकर चळवळीतील प्रत्येक जन आंदोलनात पति पत्नी सहभागी होतात.विशेष ते सर्वच असंघटित कामगार असतात.पण असंघटित कामगार म्हणुन ते कोणतेही आंदोलन करीत नाही.त्याची त्यांना जाणीव नाही.रमाबाई आणि भिमरावचे सर्व नातलग कोणते कामगार होते?.
>    रमाबाई बदल जेवढा आदर अडानी असंघटित महिला पळतात तेवढा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या महिला पाळत नाही.अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही.(देत असतील अशा त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि माफी मांगुन )आज प्रयन्तचा इतिहास आणि अनुभवा वरुन हे लिहतो.अन्यता आंबेडकर चळवळीत आज जी लेटरहेड वर जागणाऱ्याची जी संख्या आहे .ती राहली नसती.प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलाचा हात असतो तसाच एका अपयशस्वी पुरुषा मागे एका महिलांचा हात असतो.मग घराघरत असलेल्या आंबेडकर चळवळीतील गटागटच्या नेत्यांच्या महिलाचे प्रेरणा स्थान कोणते?.
>    रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो.असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही.त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवरया बदल राई चा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.या ला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा, दूरदृष्टिपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा मंत्र आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती.आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.महाउपासीका मिराताई पण नाही.अन्यता आनंदराज यांनी मिराताई व बाळासाहेब यांना डावळून किंवा मार्गदर्शन न घेता इंदुमिल स्मारक आंदोलन उभे केलेच नसते.कारण त्याची (आंदोलनाची)प्रेरणा कॉग्रेस होती.रमाबाई वर असे प्रसंग किती वेळा आले.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाई ची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या.काय वर्णन करून ठेवले आल्या थोर विचारवंतांनी??.
रमाबाई ची रमाई कशी झाली किती लोकांना माहित आहे.बाबासाहेब शिक्षणा करिता आणि समाजाला मान सन्मान मिळवून देण्या करिता सतत ब्रिटिशांच्या बरोबर पत्रव्यवहार आणि गाठी भेटी घेत असत.असे एकदा राजगृहावर बाबासाहेब व रमाबाई राहत असताना त्यांना अचानक परदेशी महत्वाच्या कामानिमित्य जायचे होते.पण रमाबाईला एकटे सोडून कसे जाणार हा प्रश्न पडला होता.तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या एक मित्र धारवाडच्या वराळे काका कडे रमाबाईला पाठवितात.धारवाडचे वराळे काका मुलाचे वसतिगृह चालवीत होते त्याच्या आवारात नेहमी लहान मुले खेळायला येत असत.रमाबाईला दोनचार दिवसात मुलांचा लळा लागला.नेमके तीन दिवसा नंतर आवारात मुलाची किलबिलाट दिसली नाही.वराळे काका चिंतेत दिसतात.म्हणून रमाबाई काका ना विचारतात मुले दोन दिवसात आवारात खेळताना दिसत नाही.कुठे गेली का?.तेव्हा वराळे काका सांगतात दोन दिवस झाले मुले उपाशी आहेत त्यामुळे मुले खेळायला आले नाही.कारण अन्न धान्याचे ग्ल्यांड महिन्याला भेटत असायचे ते अजून मिळाले नाही.ते मिळाल्याला तीन दिवस लागतील.त्यामुळे मुलेही तीन दिवस उपाशी राहतील. वराळे काका अगदी कंठ दाटून ते सांगत होते.त्यामुळे रमाबाई घरात आपल्या खोलीत जातात थोड्या रडत बसतात.नंतर कापटातील डबा काढतात त्यातील सोन आणि सोन्याच्या हातात्तील बांगड्या काढून वरालेच्या हातात देतात.विका किंवा गहान ठेवून ह्या मुलाच्या जेवणाचा बंदोबस्थ करा .त्या नंतर  मुले पोटभर जेवतात आणि खूप आनंदात राहतात.हे पाहून रमाबाई खूप आनंदी होतात.त्यामुळे सर्व मुले रमाबाईला रमाआई रमाई म्हणून बोलायला लागतात.वराळे काकाच्या त्या वेळे असून सर्वच लोक रामाबिला रमाई झाल्या. 
     रमाबाईचे पतीनिष्ठ उदाहरण द्रुष्टी समोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत. स्री हा समाजाचा अलंकार आहे.आपल्या कुटुंबाचे आणि कुळाचा नांव लैकिक स्रियाच्या शिलावरच अवलबून असतो. स्री हि जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता हि असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरवात पासून शेवट प्रयन्त रमाबाई नी हाल अपेष्ट,दुख गरिबी याच्याशी सतत संघर्ष करीत राहिल्या त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत होत्या पण त्यांनी बाबासाहेबा कडे तक्रार केली नाही अशा माता रमाई च्या जयंती निमित्त सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा !.धन्यवाद !!!.

Tuesday, May 19, 2015

प्रजासत्ताक कोणा मुळे ? संविधाना मुळे, संविधान कोणा मुळे?



      २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.तो राष्ट्रीय सन आहे.त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर,राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्याउत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधाना नुसार देशाचा राज्य कारभार सुरु झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले.त्यासाठी २,९६,७२९ रुपये एकूण खर्च आला दररोजचा जमा खर्च त्यांनी लिहून ठेवला.२५ नोव्हेंबर १९४९ ती सादर करण्यात आली त्या संविधानाची अमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला? भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग, ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मानसंविधान निर्मात्याला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराल दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा-कॉलेजानी  आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा. आज पर्यंत तसे कोणी केले नसेल. आतापासून आपण करूया.ज्यांनी केले व जे करीत आहेत, त्यांचा कित्ता आपण गीरवूया. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा, काही ठिकाणी अशी प्रथा सुरु झाली आहे आता आपण सुरु करूया,शासन सुरु करील याची वाट पाहत बसू नये.डॉ. बाबासाहेबांबद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया. आपण केले कि तो शासनाला निर्णय घ्यावाच लागतो. इंदू मिलचे आंदोलन आपणच केले ना? मग शासनाला जाग आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले. ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' आणि ज्या दिवसापसुन संविधांची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा 'प्रजासत्ताक दिन '. २००८ पासून महाराष्ट्र शासनाने जीआर काढून २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात २६ नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा. असा जीआर काढावा. शासन करील तेव्हा करील. आपण मात्र आता पासून सुरुवात करू आणि डॉ. बाबासाहेब किती मोठे आहेत ते या देशाला पटवून देवूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण यादेशातील जातीयवाद्यांना खुपते आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख टाळतात. अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात. डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना.कारण डॉ. बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला. त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत आहे.म्हणून तर ते डॉ. बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण, महत्व आणि कर्तत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्याच दिवशी  हे जातीयवादी कपट कारस्थानाणे नवीन सन किंवा नवीन धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतु हाच की त्यादिवशी डॉ. बाबासाहेबांच्या मोठे पानाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये किंवा लोकांना कळू नये.उदाहरण द्यायचे झाले तर २६ जानेवारीचे देवूया. गेल्या ८ ते ९ वर्षापासून २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी सत्य नारायणा च्या पूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवडे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत हि पूजा होवू लागली आहे.यापूर्वी २६ जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती? आणि आताच ती का घालण्यात येते? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे.सत्यनारायणाच्या पूजेचा आदेश दिला कोणी? व आला कुठून? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टर हून आला. कुणाला कळाले नाही. कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे. प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजेचे महत्व वाढत आहे, वाढवीत आहेत. म्हणून भिमानुयायांचीही जबाबदारी वाढत आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे महत्व गर्जत आणि गाजत सांगितले पाहिजे. प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत. जातीयवाद्यांना डॉ. बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही. म्हणून ते डॉ. बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत. डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही. म्हणून ते आता संगु लागले आहेत कि, भारताचे संविधान हे काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने लिहिले नाही. सात जणांच्य घटना समितीने लिहिले आहे. तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याचवेळी,तिथल्या  तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठाम पणे सांगितले पाहिजे की, होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे. तेच संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी. पी. खेतान, कृष्णास्वामी अय्यर, बी. एल. मित्तल, के. एम. मुन्शी व सय्यद अहमद अब्दुल्ला हे सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३८९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर) फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबाबदारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोघेजण परदेशात गेले. अन्य दोघे सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकचे निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता. उरले फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर.त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. म्हणून आपण कुठे ही आणि केव्हा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना, 'भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ', असाच उल्लेख केला पाहिजे. कारण डि.लिट. कोणी ही मिळवू शकतो किंवा भारतरत्न किताब कोणाला ही मिळू शकतो. मात्र संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरच.अन्य कोणालाही होता येणार नाही. म्हणून प्रजासत्ताक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करूनच साजरा करावा !

अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा


    अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा 
माज प्रबोधन करण्या करीता शिक्षणाची गरज नाही.समाजसेवा हे सुशिक्षित माणसाचे काम नाही.ते फक्त नोकरी करून पैसा कसा कमाविता येतो आणि त्यासाठी किती खोटे बोलण्याचे कैशल्य त्याच्या अंगी आहे यावर ठरते.भारत कृषिप्रधान देश आहे या देशातील कृषिचे मालक असणारे शेतकरी आज जास्त आत्महत्या करतात.कारण ते सुशिक्षित नाही लिहण्या वाचन्या पुरते त्याचे शिक्षण असते.म्हणुन त्याला ऐनवेली कृषि उत्पन्न बाजार समितितील अडते व व्यापारी लुटतात. त्याच्या शेतातील उत्पादित मालाचा भाव पडतात.त्याच वेळी सुशिक्षित बँक अधिकारी आपले कैशल्य दाखवतात. त्यात कोणत्या ही धर्माची माणस मागे नसतात.का होते असे?.हा मोठा प्रश्न आहे.म्हणून संत गाडगेबाबा यांची आठवण येते.गाडगेबाबा चे शिक्षण आणि त्याच्या समाज प्रबोधन करण्याची किर्तनाची पद्धत पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात.पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना पटणार नाही.
    सरकारच्या ग्राम स्वछता अभियानाच्या जाहिराती वर्षा तुन दोन वेळा येतात.एक जयंती दिनी दूसरी स्मुर्ती दिनी तेव्हाच सरकारला गाडगेबाबाची आठवण येते.गाडगेबाबाचे तत्वज्ञान मानव मुक्ति करणारे होते ते आजही सर्व समाजाला चिंता मुक्त करणारे आहे.ते समजुन घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो.आज प्रत्येक जन आपला कुटुंबा पुरता विचार करतो.घर,परिसर,गांव स्वछ ठेवा हा मंत्र त्याकाळी गाडगेबाबानी सांगितला होता.आज कोणता ही सुशिक्षित माणूस असा विचार करीत नाही.पण गाड्गेबाबानी दहाकलमी कार्यकर्म १) भूकेलेल्यांना - अन्न,२)तहानलेल्याना - पाणी , ३) उघड्या नागड्या ना - वस्त्र,कपडा,४) गरीब मुलामुलींना - शिक्षणा साठी मदत, ५) बेघरांना - आसरा, ६) बिमार लोकांना - औषधोपचार ,७) बेकारांना - रोजगार, ८) मुक्या प्राण्यांना - अभय ,९) गरीब मुलीमुलाचे - लग्न,१०) गोरगरीबना - शिक्षण,हा त्यांनी खेड्या पाड्यात राबविला.
   गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६- मुत्यु २० डिंसेंबर १९५६ झाला.खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत आणि विचारत बापो हो  ईश्वर देव कशात आहे?.देवा बाबत लोकात असणारी श्रद्धा,अंधश्रद्धा,अज्ञान,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन करणारे कार्य करीत होते. "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी " असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा."देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.आज ते असते तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ऐवजी ते गेले असते माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धर्मशाळा,अनाथालये,आश्रम आणि विद्यालये सुरू केली होती.तेव्हा ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी रंजले-गांजले, दीन-दुबळे,अपंग-अनाथ यांच्यात देव शोधला. या खऱ्याखुऱ्या  देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी  जिवापाड प्रयत्न केले.
   गाडगेबाबाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत तेव्हा त्यांनी सांगितले मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही.१४ फेबुवारी  १९४९ ला गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०/ ११/१९४७ ते ३१/ ०३/  १९४९  कायदेमंत्री होते ) आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या. आणि म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.तेव्हा पासून बाबासाहेबाला मानणारा समाज प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाचा आदर्श गुरु म्हणुन उल्लेख करू लागला.कोणते हि कार्यकार्म असो भाषणाची सुरवात बाबासाहेबाच्या आदर्श गुरुच्या विचाराला आणि प्रतिमेला वंदन केल्या शिवाय पुढे भाषण करीत नाही.हि पद्धत बहुजन आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे.त्यामुळे बाबासाहेबाच्या फोटो बरोबर गाडगेबाबाचा फोटो घराघरात असतो.उलट गाडगे बाबाच्या समाजाने आज ही बाबांना स्वीकारले नाही. ९० टक्के लोकाच्या घरात गाडगेबाबाचा फोटो  नसतो.लग्न कार्य किंवा कोणताही कार्यकार्मात त्याच्या नांवाचा उल्लेख नसतो.फोटोचा प्रश्नच नाही.म्हणजे ज्यासामाजातील एक संत सर्व समाजा करिता एवढा आदर्श निर्माण करतो त्याचा आदर्श त्याच्या समाजाने न घेणे हि खूप दुर्दव्य म्हणावे लागेल.काही संघटना जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.पण हिंदुत्वाची चौकट मान्य करूनच.गाडगेबाबा सारख समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्याचा उल्लेख टाळून.
   गाडगेबाबा आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.तसाच प्रयत्न त्याच्या समाजातील संघटना नी करायला पाहिजे. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे बहुजन चळवळीत आदर्श संत म्हणून कायम आहेत आणि राहतील.
       

युद्ध नको बुद्ध हवा .पण ....???

      युद्ध नको बुद्ध हवा .पण ....???               
       गाला शांती,समता,स्वतंत्र बंधुभावाची शिकवण देणारे तथागत भगवान बुद्ध. यांनी दाखविल्या  मार्गावर चालण्याचा प्रयत्न प्रत्येक देशातील माणूस करतो आणि म्हणतो आपल्याला युद्ध नको,बुद्ध हवा.पण तो माझ्या घरात नको दुसऱ्या घरात हवा.प्रत्येक देशातील अंतर्गत वाद पाहिल्यास त्यांना कशाची गरज आहे ते लक्षात येते.त्यातू प्रत्येक मानवाचे घर भी सुटत नाही.त्यामुळे सर्वसाधारणपणे संसार चक्रामध्ये मनुष्य जातीची धडपड ही असतेच.
   आपल्या संसारामध्ये लग्न करणे, मुलंबाळ जन्माला घालणे , त्यांना जगविणे , शिकविणे , परत लग्न करुन देणे, कामधंद्याला लावणं आई वडीलांनी जे केले तेच या मुलाबाळांना संसार चक्रा मध्ये माणस पिढ्यान पिढ्या जगत असतात.आणि कधीतरी एक दिवशी मरतात. हा या संसारचक्राचा नियम आहे. जात्यामध्ये सर्वच दाणे भरडले जातात पण चारदोन काही दाणे खुंट्याला अडकून राहतात. जे भरडले जात नाहीत. तसीच आपल्या संसार चक्रात अडकून मनुष्य त्यात भरडली जाते. पण काही लोक जिवंत राहतात.काही खाण्यासाठी जगतात,काही जगण्यासाठी खातात, काही या संसारचक्राच्या ही पलीकडे जावून,पाहून विचार करतात. अशीच माणसं “महापुरुष’ ठरत असतात. महान आदर्श ठरतात.
       सिद्धार्थ गौतम अशाच मनुष्य जातीत जन्माला आले. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स. पूर्व 563 वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म  झाला. राजवैभवात जन्मलेला हा राजपुत्र सुरवात पासूनच संसारतील विविध सुख,दुखाच्या घटना पाहून प्रश्न निर्माण करीत होता.त्याच्या प्रत्येक प्रश्नाची समाधान कारक उतर मिळत नसल्यामुळे तो कुठे हि रमत नव्हता.त्यांना मोह्मायात गुंतवण्यासाठी अनेक प्रकारचे महाल बांधून त्यात रूपसुंदरीचा सहवास उपलब्द करण्याचा नाना प्रकारे प्रयत्न झाला. पण सिद्धार्थ कुठे ही अडकत नव्हता.सभोवताली संसारासाठी असणारी वैभवशाली सुखं सिद्धार्थाला उपलब्ध होती पण या संसाराच्या सुख उपयोगात न रमता त्यांनी  राजवैभवाचा त्याग करुन गृहत्याग केला आणि मानवाला दुख्मुक्तीचा मार्ग ज्ञानमार्गातून दाखवून दिला. म्हणून सर्व जगभर लोक भगवान बुद्धाचा विचार हा मानव प्राणी मुक्ती करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. हे सत्य त्यांनी जगाला सांगितले आहे. कुटूंबाच्या कुटूंब आणि राष्ट्रच्या राष्ट्र बुद्धाचा विचार स्विकारतात.         पण महाराष्ट्रातील महाराचे बौद्ध झालेले लोक पुन्हा घर वापसी कडे फिरताना दिसतात.म्हणून म्हणतात युद्ध नको, बुद्ध हवा,पण माझा घरात नको. दुसऱ्याच्या घरात हवा.बुद्ध जयंतीच्या निमित्ताने असे सांगावे वाटते. आपल्या देशात तेहतीस कोटी देव असताना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का नव्हता?.हिंदू धर्मातील बहुजन समाजाला देव, ईश्वर, स्वर्ग, नरक या संकल्पनांमध्ये माणसांना अडकवून ठेवले. पाप पुण्याच्या संकल्पनेत गोठवून ठेवून त्यामुळे पापातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला ईश्वरांचे दलाल पुजारी, पुरोहित हे अवैज्ञानिक मार्ग सांगत असल्याचे आपण दररोज दूरदर्शनवर,प्रिंट मिडीया मध्ये पाहतो. अमुक अमुक प्रकारचा अभिषेक केला की पापातून मुक्ती होते. , नदीत स्नान करून नारळ फोडले कि माणसाचे कल्याण होते अशी चुकीची शिकवण लहानपणा पासून मुलामुलीला दिली जाते.त्यामुळे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात गुमराह मूर्ख बनविला जातो. पण भ. बुद्धांनी मात्र पुजेच्या कर्मकांडाचा विचार न देता आचरणाचा महान असा विचार दिला आहे. जो माणसाच्या कल्याणाचाच आहे. बुद्धाचा धम्म  हा अनुभवण्याचा आहे. सुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर मनुष्यजात सुखी होऊ शकते म्हणूनच  डॉ. बाबासाहेबा आंबेडकर यांनी या सदधम्माचा स्विकार केला. त्याला गालबोट लावण्याचे काम काही लोक करताना दिसतात.असंघटीत कष्टकरी मजुरांच्या जनांदोलनातून शिक्षणात आणि नोकरीत सवलती घेणारा एक वर्ग हा बौद्ध धम्माशी मोठ्या प्रमाणात पातरणा करताना दिसतो. त्याच्या घरात हिंदू धर्मांचे देवारे पुन्हा सजताना दिसतात.ते च लोक समाज प्रबोधनाच्या नांव खाली खेड्यातील मजुरांना आणि शहरातील असंघटीत कामगाराना सांगतात युद्ध नको,बुद्ध हवा.पण माझ्या घरत नको तुमच्या घरात हवा.बुद्ध जयंतीच्या सर्व वाचकांना हार्दिक मंगल कामना !! सर्वाचे मंगल हो !!!

महाराष्ट्र बसपाची लवकर आठवण आली?.

         महाराष्ट्रातील हजारो कुशल संघटक, वक्ते जिवदानी कार्यकर्ते देशोधडीला लागल्यावर  डॉ सुरेश माने सर यांना आता मिशन महाराष्ट्र बसपा ला हात घातला त्या बदल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!.
सर आपण खुप विद्वान कायदे पंडित आहात असे अनेक कार्यकते मला सांगत होते त्यावर माझा कधीच विस्वास बसत नव्हता.कारण राज्यातील माझ्या सारख्या अनेक कार्यक्रत्याची दखल राज्यातील नेतृत्व घेतल्या जात नव्हती त्याना बेदखल केल्या जात होते त्या वेळी आपण आमची दखल घेवून काही तरी केले पाहिजे ही अपेक्षा आपल्या कडून होती. तेव्हा आपण फक्त आपली सोय पाहत होता.तेव्हा वरचा आदेश पक्षाची शिस्त सांगत होता.त्याला आपला इलाज नाही.ही हलबता दाखवत होता.डॉक्टर, वकील, इंजीनियर,प्राध्यापक पक्ष संघटनेत काम करण्यास इछुक असताना. त्यांना संधी मिळत नव्हती. आणि चीटर,फिटर,फन्टर लोकना प्राधान्य पक्षात मिळत होते.इतर समाजातील आर्थिक मजबूत बकरे शोधा आणि आमच्या ताब्यात दया.नेतृत्व त्यांचे आर्थिक,सामाजिक शोषण करून स्टेम मारुन फेकून देत होते.त्यामुळे इतर समाजात महापुरुषा च्या क्रांतिकारी विचारांची बसपा ही केवळ धंदेवाइक एजेन्सी आहे.असे चित्र निर्माण झाले.आज ही राज्यात नव्हे तर देशात हेच चित्र आहे.ते बदलण्याची कळवळ आम्हाला वाटत होती म्हणुन जनतेच्या महानायक या एकमेव दैनिकात आम्ही सतत ”बसपा पॉ.लि.ची कोंडी फोडा” म्हणुन लिहून  आवहान करीत होतो.तेव्हा बसपावर मना पासुन प्रेम करणारे हजारो कैडर आमच्या मनातील आपण लिहले म्हणून अभिनदंन करीत होते.पण तेव्हा ही आज भी आम्हाला बसपा हा बहुजन समाजाचा राष्टीय पक्ष म्हणुन पाहिजे आहे.तो बहुजन हिताय बहुजन सुखायच हवा. डॉ सुरेश माने सर आपल्याला खरोखर महापुरुषाच्या क्रांतिकारी विचारांचा बसपा हवा असेल तर मिशन महाराष्ट्र बसपा प्रक्रिया गतिमान करा.

वंचित लोक कोण ?.

        वंचित घटकानां लोकांना अन्नधान्य मिळालेच पाहिजे.पण हे वंचित घटक लोक कोण?. हे कोण ठरविणार?. पुरोगामी मुखवटे घालून गोरगरीबा साठी काम करणाऱ्या डाव्या विचारच्या संस्था (NGO),संघटना आणि पक्ष यांनी जातीच्या समस्या कडे कधीच पाहिले नाही.रेशनवर देण्यात येणाऱ्या अन्नधान्य वाटपात होणारी गडबड ही आजची नाही.ज्या गांवत ज्या राजकीय पक्षा चे वर्चस्व असते.ज्या जातीचा राजकीय  नेत्या असेल त्याच्या सोयी नुसार ग्रामसेवक ते तशिलदार गावातील वंचित घटक,भूमिहीन शेतमजुर,अल्पभूधारक,निराधार,दरिन्द्र रेषा खालील लोकांची यादी बनवितात.यांनाच  रेशन दुकानावर अन्नधान्य कमी किंमतीत मिळते.त्याचा फायदा ग्रामीण भागातील जात दांडगे धन दांडगे लोक जास्त घेतात.
  वंचित घटकचे नेतृत्व करणारे या बाबत तोंड उगडत नाही.कारण त्यांना जातीच्या राजकारणात पडायचे नसते.खरे म्हणजे जातीचा प्रश्न आणि समस्या त्यांना सोडवायच्या नसतात.वंचित घटक कोणत्या जातीचे असतात.त्याच्या शिक्षण,आरोग्य,अंधश्रदा,अज्ञान आणि रोजगार या समस्या कडे गांभीर्याने पाहिले जात नाही.केवळ मोर्च्या आंदोलना करीता त्याचा वापर होतो.जातीच्या प्रश्नावर आज प्रयन्त पुरोगामी डाव्या संस्था,संघटना आणि राजकीय पक्षानी ठोस भुमिका न घेतल्या मुळे वंचित घटक राजकीय दुष्टयां त्याच्या मागे जात नाही. हिन्दु म्हणून ते पुरोगामी मुखवटे धारण केलेल्या पक्षा च्या उमेदवारांना मतदान करीत नाही.म्हणून वंचित वंचित सतत शब्द वापरण्या पेक्षा वंचित घटक कोणत्या जातीतील आहेत त्याची योग्य नोंद घ्यावी.

बुद्धि गहान ठेवलेला समाज

     बुद्धि गहान ठेवलेला समाज 
गात विज्ञानाने झपाटयाने प्रगती केली असली तरी भारत देशातील बहुसंख्य लोकना ते मान्य होत नाही.ते सत्यनारायणा ची महापूजा घालणारच कारण त्याच्या बुद्धिला ते पटण्याचा आणि न पटण्याचा प्रश्नच त्यांच्या समोर उभा राहत नाही. त्यांनी धार्मिक पुस्तकांचे वाचन केले तर लक्षात आले पाहिजे  कि,अनेक देवांनी आईच्या उदरातून बिन बापाचा जन्म घेतला आहे आणि त्यांचे अनेक  उदाहरणं वाचायला मिळतात. हा सर्व प्रकार वाचून डोक्यातला मेंदू गहान ठेवल्यासारख वाटत.
    ''निसर्गाचा नियम आहे कि येथे नर आणि मादी एकत्र आल्याशिवाय नवीन उत्पती होत नाही. बीज लावल्या शिवाय त्याला अंकुर येत नाही ते बीज अंकुरायला देखील सुपीक जमीन लागते.योग्य वातावरण लागते..! साधे निरीक्षण,निसर्गात बदल होतो. वसंत ऋतूची चाहूल लागताच अगदी उघडी बोडकी झालेली डोंगरावरची झाडे व गवत फुलायला लागतात. वसंताचा स्पर्श होताच निसर्गातला रोमांच उत्तेजित होतो आणि झाडांवर कळ्या डोकवायला लागतात फुले येतात. 
    फुले आली कि पुन्हा त्यांच्यात फलधारणा होण्यासाठी फुलांतून परागीकरण व्हावे लागते अश्या खूप गोष्टी आहेत ज्या लक्ष्य वेधुन घेतात.आता देवांनी जर धर्म रक्षणासाठी समाजात जन्म घेतला असेल तो ही बिन बापाचा?. तर आपण हा विचार नक्कीच करायला हवा “एका परमेश्वराचा गायीच्या  गोठयात जन्म झालाय म्हणे, त्याची आई कुमारी माता, लोकांनी तिलाही देव मानला आणि त्या मुलालाही..! मग समाजात अशा  एखादी घटना घडली तर समाज ते का स्वीकारत नाही.अशा कथां सर्वच धर्मात मध्ये आढळतात, (बुद्ध धम्म सोडुन )त्याला  रामायण-महाभारतात अपवाद नाही..! मग आज अनेक कुमारी माता मुलाना जन्म देतात त्या कुलटा का ठराव्यात.एका बाजूला ज्याना आम्ही पाहिले नाही अश्या बिन बापाच्या अपत्याला आम्ही देव मानायचे आणि दुसर्या बाजूला आज असे अपत्य जन्माला आहे कि त्या मुलाला आणि त्याच्या आईला समाजातून बहिस्कृत करायचे..!
    लोकांच्या भावनाचा काही ताळमेळ नाही. वाचता-वाचता असे लक्षात येते कि,शूद्रांचा जन्म हा ब्रम्हदेवाच्या पायाच्या अंगठ्यातून झालाय.आता पायाला किंवा अंगठ्याला असा कोणताही भाग नाही कि तेथून एखादी मुंगी जन्मास येईल किवा बेंबीमधून कोणी जन्माला येईल च कसा?. मग हा काय प्रकार आहे. जीव जन्माला घालायचे हे कोणते अनाधिकृत मार्ग..!
  आंब्याची बी (कोय) देखील अंकुर घेत असताना तिच्या आकाराचे निरीक्षण करा आणि आणि या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाचा अभ्यास करा आणि मग ठरवा कि किती देव बिन बापाचे आणि आईचे जन्माला आलेत.मग असे अनैसार्गिक पद्धतीने जन्म घेणारे देव कसे..? कोणता ही ताळमेळ नसतांना, रूढी परंपरेच्या नावाखाली देव-धर्माची भीती घालून, भारतातील असंख्य जन-समुदायाला पिढीजात दैवी-गुलाम बनवून काही समुदाय काल्पनिक कथा रचून लोकांना मुर्ख बनविन्याचे काम पिढ्यान-पिढ्या करतोय आणि आजची स्वताला सुशिक्षित,साक्षर म्हणणारी  २० व्या -२१ व्या शतकातील पिढी त्याचे मोकाटपणे पालन करतेय..! यालाच बुद्धि गहान ठेवलेला समाज म्हणता येईल.

युद्ध नको बुद्ध हवा .पण ....???

       जगाला शांती,समता,स्वतंत्र बंधुभावाची शिकवण देणारे तथागत भगवान बुद्ध. यांनी दाखविल्या  मार्गावर चालण्याचा प्रयत्न प्रत्येक देशातील माणूस करतो आणि म्हणतो आपल्याला युद्ध नको,बुद्ध हवा.पण तो माझ्या घरात नको दुसऱ्या घरात हवा.प्रत्येक देशातील अंतर्गत वाद पाहिल्यास त्यांना कशाची गरज आहे ते लक्षात येते.त्यातू प्रत्येक मानवाचे घर भी सुटत नाही.त्यामुळे सर्वसाधारणपणे संसार चक्रामध्ये मनुष्य जातीची धडपड ही असतेच.
   आपल्या संसारामध्ये लग्न करणे, मुलंबाळ जन्माला घालणे , त्यांना जगविणे , शिकविणे , परत लग्न करुन देणे, कामधंद्याला लावणं आई वडीलांनी जे केले तेच या मुलाबाळांना संसार चक्रा मध्ये माणस पिढ्यान पिढ्या जगत असतात.आणि कधीतरी एक दिवशी मरतात. हा या संसारचक्राचा नियम आहे. जात्यामध्ये सर्वच दाणे भरडले जातात पण चारदोन काही दाणे खुंट्याला अडकून राहतात. जे भरडले जात नाहीत. तसीच आपल्या संसार चक्रात अडकून मनुष्य त्यात भरडली जाते. पण काही लोक जिवंत राहतात.काही खाण्यासाठी जगतात,काही जगण्यासाठी खातात, काही या संसारचक्राच्या ही पलीकडे जावून,पाहून विचार करतात. अशीच माणसं “महापुरुष’ ठरत असतात. महान आदर्श ठरतात.
       सिद्धार्थ गौतम अशाच मनुष्य जातीत जन्माला आले. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स. पूर्व 563 वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म  झाला. राजवैभवात जन्मलेला हा राजपुत्र सुरवात पासूनच संसारतील विविध सुख,दुखाच्या घटना पाहून प्रश्न निर्माण करीत होता.त्याच्या प्रत्येक प्रश्नाची समाधान कारक उतर मिळत नसल्यामुळे तो कुठे हि रमत नव्हता.त्यांना मोह्मायात गुंतवण्यासाठी अनेक प्रकारचे महाल बांधून त्यात रूपसुंदरीचा सहवास उपलब्द करण्याचा नाना प्रकारे प्रयत्न झाला. पण सिद्धार्थ कुठे ही अडकत नव्हता.सभोवताली संसारासाठी असणारी वैभवशाली सुखं सिद्धार्थाला उपलब्ध होती पण या संसाराच्या सुख उपयोगात न रमता त्यांनी  राजवैभवाचा त्याग करुन गृहत्याग केला आणि मानवाला दुख्मुक्तीचा मार्ग ज्ञानमार्गातून दाखवून दिला. म्हणून सर्व जगभर लोक भगवान बुद्धाचा विचार हा मानव प्राणी मुक्ती करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. हे सत्य त्यांनी जगाला सांगितले आहे. कुटूंबाच्या कुटूंब आणि राष्ट्रच्या राष्ट्र बुद्धाचा विचार स्विकारतात.         पण महाराष्ट्रातील महाराचे बौद्ध झालेले लोक पुन्हा घर वापसी कडे फिरताना दिसतात.म्हणून म्हणतात युद्ध नको, बुद्ध हवा,पण माझा घरात नको. दुसऱ्याच्या घरात हवा.बुद्ध जयंतीच्या निमित्ताने असे सांगावे वाटते. आपल्या देशात तेहतीस कोटी देव असताना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का नव्हता?.हिंदू धर्मातील बहुजन समाजाला देव, ईश्वर, स्वर्ग, नरक या संकल्पनांमध्ये माणसांना अडकवून ठेवले. पाप पुण्याच्या संकल्पनेत गोठवून ठेवून त्यामुळे पापातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला ईश्वरांचे दलाल पुजारी, पुरोहित हे अवैज्ञानिक मार्ग सांगत असल्याचे आपण दररोज दूरदर्शनवर,प्रिंट मिडीया मध्ये पाहतो. अमुक अमुक प्रकारचा अभिषेक केला की पापातून मुक्ती होते. , नदीत स्नान करून नारळ फोडले कि माणसाचे कल्याण होते अशी चुकीची शिकवण लहानपणा पासून मुलामुलीला दिली जाते.त्यामुळे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात गुमराह मूर्ख बनविला जातो. पण भ. बुद्धांनी मात्र पुजेच्या कर्मकांडाचा विचार न देता आचरणाचा महान असा विचार दिला आहे. जो माणसाच्या कल्याणाचाच आहे. बुद्धाचा धम्म  हा अनुभवण्याचा आहे. सुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर मनुष्यजात सुखी होऊ शकते म्हणूनच  डॉ. बाबासाहेबा आंबेडकर यांनी या सदधम्माचा स्विकार केला. त्याला गालबोट लावण्याचे काम काही लोक करताना दिसतात.असंघटीत कष्टकरी मजुरांच्या जनांदोलनातून शिक्षणात आणि नोकरीत सवलती घेणारा एक वर्ग हा बौद्ध धम्माशी मोठ्या प्रमाणात पातरणा करताना दिसतो. त्याच्या घरात हिंदू धर्मांचे देवारे पुन्हा सजताना दिसतात.ते च लोक समाज प्रबोधनाच्या नांव खाली खेड्यातील मजुरांना आणि शहरातील असंघटीत कामगाराना सांगतात युद्ध नको,बुद्ध हवा.पण माझ्या घरत नको तुमच्या घरात हवा.बुद्ध जयंतीच्या सर्व वाचकांना हार्दिक मंगल कामना !! सर्वाचे मंगल हो !!!

पोलिसातील माणुसकी जागवा

     पोलिसातील माणुसकी जागवा 
वाकोला पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकाने वरिष्ट पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालुन हत्या केल्यामुळे पोलिसातील अंतर्गत असलेला वाद चवाटयावर आला.त्या ला आता विविध कांगोरे फूटत आहेत.कोणी म्हणते अतिरिक्त दिवटीच्या आणि सुट्या मुळे पोलिस नेहमी तणाव खाली असतात. हे पूर्ण सत्य नाही पोलिस दिवटीवर असताना कधीच  तणाव खाली नसतात. त्यांना आळी पाळी ने आराम करण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी असते. पोलिसांच्या गाडया ज्या जागी उभ्या असतात.त्यात तत्पुरती व्यवस्था असते.पोलिसांच्या गाडया बिना उत्पन्न असल्या शिवाय त्याजागी उभ्या राहत नाही.त्यात त्याचे दोन फायदे असतात त्या ठिकाणी उभे राहून ते एका पार्टीचे रक्षण करतात तर दुसऱ्या पार्टीची लूट.पोलिसांना दोनी कडून हप्ते मिळतात.ते पाहण्यास तुम्हाला कर्णाक बंदर ते शिवडी बीपीटी रोड वर आणि मुंबई च्या अनेक चौकात जावे लागेल.पोलिसाची गाडी उभी असताना ठराविक ठिकाणी मालवाहतुक करणाऱ्या गाड्या तुन माल लुटल्या जातो.मालवाहतुक करणाऱ्या चालकानी पोलिसात तक्रार केल्यास पोलिस त्यालाच दम देतात तुमच्या मालाची काळजी तुम्ही घ्यावी त्या साठी आमची दिवटी नाही.मग पोलिस गाडी चौकात उभी कसा साठी असते. 
    मुंबई तील रेल्वे स्टेशन जवळचे रोड पहा.फेरीवाले बेस्ट, रिक्षा फिरण्यास जागा ठेवत नाही. त्यांची तक्रार पोलिसा कडे केल्यास ते म्हणतात ते आमचे काम नाही. जास्त वाद घेतल्यास गाडीत बसा चला पोलिस स्टेशनला लेखी तक्रार करा. मग सुरु होते तुम्ही कोण ? कुठे काम करता?. कुठे रहता ?. कोणत्या पक्षा चे काम करता ?. तुम्हालाच काय त्रास होतो?. हजारो लोक जातात,येतात दिसते ना तुम्हाला ?. असा अनुभव पोलीसा कडून नेहमीच येतो. असे का होते?. पोलिस हा जनतेच्या रक्षणा करीता असतो?. जनतेची सेवा करतो ?. मग ते असे का वागतात.का त्याच्यातील माणूस जागा होत नाही.कारण....?
   पोलिस भर्ती होतानाच त्यांना शारीरिक बौद्धिक गुणवंते बरोबर वशिला आणि पैसा लागतो. पहिल्या दिवसा पासुन जनतेची सेवा करण्या करीता सर्व रोड वर धंदा करणाऱ्याची यादी,सर्व प्रकारची धंदा करणाऱ्याची यादी, समाज सेवक,राजकीय कार्यकर्ते,नेते, एजेंट, दलाल यांची यादी, प्रसिद्ध गुन्हेगार यांची माहिती त्यांच्या पासुन कसे सावध राहवे यांचे घटना बाह्य नियम यांचे प्रशिक्षण पोलिसांना असते. यातून कोण्या अधिकार्याला किती वाटा जातो, मिळतो.यांची डायरी प्रत्येका कडे असते.
    पोलिस कोणाशी प्रेमाने वागतात?.त्यांचे त्याच्या पोलिस असलेल्या माणसा बरोबर  का जमत नाही त्यांचे या मागे हा इतिहास आहे.प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये एका देवाधिकाचे मंदिर हे असतेच पोलिस हे भारतीय राज्यघटने च्या नुसार धर्मनिरपेक्ष, निपक्ष,निर्भीड पणे काम करणारी सर्वत महत्वाची यंत्रणा आहे.तीच संविधानतील कायदा कलमा पेक्षा धर्म आणि जातीच्या अलिखित कलमा नुसार आचरण करीत असेल तर प्रत्येक पोलीसा ची जात महत्वाची ठरते.जोशी विरोधी शिर्के, शिर्के विरोधी कांबले असे एक नाही हजारो उदहारण पोलिस दलात आहेत.पोलिस हा प्रथम धर्मनिरपेक्ष असला पाहिजे तरच त्यातील माणूस जागा होईल. पोलिसातील माणूस जागा झाला तर त्याच्या विभागातील घटना बाह्य अनेक धंदे बंद होतील. त्याचा फायदा सर्वच समाजाला होऊ शकतो.पोलिसातील माणूस जागा झाला तर देशातील भष्ट्राचार नख्खीच कमी होईल.मानवा तील माणूस जागा झाला.पोलिसातील ही माणूस ही जागा होईल 

महाड चा बाम्हण्या विरोधी रण संग्राम

महाड चा बाम्हण्या विरोधी रण संग्राम
भारतदेश च नव्हे तय जग विज्ञान युगाचा  वापर करून झपाट्याने पुढे जात आहे. पण काही लोकांची मानसिकता बाम्हण्या  सोडून जायाला तयार नाही.बाम्हनानी त्यांच्यातील बाम्हण्या बहुसंख्य बहुजन समाजाच्या रक्तात आणि मेंदूत भरून ठेवले ते बाहेर काढण्याचे प्रयत्न  अनेक महामानवानी संतानी केले.त्यातील काही संताना , महामानवाना त्याच्या जातीने सुद्धा स्वीकारले नाही.कारण त्यांनी बाम्ह्ण्याचे विष मानवाच्या डोक्यातून काढण्याचे खूप जीवतोड संघर्ष केला.पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी जो महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष केला त्याला तोड नाही.चवदार तळ्याचे पाणी पिऊन कोणताही प्रश्न सुटणार नव्हता पण बहुजन समाजातील लोकांच्या डोक्त्यातील " बा ट " असुद्ध होण्याचा जो समजा होता तो काढण्यासाठीचा संघर्ष होता.बाम्हनाला शिव्याशाप देण्या पेक्ष्या कृतीतून जनजागृतीसाठी जनसामान्य समाजाचे संघटन उभे करून रक्ताचा एक थेंब न सांडता संघर्ष करणे हीच नेतृत्वाची कसोटी असते.त्यात बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले.आजचे अनेक बामसेफ चे लोक उठसुठ बाम्हणाना शिव्या देतात.समाजाची कोणतीही समस्या घ्या त्याला बाम्हणच जबाबदार सर्व समाजाचे व्यवस्थापन त्याच्या कडे आहे.हा समज बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासपूर्ण जनांदोलन,सत्याग्रहातून सोडून दाखविला तरी आज त्यांची जनता त्यावर विश्वास  ठेवायला तयार नाही.भारत देश हा संविधाना नुसार चालला पाहिजे.चालत नसेल तर त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी पाहिजे.त्यासाठी जनसंघटना ,पक्ष पाहिजे.किंवा विरोधी पक्ष म्हणून काम केले पाहिजे.२० मार्च १९२७ चा महाड चवदार तळ्याचा संघर्ष आंबेडकरी चळवळी करिता आज हि प्रेरणादायी आहे.