Tuesday, May 19, 2015

बुद्धि गहान ठेवलेला समाज

     बुद्धि गहान ठेवलेला समाज 
गात विज्ञानाने झपाटयाने प्रगती केली असली तरी भारत देशातील बहुसंख्य लोकना ते मान्य होत नाही.ते सत्यनारायणा ची महापूजा घालणारच कारण त्याच्या बुद्धिला ते पटण्याचा आणि न पटण्याचा प्रश्नच त्यांच्या समोर उभा राहत नाही. त्यांनी धार्मिक पुस्तकांचे वाचन केले तर लक्षात आले पाहिजे  कि,अनेक देवांनी आईच्या उदरातून बिन बापाचा जन्म घेतला आहे आणि त्यांचे अनेक  उदाहरणं वाचायला मिळतात. हा सर्व प्रकार वाचून डोक्यातला मेंदू गहान ठेवल्यासारख वाटत.
    ''निसर्गाचा नियम आहे कि येथे नर आणि मादी एकत्र आल्याशिवाय नवीन उत्पती होत नाही. बीज लावल्या शिवाय त्याला अंकुर येत नाही ते बीज अंकुरायला देखील सुपीक जमीन लागते.योग्य वातावरण लागते..! साधे निरीक्षण,निसर्गात बदल होतो. वसंत ऋतूची चाहूल लागताच अगदी उघडी बोडकी झालेली डोंगरावरची झाडे व गवत फुलायला लागतात. वसंताचा स्पर्श होताच निसर्गातला रोमांच उत्तेजित होतो आणि झाडांवर कळ्या डोकवायला लागतात फुले येतात. 
    फुले आली कि पुन्हा त्यांच्यात फलधारणा होण्यासाठी फुलांतून परागीकरण व्हावे लागते अश्या खूप गोष्टी आहेत ज्या लक्ष्य वेधुन घेतात.आता देवांनी जर धर्म रक्षणासाठी समाजात जन्म घेतला असेल तो ही बिन बापाचा?. तर आपण हा विचार नक्कीच करायला हवा “एका परमेश्वराचा गायीच्या  गोठयात जन्म झालाय म्हणे, त्याची आई कुमारी माता, लोकांनी तिलाही देव मानला आणि त्या मुलालाही..! मग समाजात अशा  एखादी घटना घडली तर समाज ते का स्वीकारत नाही.अशा कथां सर्वच धर्मात मध्ये आढळतात, (बुद्ध धम्म सोडुन )त्याला  रामायण-महाभारतात अपवाद नाही..! मग आज अनेक कुमारी माता मुलाना जन्म देतात त्या कुलटा का ठराव्यात.एका बाजूला ज्याना आम्ही पाहिले नाही अश्या बिन बापाच्या अपत्याला आम्ही देव मानायचे आणि दुसर्या बाजूला आज असे अपत्य जन्माला आहे कि त्या मुलाला आणि त्याच्या आईला समाजातून बहिस्कृत करायचे..!
    लोकांच्या भावनाचा काही ताळमेळ नाही. वाचता-वाचता असे लक्षात येते कि,शूद्रांचा जन्म हा ब्रम्हदेवाच्या पायाच्या अंगठ्यातून झालाय.आता पायाला किंवा अंगठ्याला असा कोणताही भाग नाही कि तेथून एखादी मुंगी जन्मास येईल किवा बेंबीमधून कोणी जन्माला येईल च कसा?. मग हा काय प्रकार आहे. जीव जन्माला घालायचे हे कोणते अनाधिकृत मार्ग..!
  आंब्याची बी (कोय) देखील अंकुर घेत असताना तिच्या आकाराचे निरीक्षण करा आणि आणि या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाचा अभ्यास करा आणि मग ठरवा कि किती देव बिन बापाचे आणि आईचे जन्माला आलेत.मग असे अनैसार्गिक पद्धतीने जन्म घेणारे देव कसे..? कोणता ही ताळमेळ नसतांना, रूढी परंपरेच्या नावाखाली देव-धर्माची भीती घालून, भारतातील असंख्य जन-समुदायाला पिढीजात दैवी-गुलाम बनवून काही समुदाय काल्पनिक कथा रचून लोकांना मुर्ख बनविन्याचे काम पिढ्यान-पिढ्या करतोय आणि आजची स्वताला सुशिक्षित,साक्षर म्हणणारी  २० व्या -२१ व्या शतकातील पिढी त्याचे मोकाटपणे पालन करतेय..! यालाच बुद्धि गहान ठेवलेला समाज म्हणता येईल.

1 comment: