महाड चा बाम्हण्या विरोधी रण संग्राम
भारतदेश च नव्हे तय जग विज्ञान युगाचा वापर करून झपाट्याने पुढे जात आहे. पण काही लोकांची मानसिकता बाम्हण्या सोडून जायाला तयार नाही.बाम्हनानी त्यांच्यातील बाम्हण्या बहुसंख्य बहुजन समाजाच्या रक्तात आणि मेंदूत भरून ठेवले ते बाहेर काढण्याचे प्रयत्न अनेक महामानवानी संतानी केले.त्यातील काही संताना , महामानवाना त्याच्या जातीने सुद्धा स्वीकारले नाही.कारण त्यांनी बाम्ह्ण्याचे विष मानवाच्या डोक्यातून काढण्याचे खूप जीवतोड संघर्ष केला.पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी जो महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष केला त्याला तोड नाही.चवदार तळ्याचे पाणी पिऊन कोणताही प्रश्न सुटणार नव्हता पण बहुजन समाजातील लोकांच्या डोक्त्यातील " बा ट " असुद्ध होण्याचा जो समजा होता तो काढण्यासाठीचा संघर्ष होता.बाम्हनाला शिव्याशाप देण्या पेक्ष्या कृतीतून जनजागृतीसाठी जनसामान्य समाजाचे संघटन उभे करून रक्ताचा एक थेंब न सांडता संघर्ष करणे हीच नेतृत्वाची कसोटी असते.त्यात बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले.आजचे अनेक बामसेफ चे लोक उठसुठ बाम्हणाना शिव्या देतात.समाजाची कोणतीही समस्या घ्या त्याला बाम्हणच जबाबदार सर्व समाजाचे व्यवस्थापन त्याच्या कडे आहे.हा समज बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासपूर्ण जनांदोलन,सत्याग्रहातून सोडून दाखविला तरी आज त्यांची जनता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.भारत देश हा संविधाना नुसार चालला पाहिजे.चालत नसेल तर त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी पाहिजे.त्यासाठी जनसंघटना ,पक्ष पाहिजे.किंवा विरोधी पक्ष म्हणून काम केले पाहिजे.२० मार्च १९२७ चा महाड चवदार तळ्याचा संघर्ष आंबेडकरी चळवळी करिता आज हि प्रेरणादायी आहे.
No comments:
Post a Comment