जगाला शांती,समता,स्वतंत्र बंधुभावाची शिकवण देणारे तथागत भगवान बुद्ध. यांनी दाखविल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न प्रत्येक देशातील माणूस करतो आणि म्हणतो आपल्याला युद्ध नको,बुद्ध हवा.पण तो माझ्या घरात नको दुसऱ्या घरात हवा.प्रत्येक देशातील अंतर्गत वाद पाहिल्यास त्यांना कशाची गरज आहे ते लक्षात येते.त्यातू प्रत्येक मानवाचे घर भी सुटत नाही.त्यामुळे सर्वसाधारणपणे संसार चक्रामध्ये मनुष्य जातीची धडपड ही असतेच.
आपल्या संसारामध्ये लग्न करणे, मुलंबाळ जन्माला घालणे , त्यांना जगविणे , शिकविणे , परत लग्न करुन देणे, कामधंद्याला लावणं आई वडीलांनी जे केले तेच या मुलाबाळांना संसार चक्रा मध्ये माणस पिढ्यान पिढ्या जगत असतात.आणि कधीतरी एक दिवशी मरतात. हा या संसारचक्राचा नियम आहे. जात्यामध्ये सर्वच दाणे भरडले जातात पण चारदोन काही दाणे खुंट्याला अडकून राहतात. जे भरडले जात नाहीत. तसीच आपल्या संसार चक्रात अडकून मनुष्य त्यात भरडली जाते. पण काही लोक जिवंत राहतात.काही खाण्यासाठी जगतात,काही जगण्यासाठी खातात, काही या संसारचक्राच्या ही पलीकडे जावून,पाहून विचार करतात. अशीच माणसं “महापुरुष’ ठरत असतात. महान आदर्श ठरतात.
सिद्धार्थ गौतम अशाच मनुष्य जातीत जन्माला आले. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स. पूर्व 563 वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. राजवैभवात जन्मलेला हा राजपुत्र सुरवात पासूनच संसारतील विविध सुख,दुखाच्या घटना पाहून प्रश्न निर्माण करीत होता.त्याच्या प्रत्येक प्रश्नाची समाधान कारक उतर मिळत नसल्यामुळे तो कुठे हि रमत नव्हता.त्यांना मोह्मायात गुंतवण्यासाठी अनेक प्रकारचे महाल बांधून त्यात रूपसुंदरीचा सहवास उपलब्द करण्याचा नाना प्रकारे प्रयत्न झाला. पण सिद्धार्थ कुठे ही अडकत नव्हता.सभोवताली संसारासाठी असणारी वैभवशाली सुखं सिद्धार्थाला उपलब्ध होती पण या संसाराच्या सुख उपयोगात न रमता त्यांनी राजवैभवाचा त्याग करुन गृहत्याग केला आणि मानवाला दुख्मुक्तीचा मार्ग ज्ञानमार्गातून दाखवून दिला. म्हणून सर्व जगभर लोक भगवान बुद्धाचा विचार हा मानव प्राणी मुक्ती करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. हे सत्य त्यांनी जगाला सांगितले आहे. कुटूंबाच्या कुटूंब आणि राष्ट्रच्या राष्ट्र बुद्धाचा विचार स्विकारतात. पण महाराष्ट्रातील महाराचे बौद्ध झालेले लोक पुन्हा घर वापसी कडे फिरताना दिसतात.म्हणून म्हणतात युद्ध नको, बुद्ध हवा,पण माझा घरात नको. दुसऱ्याच्या घरात हवा.बुद्ध जयंतीच्या निमित्ताने असे सांगावे वाटते. आपल्या देशात तेहतीस कोटी देव असताना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का नव्हता?.हिंदू धर्मातील बहुजन समाजाला देव, ईश्वर, स्वर्ग, नरक या संकल्पनांमध्ये माणसांना अडकवून ठेवले. पाप पुण्याच्या संकल्पनेत गोठवून ठेवून त्यामुळे पापातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला ईश्वरांचे दलाल पुजारी, पुरोहित हे अवैज्ञानिक मार्ग सांगत असल्याचे आपण दररोज दूरदर्शनवर,प्रिंट मिडीया मध्ये पाहतो. अमुक अमुक प्रकारचा अभिषेक केला की पापातून मुक्ती होते. , नदीत स्नान करून नारळ फोडले कि माणसाचे कल्याण होते अशी चुकीची शिकवण लहानपणा पासून मुलामुलीला दिली जाते.त्यामुळे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात गुमराह मूर्ख बनविला जातो. पण भ. बुद्धांनी मात्र पुजेच्या कर्मकांडाचा विचार न देता आचरणाचा महान असा विचार दिला आहे. जो माणसाच्या कल्याणाचाच आहे. बुद्धाचा धम्म हा अनुभवण्याचा आहे. सुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर मनुष्यजात सुखी होऊ शकते म्हणूनच डॉ. बाबासाहेबा आंबेडकर यांनी या सदधम्माचा स्विकार केला. त्याला गालबोट लावण्याचे काम काही लोक करताना दिसतात.असंघटीत कष्टकरी मजुरांच्या जनांदोलनातून शिक्षणात आणि नोकरीत सवलती घेणारा एक वर्ग हा बौद्ध धम्माशी मोठ्या प्रमाणात पातरणा करताना दिसतो. त्याच्या घरात हिंदू धर्मांचे देवारे पुन्हा सजताना दिसतात.ते च लोक समाज प्रबोधनाच्या नांव खाली खेड्यातील मजुरांना आणि शहरातील असंघटीत कामगाराना सांगतात युद्ध नको,बुद्ध हवा.पण माझ्या घरत नको तुमच्या घरात हवा.बुद्ध जयंतीच्या सर्व वाचकांना हार्दिक मंगल कामना !! सर्वाचे मंगल हो !!!
No comments:
Post a Comment