९ जुले दलित पंथरचा स्थापना दिवस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण च्या नंतर दलित चळवळीचे नेतृत्व समर्थ हीन झाले.लाचार होऊन गटबाजीत अडकले तेव्हा त्यांना समर्थ पणे तोंड देणारी आणि गोरगरिबांच्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी धावून जाणारी जी तरुण तडपदार जहाल युवक चळवळ उभी राहली. दलितांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे दलित पँथर. अमेरिकेतील निग्रो कृष् णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॉक पँथर या संघटनेचा प्रभाव दलित पँथरवर होता. १९६६ साली ह्यू.पी.न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पँथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलँड येथे केली होती. दरम्यानच्या काळात त्यावर अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून येत असत. सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमधे ब्लॅक पँथर या संघटने विषयी उत्सुकतेपोटी चर्चा होत असे. वास्तविक अशा प्रकारच्या संघटनेने आपल नेतृत्व करावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
महाराष्ट्रात १९७० च्या आसपास दलित मागासवर्गीय जातींवरील अन्याय अत्याचारांनी कळस गाठला होता.या सगळ्याचा परिपाक म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली आणि पँथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई ) येथे ९ जुलै १९७२ रोजी भरली. बैठकीत स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार आणि रिपाई नेतृत्व अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले. १५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पँथरमधे प्रवेश केला.प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे विचारपीठ वाटत होती. रिपब्लिकन नेतृत्व हे उच्च जात वर्गीयाचे दलाल झाले होते.तेच आंबेडकरी चळवळी चे मारेकरी ठरले कारण रिपाईचा प्रत्येक गट म्हणजे सत्ता धारयांनी निर्माण केलेले संस्थान आणि त्याचा नेता म्हणजे संस्थानिक होते आज भी आहेत.त्याच मुळे आंबेडकरी चळवळ कायमची गटबाजीत विभागल्या गेली.तिला कायम आमदारकी खासदारकी चे गजर दाखवीत झुंजवत ठेवण्याचे कसब सत्ताधारी धनदांडगे, जातदांडगे यांनी दाखविले आहे.
१९५७ ते १९७० च्या साचेबद्ध दलाल,धोकेबाज प्रवृत्ती विरुद्ध दलित पंथर नांवाची वीज कोसळली होती.तिने सम्रग व्यवस्था बदलून टाकण्याची घोषणा केली होती आणि जगातील सर्व क्रांतिकारी लढयाशी आपले ऐतिहासिक नाते सांगितले होते विशेषता अमेरिकेतील निग्रो कृष्णवर्णीयाची क्रांतिकारी संघटना ब्लॉक पंथर चे आदर्श उराशी बाळगले होते.आणि आपले शत्रू व मित्र यातील नाते स्पष्ट केले.आणि फुले,शाहू,आंबेडकरी विचारांवर आधारित एक क्रांतिकारक कार्यकम दलित पंथर च्या तरुण कार्यकर्त्यांनी दिला होता.या उठावाने सत्तेवर हल्ला बोल केल्याने सत्ताधीश आणि त्याचे संस्थानिक दलाल दलित नेतृत्व आरपार हादरून गेले होते.परंतु सांस्कृतिक पातळीवर लढाऊ भूमिका मांडणारया दलित पंथरला उच्चजातवर्गीय शासन यंत्रणेने प्रचंड दमन करून खतम केले.
कल करो सो आज, आज करो तो अभी, अशी भूमिका घेणारे सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणार्या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले जात होते.त्यामुळे शहरातील सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा तरुण खेड्या पाड्यातील अन्याय अत्याचार पाहून पेटून उटत होता..त्या अन्याय,अत्याचारला वाचा फोडण्यासाठी पुढेया आणि नेतृत्व करा असे कधीच कुणाला सांगण्याची गरज पडली नाही.स्वताहून तरुण स्थानिक पोलीस आणि प्रशासनाशी लढत होते.यामुळेच दलित पंथर चा इतिहास झाला.
पँथरने आपल्या जाहीर केलेल्या भूमिकेत म्हटले होते.दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला सार्या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने, शिक्षणातील उदारमतवादाने आमच्यावरील अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही. आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू. या प्रचंड समूहांतील संघर्षामधून क्रांतीची लाट येईल. सनदशीर अर्ज, विनंत्या, सवलतीच्या मागण्या, निवडणुका, सत्याग्रह यामधून समाज बदलणार नाही. आमच्या समाजक्रांतीच्या कल्पना व बंड या कागदी जहाजाला पेलणार नाही. त्या मातीत रुजतील, मनात फुलतील, पोलादी वहानातून सणसणत अस्तित्वात येतील -दलित पँथर या चळवळीचे लढाऊ आणि आक्रमक रूप म्हणून लोकांच्या पुढे आले होते.ज्यांनी हे मांडल ते त्यावेळी खूप प्रामाणिक होते.जेव्हा त्याच्या मुख्य उधिष्टा पासून दलित पंथर ची तरुण नेते मंडळी भटकली आणि दिशा हीन झाली.त्यांचे जिवंत पाणी थडग बांधल्या गेले.
आज महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळी तील लोकांना वाटते दलित पंथर सारखी संघटना हवी.पण आज जी काही नेते मंडळी आहे ही सर्व दलित पंथर च्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा केलेले नेते आहेत. तडजोडी च्या राजकारणामुळे त्याकाळची रिपाई लाचार झाली होती.त्या पेक्षा जास्त सवाई बनेल नेतृत्व आज तालुखा,जिल्हा राज्यात निर्माण झाले आहे.आजची सर्व नेते मंडळी अन्याय,अत्याचार झाल्यावरच कामाला लागते, अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिलेला सनदशीर मुलभूत अधिकार त्यातून दलित मागासवर्गीय समाजाचा सर्वगिन विकास आणि कल्याण झाले पाहिजे.त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे कायदे,योजना याची माहिती आजचे कार्यकते आणि नेते घेत नाही.दलित पंथर नी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली भूमिका सर्वच विसळले आहेत. दलित पंथर सारखी संघटना हवी असेल तर त्याचा जाहीरनामा स्वीकारला पाहिजे दलित पंथर चळवळीत जे जे शहीद झाले त्यां सर्वाना दलित पंथर स्थापना दिना निमित्य विनम्र अभिवादन!.
No comments:
Post a Comment