डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत कोणताही कार्यकर्ता आपल्या घरादाराची परवा न करता झोकून देत असतो.आणि चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याची कधीच खंत नसते.कारण त्याच्या नसानसात त्या बाबासाहेबाचे वैचारिक विचार भरलेले असतात.दलित शोषित वंचित समाजाच्या न्याय हक्क साठी ज्या डॉ बाबासाहेबांनी आपल्या स्वताच्या कुटुंबातील बायको मुलाची परवा न करता रात्र दिन अभ्यास करून संघर्ष केला.बाबासाहेब नावाच्या ज्ञानसुर्य आणि रमाई नावाच्या त्यागमुर्तीच्या पोटी १२ डिसेंबर १९१२ ला जन्मलेले भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर.१७ सप्टेंबर १९७७ ला त्याचे निधन झाले त्याच्या स्मृतिदिनानिमित्त आत्मचिंतन
आज देश भरातील कार्यकर्ते नेते.आपल्या मुलाना सर्व सुविधा असताना त्याचे योग्य पालन पोषण करू शकत नाही.मग तेव्हा सर्व आर्थिक परिस्थती बेताची असताना बाबासाहेबांच्या अपेक्ष्यांच्या भाराने दबून राहिलेले भय्यासाहेब.परीस्थितीतीने दिलेल्या चटक्यांनी जीवघेण्या आजाराशी अहोरात्र लढणारे भय्यासाहेब.बापाचे महापुरुषत्व पेलतांना स्वतःमधल्या सामान्यत्वाला बळी पडलेले भय्यासाहेब.बाबासाहेबांच्या महापरी निर्वाना नंतर स्वतःसोबत संपूर्ण परिवाराला समाजासाठी, धम्मकार्या साठी झोकून देणारे भय्यासाहेब.आणि गटबाजी गावकी भावकीच्या स्पर्धेपासून लांब राहू पाहणारे भय्यासाहेब त्यामुळे सदैव समाजातून दुर्लक्षित झालेले.त्यागाचा बळी ठरलेले.महापुरुषाचा वारसा लाभला असतांना उपेक्षिताचे जीवन जगणारे.समाजाच्या रोषाचे बळी ठरलेले भैय्यासाहेब आंबेडकर.
भय्यासाहेब लहानपणा पासूनच न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले होते. त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी मीराताईंशी झाले . भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले.त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला. त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता. नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते. बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा " थॉट ऑफ पाकीस्थान " हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ " फेडरेशन वेरसुस फ्रीडोम " हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित " बौद्धपर्व " हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर ते वापर करीत असत. भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झालेच पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते . महाडच्या चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला .चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी मुंबई महानगरपालिका कडे ४० बाय ४० ची जागा मागितली मुंबई महानगरपालिका ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला .अखेर मुंबई महानगरपालिका सुधार समिती ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . मागसवर्गीय फेडरेशन आणि रिपाई पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही मोठ्या प्रमाणत दान देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत पायपीट करून समाजाला दान देण्याचे आवाहन करीत होते. १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस " अमृत महोत्सव " म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले.या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ.बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून " भीम -ज्योत " "महु ते मुंबई " काढण्याचे ठरविले व २७ मार्च १९६६ रोजी "भीम -ज्योत " भारताचे मजूर मंत्री ना.बापू जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले. बाबासाहेबांच्या महापरी निर्वाणा नंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. "भारत बौद्धमय करीन " हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला होता.भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधान परिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. " बौद्ध जीवन संस्कार पाठ " या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव "महापंडित काश्यप " असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले " आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा " आपण आमच्या सोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ . स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले " मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा .महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले होते . जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व कसे उभारायचे. याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली होती. हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही. हीच खरी शोकांतिका ठरली. याच गृहीतकांवर आधारित भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू सापडू शकतील.त्याच प्रमाणे आजच्या सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्याच्या कार्यकर्त्याच्या मुलामुलीचे नाही नाना प्रकारच्या तडजोडी करून मुलाचे लाड पुरविल्या जातात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तीमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडतांना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिपेक्षात परीस्थितीतीय बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंठकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांनी बाबासाहेबांच्या परि भाय्यासाहेबावाराची केलेली ही प्रतारना आहे. बाबासाहेबांनी या समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड अश्याप्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराची (मुलाची) प्रतारना करून जर आम्ही करीत असू तर आम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहतो का ? भैय्यासाहेबांच्या स्मृती दिना निमित्य आपण पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.भैय्यासाहेबांच्या स्मृतिदिना निमित्य त्यांना कोटी कोटी प्रणाम
No comments:
Post a Comment