कोरोना,अयोध्या आणि ओबीसी.
वादग्रस्त बाबरी मशीद ढाचा आणि राम मंदिर वाद 11 मे 2020 पासून संपून, सत्याकडे अर्थात मूळ बुद्ध भूमीकडे वाटचाल करीत आहे. या देशातील लोकसंख्येच्या 52 टक्के ओबीसी बांधवांच्या उत्कर्षासाठी आलेल्या मंडल आयोगाला गाडण्यासाठी जे राम जन्म भूमी आंदोलन उभे करण्यात, त्यात उच्च वर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यशस्वी झाले; ते अयोध्येच्या रामाचे अस्तित्व आज भारतीय पुरात्वीय विभागाच्या वास्तुरुप पुराव्यानिशी संपले आहे.
ओबीसी आरक्षणासाठी लढलेल्या, त्यासाठी स्वतःस उध्वस्त करून घेतलेल्या, प्रचंड त्यागाचा आदर्श देणाऱ्या, ज्ञात अज्ञात आंबेडकरी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.या आंबेडकरी बौद्ध आणि ओबीसी कार्यकर्त्यांत जनार्दन पाटील, जगन्नाथ कोठेकर, दि बा पाटील या आगरी समजातील कार्यकर्त्यांची आठवण करावी लागेल. कारण त्यांनी मंडल आयोगाची लढाई अयोध्येचा राम नाकारून लढली होती.
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्वच आगरी कोळी कराडी भंडारी माळी ओबीसी कार्यकर्त्यांच्या अंगावर राम नाकारल्यामुळे अंगावर शहारे येऊ शकतात! स्वातंत्र्यानंतर टिळक नेहरू गांधी या कॉंग्रेसच्या चळवळीस जी सत्ता मिळाली त्यात अयोध्येचा राम हा अविभाज्य भाग होता. कॉग्रेसच्या या रामाला अर्थात वैश्य "महात्मा गांधींना" गोळ्या घालूनच, ब्राह्मण नथु रामाने सावरकर गोळवलकर ते अटलजी प्रमोद महाजन आणि आताची मोदिसत्ता आणली!. ही सुद्धा रामाच्या आणि राम मंदिराच्या नावानेच ना?.. राम जन्म ते रामायण, कृष्ण जन्म ते महाभारत याची चिकित्सा फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
भारतीय लोकांच्या खास करून ओबीसींच्या मनावर राज्य करणारे दशावतारातील राम कृष्ण, यांच्याबाबत जागतिक स्तरावर ऐतिहासिक, पुरातत्वीय पुरावे सापडत नाहीत. जागतिक इतिहासाचा अभ्यास केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच राम कृष्ण, या घरा घरात आजही विराजमान झालेल्या या महादेवांची परखड चिकित्सा केलीय. कोरोनाच्या तिसऱ्या जागतिक महायुद्धात, परदेशी शिष्यवृत्तीसाठी क्रीमीलेयर लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या धनुर्धारी धनंजय(अर्जुन) मुंडे सरकारवर तुटून पडणारे संविधान रक्षक बौद्ध बांधव आम्ही या लाॅकडाऊन मध्ये पाहिले! इंग्लड अमेरिकेच्या शिक्षणात गुलामी नष्ट करण्याची ताकद आहे. म्हणूनच ते वाघिणीचे दूध आहे. भारतीय इंग्रजी माध्यमात ते नाही; हे सत्य बाबसाहेब आंबेडकरांच्या जगात दुम दुमणा-या मानवी डरकाळी मुळे सारेजण जाणतात.
बौद्ध काळातील नालंदा तक्षशिला सारख्या जगद्विख्यात विद्यापीठातील, दैववादाच्या पलीकडे मानवी तर्क बुद्धीस घेऊन जाणाऱ्या शिक्षणाची वाट मनुस्मृतीच्या दैववादी विचारसरणीने लावली. स्वदेशीच्या आग्रहासाठी लढणाऱ्या वर्तमान राजीव दीक्षित सारख्या भारतीयांना, खऱ्या गुलामीचे समर्थन करावयाचे असते. म्हणूनच स्वदेशी वस्तू आणि मनुवादी शिक्षणाचेही ते सहज समर्थन करतात. ओबीसी समाजाने आज कॉंग्रेसी खादी आणि भाजपायी मोदी यात ओबीसींचा सर्वनाश आहे, हे ओळखून आजतरी ओबीसी समाजातील किमान 2000 मुले मुली परदेशात सरकारी खर्चाने पाठविण्याचे वंचितांचे राजकारण केलेच पाहिजे! मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसींना याबत नेहमीच धन्यवाद देईन.
आजपर्यंत बॅरिस्टर गांधी आणि बॅरिस्टर सावरकर यांनी ओबीसींना आवश्यक असलेला विदेशातील बुद्धीवाद, तर्कशुद्ध विचार, मानवतावाद देशात सांगितला नाही. कारण त्यांना या देशातील मनुस्मृती प्रणित व्यवस्थेचे लाभधारक असलेल्या ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या जन्मदात्या स्वजातींशी पंगा घेणे जमले नाही. हा त्यांचा ऐतिहासिक पराभव नोंदवावाच लागेल.
लोकानुनय करून सत्ता संपादन करणे ही भारतीय राज्यकर्त्यांची फार जुनी घाणेरडी सवय आहे. त्यात वर्तमानातील सारे उजवे डावे पक्ष आणि धर्म संप्रदाय आणि बुद्ध विचारांना नाकारणारे विचारवन्त सहभागी आहेत. समाजाला जीवन धारणेसाठी आवश्यक, परन्तु कटू असलेले सत्य निर्भीडपणे सांगतो तोच खरा 'नेता'. तो पराभवाची काळजी कधीच करीत नाही. ही नेतृत्वाची व्याख्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि जगूनही दाखविली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक राजकारण करणाऱ्या पक्षांना भारतात जे अपयश आलेय, त्यास राम आणि कृष्णाना मानणाऱ्या ओबीसी मतदारांचा वाटा मोठा आहे. आंबेडकरी राजकीय सामाजिक नेतृत्वाने यामुळे निराश होऊ नये. अशी घटना अयोध्येत घडली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी 11 मे रोजी सपाटी करण्याचे, मंदिरासाठी पाया घालण्याचे काम अयोध्येत सुरू आहे. 21 मे रोजी बौद्ध वास्तू आणि मूर्तीचे अवशेष समोर येतात याचा अर्थ मागील दहा दिवसांत बरेच पुरावे नष्ट झालेत! "मोदी है तो मुमकीन है।" हे साऱ्या भारतीयांना कोरोनामुळे उमजून आलेले सत्य आहे. "हे राम" असे शेवटचे उद्गार, मृत्यूच्या दारात कोसळताना काढणाऱ्या राष्ट्रपित्याची राम निष्ठा निदान संघवाल्यानी कधीच विचारू नये! 'ईश्वर अल्ला तेरो नाम' झालेल्या गांधींना बुद्ध दिसला नसला तरी राम हा त्यांचा आतला आवाज होता. अगदी आजही हृदयात राम जपणाऱ्या चिरंजीव मारुती आणि रामनिष्ठ ओबीसी पेक्षाही प्रामाणिक गांधीजी सारख्या,अहिँसक महापुरुषांचा वध करणारा ब्राह्मण आतंकवादी नथुराम गोडसे आहे! त्यामुळेच सत्ताधारी संघ परिवारास राम हा आदर्श प्रत्यक्षात जगायचा नाही! हे प्रमोद महाजन आणि त्यांच्या बंधुप्रेमातून आलेल्या मृत्यूने, जगासमोर आलेलं सत्य तुम्ही जाणता? प्रश्न साऱ्या भारतात कथा पुराणातून घरोघरी पोहचलेल्या परन्तु, प्रत्यक्ष इतिहासात, अस्तित्वात नसलेल्या रामाचे नाव घेऊन गांधी आणि गोळवलकर याना सत्ता मिळविता येते. ही जुमलेबाज राजकारण्यांची राजनीती आहे. संविधानाच्या प्रस्ताविकेत सांगितलेली "संविधानिक नैतिकता" नाही.
भारताची सत्ता मिळविण्यासाठी इंग्रजांना जो सैनिकी युद्धाचा फार मोठा संघर्ष करावा लागला, तो भारतातल्या उच्चवर्णीय लोकांना राम नामाने मिळविलेला अध्यात्मिक विजय होता. आज मोदींच्या या राम मंदिर अडवाणी यात्रेच्या पराक्रमाची, गाथा ऐकूनच ट्रम्प तात्या मोदींचे फॅन झाले असतील. राम कथे इतकाच श्रवणीय भाजपचा सत्ता संघर्ष आहे. भारताच्या नव्या अभ्यासक्रमात तो असणारच अशी लक्षणे दिसतात.रामायण महाभारत लिहिणारे वाल्मिकी आणि व्यास ओबीसींना जेवढे पूजनीय आहेत तेव्हढि लोकप्रियता संविधानकाराच्या वाट्यास आली नाही, याचे मूळ कारण रामायण महाभारत हे लोकांना आवडणारे असत्य कथन महाकाव्य आहे. तर भारतीय संविधान हे जीवनावश्यक परन्तु कटू सत्य आहे.
आज अयोध्येत काय सापडले आहे? तर बौद्ध सत्य इतिहास सांगणारे भौतिक पुरावे! ज्याचा बाबर मुस्लिम आणि राम हिंदू वादासी काडीचाही संबंध नाही. यात बुद्ध मूर्तीचे अवशेष, सम्राट अशोकाच्या बांधणीत नेहमी दिसणारे स्तंभ,पाली भाषेतील शिलालेख!! तसेच ही बुद्ध कालीन साकेत नगरी आहे जेथे महामाया एकविरा पुत्र बुद्ध यांनी तीनवेळा प्रत्यक्ष भेटी दिल्याचे विदेशी प्रवासी इतिहासकार सांगतात.
भारताच्या अर्वाचीन इतिहासात हिंदू मुस्लिम सत्ताधारी लोकांनी, लाखो निष्पाप लोकांचे बळी घेऊन आजची सत्ता मिळविल्या मुळे, खऱ्या "सत्या" पेक्षा राजकीय सत्ताच महत्वाची आहे. तरीही भारतात नेहमी सत्याचाच विजय होतो. म्हणूनच आमच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आम्ही स्वीकारलेय. त्याचा याची देही याची डोळा, कोरोनाच्या या युद्धात याचा येणारा प्रत्यय म्हणजे अयोध्येत सापडलेले बौद्ध अवशेष होय.
भारताला बुद्धाच्या देशा पर्यंत 2500 वर्षे जुन्या काळात घेऊन जाण्याचे ऐतिहासिक कार्य सर अलेक्झांडर कनिंगहम यांनी केलेय. ते पहिल्या भारतीय पुरातत्व खात्याचे पाहिले महा निदेशक होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1814 साली झाला. 1834 ते 35 या कालखंडात त्यांनी सारनाथ येथे बौद्ध स्तुपाचे उत्खनन केले. हे पहिले भारतीय उत्खनन होय. देशाचा सातबारा बदलण्यात माहिर, उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जमिनी खालचा इतिहास बदलू शकले नाहीत. 2000 वर्षांपूर्वी सारा देशच बुद्ध आणि बौद्ध सम्राट अशोकाच्या साम्राज्यात बौद्धमय होता. अर्थात आज जमिनीखाली बुद्ध आणि बुद्धच आहे. आज राम कृष्ण आणि बुद्ध या बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धांना आघात करून कुणाचेही मन, भावना दुखावण्याचा या लेखाचा हेतू नाही. मी देव, ईश्वर नाही, स्वर्ग, चमत्कार, नवस, आत्मा, पूजा, चमत्कार, नशीब मानीत नाही, मी कुणाचा गुरू प्रेषित नाही हे सांगणारा बुद्ध हेही सांगतो की एखादी गोष्ट धर्मग्रंथ, धर्मगुरू, परंपरा सांगतेय म्हणून स्वीकारू नका तर तुमची इंद्रिये आणि सद्सद्विवेक बुद्धी आणि लोकांचे कल्याण यांना अनुकूल आहे म्हणून स्वीकारा कालाम सुत्तामध्ये हा बुद्ध संदेश विस्ताराने पहाता येईल. अर्थात ओबीसींना आज माहीत नाही. आज खरी गरज असताना देव देवतांच्या चमत्कारी मंदिरांना टाळे लागलेय! मंदिरातील अब्जावधी रुपये मंदिराच्या पुजाऱ्याच्या तिजोरीत आहेत. लोक मरताहेत पुजारी पैसे सोडत नाहीत.
आता रामाच्या नावे अयोध्येला पुन्हा एक मंदिर बांधून पैसे सांभाळायला पुन्हा 100 टक्के उच्चवर्णीयच येणार. ओबीसी कदापि नाही. कोरोनाच्या काळात मैदान सोडलेल्या देवांना पुन्हा आणण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. या जगात देव, स्वर्ग चमत्कार नाही हे सांगणारा बुद्धच सत्य आहे. कोरोनाच्या काळात खूप चांगल्या घटना निसर्गात घडताहेत. कोरोना लाॅकडाऊन सुरू होण्यापूर्वी 29 दिवस सलगपणे मी केरुमाता बौद्ध लेणी बचावासाठी आंदोलन केले होते. आयोध्येप्रमाणेच जागतिक पुरावे असूनही सिडको नवी मुबंई विमानतळासाठी ही बौद्ध लेणी उध्वस्त करतेय. ही लेणी आगरी कोळी कराडी सागरपुत्र समाजाने बांधली. ती आमच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि सागरी आरमारी परंपरेची स्मृती आहे. आमची दहा गावे आणि हजारो मच्छिमार यांना लिखित पुरावे नाहीत म्हणून पुनर्वसन नाकारणारे केंद्र आणि महाराष्ट्राचे शासन हे दोन्ही येथल्या मागासवर्गीय ओबीसी समाजाचे आणि मातृसत्ताक एकविरापुत्र बुद्धाचेही विरोधक आहेत, हे मला कळले आहे. आज शहरे सोडून रस्त्यावर पायी चालणारा कामगार, मजूर हे भारतीय ओबीसी वंचित उपेक्षित सत्यच आहे. जरी रिझर्व बँकेत त्यांच्या नावे धनादेश लिहिणारी सीता रामन आमच्याकडे नसली तरीही.. आकाशातल्या स्वर्गाकडे आत्मनिर्भर होण्यासाठी बोट दाखविणाऱ्या शेटजी भटजिनो कष्टकरी स्त्रिया ओबीसी एससी एसटी मागासवर्गीय भारतच देश घडवितो हे जमिनीखाली आणि जमिनीवर आकाशात कुठेही जा..! सत्य श्रमण भारताचे, कष्टक-यांचेच आहे. दुसऱ्याच्या कष्टावर जगणारे, शरीराची प्राण प्रतिकार शक्ती गमावून, एक दिवशी फुगलेले देह, फुगलेल्या अर्थव्यवस्थेसह मातीतच गाडले जातील! परन्तु जगाला सांगण्यासारखी अस्सल भारतीय जीवनमूल्ये अहिंसा, मानवता, करुणा, प्रज्ञा शील, समाधी या सद्गुणांची कमलपुष्पे बुद्धासारखीच,सम्राट अशोकासारखीच कोरून ठेवा!.
ओबीसींच्या नेत्यांनी जागे व्हावे "मुक्ती कोण पथे" हे भारतास सांगणारा संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्या साठी संघर्ष करा ही हाक देतोय!. कारण असत्याने आता आयोध्याच नाही तर प्रत्येक मागासवर्गीय भारतीयाला घेरले आहे.. कोरोना असेच एक मानवनिर्मित जागतिक भय आहे! जे रामरक्षेने नाही तर बुद्धाच्या विवेकबुद्धीने प्रज्ञेने नाहीसे करता येते..! मी केलेय!. तुम्हीही करा!!. हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक एकविरा संस्कृतीचा विजय व्होवो!!!*
राजाराम पाटील 8928452112,उरण,रायगड
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र.
No comments:
Post a Comment