Friday, August 28, 2020

कोरोना आणि उच्चवर्णीय आतंकवाद !

 कोरोना आणि उच्चवर्णीय आतंकवाद !       

         भारतातील मागासवर्गीय स्थलांतरित मजूर व त्यांचे मोलमजुरीचे एकदिवसीय रोखीचे "अर्थशास्त्र" समजून न घेता, आकस्मिक लादलेली नोटबंदी यास अनेकजण मोदींचा मूर्खपणा समजत होते. ती फार मोठी चूक होती. पाशवी बहुमत घेऊन निवडून आलेल्या भाजपा समोर शहाण्या देशवासियांनी मान मोडेपर्यंत झुकल्यामुळे, नोटबंदीत आपले नागरिक मृत्यूमुखी पडूनही, आम्ही शांत होतो. हे मोदी भाजपाचे सरकारी हत्याकांडच होते! काँग्रेसी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणी विरोधात देश निकराने लढला होता. तशी लोकशाही पूरक, परिस्थिती मोदींनी ठेवली नाही. लोकशाहीत अत्यन्त महत्वाचा असलेला विरोधी पक्ष आणि जागृत पत्रकाकरितेचा स्तंभ उलटा उभा करून, हुकूमशाहीच्या समर्थनार्थ उभ्या करणाऱ्या (वैश्य) शहा मोदी यांचे राजकीय कौशल्य, जुलमी भारतीय प्रशासकांच्या यादीत इतिहासाने नोंद घ्यावे एवढे मोठे काळेकुट्ट आहे! मोदींना ज्या पद्धतीने मीडियाने प्रमोट केले आहे, ते पाहता मोदींचे वक्तृत्व फेका फेकी करणे आणि मूल्यहीन, तत्वहीन, जुमलेबाज राजकारण आहे. यापेक्षा मनु समर्थक गोळवलकर, अटलजी, अडवाणी हे अधिक प्रभावी वक्ते होते. अयोध्येत अस्तित्वात नसलेल्या राम मंदिराचा मुद्दा घेऊन, हिंदू मुस्लिम दंगली पेटवून, सत्तेपर्यंत वाटचाल करणाऱ्या संघ परिवारास, देशाला भ्रमित करण्याचे सूत्र चांगले गवसले आहे.
       कोरोनाच्या चर्चेने जग भयभीत झाले असताना, आपल्याला हव्या त्या वेळी लाॅकडाऊन जाहीर करण्यात मोदींचा हिटलरी दुरदर्शीपणा, संघ भाजपात एकमेवाद्वितीय ठरला असला तरी आपल्या लोकशाही देशासाठी मात्र इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीच्या धोरणांनाही लाजविणारा ठरला. स्वातंत्र्या नंतर देशाचे कधीच भरून न येणारे नुकसान मोदी सरकारने केले आहे.
       साऱ्या जगास आशादायी वाटत असलेली नवशिक्षित तरुणाई मोदींनी आपल्या सतत नफा पाहणाऱ्या व्यापारी वृत्तीने निकामी करून टाकली आहे. ठरवले असते तर याच तरुणांनी कोरोनाच्या काळात खूप चांगल्या गोष्टी, देशाने मागील काळात लढलेल्या युद्धाप्रमाणेच यशस्वी केल्या असत्या. कोरोनाच्या मृत्यूचे भय उभे करून मोदींनी लपून छपून घेतलेल्या देशविरोधी निर्णयाची भरपाई आपणा सर्वानाच करावी लागणार आहे. नोटबंदी आणि कोरोना बंदी ही हुकूमशाहीच्या पेक्षा वेगळी गोष्ट नाही हे लवकरच साऱ्या भारतीयांच्या लक्षात येईल. छापील वृत्तपत्रे घराघरात वाटल्याने कोरोना प्रसार होतो आणि दारूविक्रीने महसूल मिळतो.. हे नागरिकांवरील सरकारचे प्रेम नाही,  तर जागृत लोकशाहीवर मद्य आणि मदिरालये यातून लादलेले बेहोशीचे षड्यंत्र आहे.
        2500 वर्षांपूर्वीचे भारताचे महान सुपुत्र भगवान बुद्ध यांनी पंचशील देऊन सांगितले होते. मद्यपान न करणारे शीलवान लोक उभे करण्याचा संकल्प करा आणि लोकशाहिस अनुकूल समाज उभा करा. चारित्र्याच्या गोलगप्पा मारणाऱ्या भाजपायी लोकांकडून ही अपेक्षा करणे चुकीचे असले तरी देशाला दारूने बेहोष करण्याचे मोदींचे हेतू कोरोना पासून देश वाचविण्याचे निश्चित नव्हते आणि नाहीत.
        जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात मोठे लिखित संविधान ही आपल्यासाठी अत्यन्त अभिमानास्पद बाब असली, तरीही कॉग्रेस भाजपा हे दोन्ही पक्ष हुकूमशाहीच्या समर्थनातले राजकीय पक्ष आहेत. अर्थात लोकशाहीच्या कायम विरोधातील पक्ष आहेत हे सहज लक्षात येते. या दोन्ही पक्षात मुख्य नेतृत्वात, चालक असलेली मंडळी मनुस्मृतीच्या शिकवणुकीतील वृत्तीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मंडळी आहेत. या देशातील बहुसंख्य शूद्र स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी, विजेएनटी या 85% भारताचे ते कायम शत्रू राहिले आहेत. प्रत्यक्ष करोनाग्रस्त म्हणून जे सरकारी दवाखान्यातून जिवंत बाहेर आले आहेत त्यांनी सरकारची लायकी जवळून पाहिली आहे. स्थलांतरित कामगारांनी आपले मरण याची देही याची डोळा पाहिलं आहे. आणि घरात बसून सुरक्षित जगलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना पुढच्या गरिबीचे धोके पाहून मानसिक मरण समोर दिसतेय.
          भारतीय प्रार्थनालयांतील बंदिस्त अर्थशक्ती ही, जगातल्या समस्त भाडवलंदारांना लाजविणारी असूनही, ती भारतीय मार्क्सवादी विचारवंतांना आजपर्यंत दिसली नाही? परन्तु मूळ (क्षत्रिय) मराठा मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिसली. देशात आज गरिबी आहे हे कॉग्रेस नेते राहुल गांधी,  सोनिया गांधी यांना कळतेय ही घटना खरोखरच कौतुकाची आहे! कारण संघ परिवास ते खोटे वाटतेय. पृथ्वीराज बाबा यांना साऱ्या देशाने पाठींबा दिला असता तर आज गरीब भारताला खूप मोठा  ऐतिहासिक न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात कॉंग्रेसला म्हणजे मराठ्यांना मंदिरातील ब्राह्मण विरोधात फक्त खुर्चीचे राजकारण करायचे होते. बाकी मनुस्मृतीच्या जानव्यात ब्राह्मण मराठे कायमचे बांधलेले आहेत, हे समस्त मागासवर्गीय भारतीयांनी समजून घ्यावे. लाॅकडाऊन मुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधात कामगार, विद्यार्थी, शेतमजूर यांच्यात प्रचंड असंतोष आहे. घरा घरात नोटबंदी आणि कोरोनाबंदीने गरिबीचा उच्छाद मांडलाय! असे असूनही महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे सरकार विरोधी सत्तेचे निर्लज्ज राजकारण करतात. त्यांच्या ब्राह्मणी स्वभावाचे मूळ शोधण्याचा मी इतिहासात शोध घेतला. महाराष्ट्रात ब्राह्मण विरुद्ध मराठे हे खरे विरोधी पक्ष आहेत. सर्वाधीक मुख्यमंत्री आणि सत्ता ही ब्राह्मण, क्षत्रियांचीच असते. मुख्यमंत्र्याची यादी पाहून हे सहज लक्षात येते. त्यामुळं फडणविस याना देशातील केंद्र सरकारच्या घोडचूका दिसत नाहीत परन्तु ठाक-यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या क्षत्रिय सत्तेला विरोध म्हणून राजकारण सुचते. या उच्चवर्णीय राजकीय निगरगट्ट पणास आतातरी ओबीसींच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे. इतिहासातील हा ब्राह्मण क्षत्रिय वाद हा एकमेकांच्या उरावर बसवून सत्तेचे लोणी आपापसात वाटून खाण्याचा आहेच परन्तु तो समस्त ओबीसींच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याचाही आहे. उच्चवर्णीयामधील ही मैत्रीपूर्ण लढत मागासवर्गीय बांधवाच्या विरोधातील आघाडी आहे. ब्राह्मण क्षत्रिय यांच्यातील हा वर्ग संघर्ष देशाला परकीयांच्या गुलामीत गाडणारा होताच परन्तु आजच्या कोरोना महामारीत पूर्णपणे उध्वस्त करणारा ठरू नये ! 
        प्राचीन हिंदू वैदिक साहित्यातील काही ठळक घटना मुद्दाम देत आहे. पहिला संघर्ष हा राजा वेणा यांच्याविरोधात होता. दुसरा संघर्ष राजा पुरुवंश ब्राह्मण वशिष्ठ व राजा नसलेल्या साध्या क्षत्रिय विश्वामित्र यांच्यातील होता. कृतवीर्यच्या क्षत्रिय वंशजांनी भृगु ब्राह्मण शिष्याची सामूहिक हत्या केलेल्या घटनेचीही नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ब्राह्मणाच्या वतीने सर्व क्षत्रिय वर्ग नष्ट करणाऱ्या परशुरामाची नोंद करण्यात आली आहे. हा संघर्ष इतका मोठा होता की क्षत्रियांनी ब्राह्मण होऊ नये असाही संघर्ष झाला होता .प्रथम कोणी कोणाला नमस्कार करायचा, वादात माघार कोणी घायची हाही संघर्ष झाला होता. या वर्गयुद्धाचा खरा फायदा ब्राह्मणांनाच झाला होता. ब्राह्मण क्षत्रिय वादाचा प्रभाव हा केवळ राजकारणा पुरता मर्यादित राहील नाही तर प्रशासन, पोलीस, न्यायव्यवस्था, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रावर आज त्याचा परिणाम जाणवतोय. हे परिणाम लोकशाही आणि मागासवर्गीयांच्या विरोधात गेलेत म्हणूनच त्याची थोडक्यात चर्चा आम्ही केली! 
          प्रवासी मजुरांना रेल्वे नाकारण्याचे केंद्रीय राजकारण आणि त्याचे समर्थन करणारे फडणवीस हे केवळ कॉंग्रेस राष्ट्रवादी ठाकरे सरकारचे विरोधक नाहीत तर मूळ मागासवर्गीय स्थलांतरित मजुरांचे हाडवैर जपणारे ब्राह्मण आहेत. त्यामुळं मोदींचे 20 लाख कोटी 85 टक्के मागासवर्गीय भारतीयांकडे कधीच पोहचणार नाहीत. ब्राह्मण क्षत्रिय युद्धात आम्ही केवळ  टाळ्या थाळ्या वाजविणारे प्रेक्षक राहणार. पुलवामा हत्याकांड ज्या पद्धतीने मोदी मीडियाने समोर आणले तसे धावत्या रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्या मजुरांसाठी माफीचा एकही शब्द नाही. साधूंच्या हत्याकांडाची देशव्यापी आग पेटवू पाहणाऱ्या महाराष्ट्र भाजपला, मागासवर्गीयांचे पारधी हत्याकांड का दिसू नये? तेथे उच्चवर्णीय युती होते. हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान यांच्यातील वादात, मारणाऱ्या मुस्लिम हल्लेखोर आरोपींना "आतंकवादी" "दहशतवादी", म्हणणारे उच्चवर्णीय विचारवन्त, जमिनी ताब्यात घेण्यासाठी साठी जमीनदारी सरंजामी क्षत्रिय वृत्तीने, पारधी समाज बांधवांचा खुले आम जीव घेणा-यांना काय म्हणणार आहेत?.  
       अलीकडे जय भीम बोलू लागलेल्या पुरोगामी जमीनदारांनी माफी मागून नव्या भारताची समतेची न्यायाची सुरुवात करायला हरकत नव्हती? भगवान महावीर, भगवान बुद्ध यांनी सांगितलेल्या विनयशील वृत्तीने अयोध्येत सापडलेल्या बौद्ध अवशेष आणि पुरावे पाहून सामुराई योध्याप्रमाणे देशासमोर नम्र व्हावे, सामाजिक आर्थिक, राजकीय न्यायाची लोकशाही स्वीकारावी. गदा चक्र धनुष्य परशु ही चिन्हे हिंसेची प्रतीके सोडून भगवान बुद्धाची  पंचशील वृत्ती स्वीकारावि!.
        लवकरच लाॅकडाऊन उठेल आणि नवी मुबंई, उरण,  पनवेल येथील बिल्डर भूमाफिया जागे होतील. सिडकोतील,  महानगरपालिकेतील उच्चवर्णीय अधिकारी ओबीसी आगरी कोळी कराड्यांची घरे पाडायची कारवाई सुरू करतील. कोरोनापूर्व काळात विशाल ढगे या सिडको अधिकाऱ्याने कळंबोली नवी मुबंई येथील राजेश परशे या कोळी बांधवांचे घर बायको मुलांना घरातून खेचून काढून, अपमानित करून पाडले. चौकशी अंती 16 कोटींची जमीन बिल्डरला देण्यासाठी, केल्या गेलेल्या आर्थिक घोटाळ्याचे हे प्रकरण होते. एक ओबीसी प्रकल्पग्रस्तास रस्त्यावर आणताना वापरलेले 500 पोलिसांचे पथकच (क्षत्रिय वृत्तीने) बेकायदेशीर पणे ही कारवाई करत होते. मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा या गरीबाचे घर बांधायचे जाहीर आदेश देऊनही न्याय मिळत नाही. अर्थात हे राज्य क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांच्या अत्याचाराच्या समर्थनाचेच "उच्चवर्णीय राजकारण" करते. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प, कोस्टल रोड, नयना सिडको प्रकल्प आगरी कोळी कराडी ओबीसींची उध्वस्त गावठाणे, शेती मासेमारी, रेती, वीटभट्टी व्यवसाय,महाराष्ट्रातील मागासवर्गीय लोकांच्या इज्जतीवर संपत्तीवर पडणारे हे हात मनुस्मृती प्रणित उच्चवर्णीयांचे असतील तर त्यांना शासन करणार कोण?.. स्त्री शूद्रातिशूद्रांच्या या ऐतिहासिक दुःखाच्या मुळाशी जाऊन शब्दात गुन्हा पकडायचाच झाला तर समस्त मागासवर्गीय बांधवांनो हा उच्चवर्णीय "आतंकवाद" "दहशतवादच" आहे. ब्राह्मण क्षत्रिय याच्या जुन्या सत्ता संघर्षात तुमची सत्ता सोडा! प्राण रक्षणासाठी तरी तुम्हास लढावे लागेल!! अर्थात बेकारी, गरिबी, महागडी औषधे, आमच्या जीवावर उठलेली उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय महाआघाडी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समजून येवो.  राज्यपालांकडे वारंवार फेऱ्या मारणाऱ्या वामन फडणविसाना महाराष्ट्राची सत्ताच हवी हे एक ओबीसी शुद्रच सांगू शकतो!

राजाराम पाटील 8928452112
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment