कोरोना काळात माणुसकी हरवत चालली आहे की काय?.
देशावर आलेल्या कोरोनाने संपुर्ण जगात हाहाकार माजवून ठेवला आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी प्रत्येक देश सज्ज होत आहे. प्रत्येक देश त्यावर मात करण्यासाठी आपली कसोटी देत आहे. अनेक तज्ञ दिवस रात्र एक करून ह्यावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
देशांतर्गत असलेला कोरोना कधी आपल्या देशात पोहचला कळलच नाही.
सुरुवातीच्या काळात कोरोना फक्त बाहेरगावावरून आलेल्या लोकांनाच होतो, अशी मानसिकता तयार झाली होती. पण हळू हळू ही मानसिकता संपुष्टात येत गेली कारण कोरोना कुणालाही होऊ लागला होता. त्याने आपला प्रसार लांबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आणि शासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करणे, आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी तसेच आपल्या देशासाठी फायदेशीर आहे.
आपल्या विभागात आपल्या आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कोरोनाची लागण झालेली आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा प्रत्येकजन असा वागायला सुरुवात करतो की जणू त्या परिवाराला त्या व्यक्तीला आपण वाळीत टाकतोय.. कोरोना तर सोडा ज्या व्यक्तीला कॉरंटाईन केल जात त्या व्यक्तीला ही तशीच दुजाभावाची, वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते. ज्या मुबंईबद्दल मुंबईकरांबद्दल बोलल जायच की 'मुंबई प्रत्येक संकटात प्रत्येकासाठी धावून जाते. इथे आजूबाजूवाले नातेवाईकांपेक्षा ही लवकर धावून जातात.' त्याच मुंबईत आता कोरोना झाला असे माहित पडले तरी लोक संबंधच तोडून टाकतात.
वर्षानूवर्षं असलेले जीवाभावाचे संबंध लगेच तोडून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या परिवाराला अक्षरशः खूप वाईट वागणूक दिली जाते. आपल्याला ठीक आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे पण म्हणून आपण अस वागलं पाहिजे का?. आपण धीर देण्याऐवजी त्या व्यक्तीच त्या परिवाराच मानसिक संतुलनच बिघडवून टाकतो ज्याला आपल्या धीराची, आपल्या सोबत असल्याची गरज असते त्याला आपण भीती पोटी अक्षरशः मरणाच्या दारात ढकलतो. आपल्याला कोरोना सोबत लढायचं आहे कोरोना झालेल्या व्यक्ती सोबत नाही. हे मोबाईल रिंग टोन ऐकून लोकांची मानसिकता बदली होईल काय?.
जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका,पोलिस यंत्रणा, मिडिया, इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहेत.आणि आमच्या देशात,राज्यात कोरोना विरूद्ध लढा फक्त सत्ताधारी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, इतर सेवेकरी , पोलिस यंत्रणा, मिडिया, हे एकत्र येऊन कोरोना लढा देत आहेत. आणि विरोधी पक्ष फक्त आणि फक्त असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. देश, राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं आजच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां,त्यांच्या भक्तांना कळत नाही हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे.
कोरोना गरिब, श्रीमंत, उद्योगपती, सत्ताधारी पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते वगैरे असा भेद भाव करत नाही, कोरोनाची लागण कोणालाही व कधींही होऊ शकते.तेव्हा विरोधी पक्षनेत्यांना एकच हात जोडून विनंती आहे की, तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी एकत्र येऊन काम करा. राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवेल
कोरोना आज आहे उद्या जाईल, पण आपण आज जे वागलेतो, नागरिकांना दिलेली वागणूक आयुष्यभर त्या परिवाराला, त्या परिवाराच्या प्रत्येक सभासदाच्या मनावर कोरली जाईल. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घ्या. आपल्याला कोरोना सोबत लढायचं आहे कोरोना झालेल्या व्यक्ती सोबत नाही..
प्रशांत तायडे,९८३३८४१३०९,भांडूप मुंबई.
No comments:
Post a Comment