आरोग्याच्या संकटाला सामना करण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी हवी.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना आरोग्यावर खर्च करणे शक्य नाही म्हणून भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणूनच आरोग्य सेवा हा मूलभूत अधिकार दिला आहे. त्यासाठी तालुक्यात जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात नागरिकांना मोफत औषध उपचार केला जात होता. त्यामुळे गोरगरीब कष्टकरी मजूर कामगार या दवाखान्याचा भरपाई लाभ घेत होता.आज ही जिल्हा सरकारी दवाखान्यात,महानगरपालिकांच्या दवाखान्यात प्रचंड गर्दी असते. सर्वात मोठी मानव सेवा म्हणून डॉक्टर नर्स मेडिकल कर्मचारी रुग्णांना गुणवंत आरोग्य सेवा देत आहेत.
सक्षम मानवी संसाधनां द्वारे ऑपरेशनाची कार्यक्षमता आणि उपचारांची प्रभावी सुनिश्चिता सतत पर्याय प्राप्त आणि प्रभावीपणा या धोरणाची अंमलबजावणी करून रुग्णांना नैतिकता आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सरकारी प्रशासकीय यंत्रणा करती असते.त्यात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे रुग्णांचे आर्थिक शोषण करणारे दलाल निर्माण झाले. त्यांनी स्वार्थासाठी सर्वात मोठी मानव सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स मेडिकल कर्मचारी यांना भ्रष्ट केल्यामुळेच आता बहुसंख्येने नागरिक सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास घाबरत आहेत.त्यांचे एक दोन नाही तर हजारो उदाहरणे कोरोनाच्या काळात उघड झाले.
कोरोनाच्या काळात अनेक गोरगरिबांना आपला जीव नाहक गमवावा लागला. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक विमा योजना तयार केल्या राजीव गांधी आरोग्य विमा योजना,महात्मा फुले आरोग्य उपचार योजना त्यांचा लाभ गोरगरिबांना मिळत असतो.त्याचा कोरोनाच्या काळात खूप डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलनी गैरवापर केला.त्याविरोधात थोडा संताप व्यक्त करणारी आंदोलने झाली पण पोलीस केस होऊन ठोस कारवाई कुठेही झाल्याची नोंद नाही.सरकारने कोणती कडक कारवाई केली ते ही कोणी सांगु शकत नाही. म्हणूनच प्रत्येकांनी
मेडिक्लेम पॉलिसी काढली पाहिजे. त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली पाहिजे जेणेकरून आरोग्यासाठी संकटसमयी तिचा खूप मोठा आधार मिळतो.तसे प्रत्येक व्यक्ती सिगारेट, तंबाखू,मावा,गुटखा खाऊन आणि दारू पिऊन दररोज भविष्याचा विचार न करता एन्जॉय चांगभलं करत असतो.त्यात त्यांची किती पैसे गेले आणि शरीराचे नुकसान करून घेतले तेव्हा त्याला कळत नसते जेव्हा शरीरांचे गंभीर परिणाम समोर येतात तेव्हा त्यांच्या खिशात घरात व बँक खात्यात जमा काहीच नसते.त्यावेळी नातलगां व मित्र मंडळी कडून आर्थिक मदतीची याचना अपेक्षा केली जाते.असा वेळी सर्वच सुरक्षित अंतर ठेवून वागतात.त्यात त्यांची चूक बिलकुल नसते.म्हणूनच आरोग्याच्या संकटाला सामना करण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी हवी.पण किती तरी लोकांना हेच माहिती नाही.मेडिक्लेम(MEDICLAIM) म्हणजे काय?.
अचानक ह्रदय विकारांचा झटका आला तर?. एन्जोग्राफी ,सिटीस्कॅन,एम आर करा, दोन लाख जमा करा.असे संकट आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम (claim) मंजूर करून एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात (Hospital) मध्ये भरती (Admit) व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स (Insurance) कंपनी कडून कॅशलेस (Cashless) अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून (Reimbursement) परत मिळवता येतो.
मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात.
खोलीभाडे (Room Rent),नर्सिंग चार्जेस (Nursing Charges),डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges),डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges),आय सी यु चार्जेस (I.C.U Charges), एन आय सी यु चार्जेस (N.I.C.U Charges), गोळ्या,औषधे, ड्रग्ज, सलाइन खर्च अर्थात (Medicines Charges), सोनोग्राफी खर्च (Sonography),एम आर आय खर्च (M.R.I Charges), सिटी स्कॅन खर्च (City scan Charges),रक्त लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test),प्लेटलेस (Platless) पिशवी,रक्त पिशवी खर्च, विशेष लॅबोरेटरी तपासण्याचा खर्च (Speclal Laboratory Tests), रुग्णवाहिका खर्च (Ambulance)
ओपरेशन थेटरचे भाडे खर्च (Operation Theater Charges),डॉक्टर सर्जरी खर्च( Doctor Surgery Charges)असे व आणखी इतर खर्च खिशातुन भरावे लागतात तेच जर मेडिक्लेम पॉलिसी असती तर सर्व खर्च पॉलीशीने भरला असता.म्हणूनच मेडिक्लेम पॉलिसी काढणे खूप अत्यावश्यक आणि गरजेची आहे?.
असंघटित कष्टकरी कामगारांना, असुरक्षित कंत्राटी कामगारांना अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
सुरक्षित नोकरी करणाऱ्या कामगार,कर्मचाऱ्यांनी बँकेत केलेली बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात. बँकेत असलेली एफ डी मोडावी लागते.सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.शेअर्स shares विकावे लागतात. नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपसरावे लागतात.बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते.हा खर्चा भागविण्यासाठी घर,गाडी जमीन विकण्याशिवाय पर्याय नसतो. काही वेळी वेळेवर हॉस्पिटल,औषधा करीता पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींचा जीव गमवावा लागतो, अशी एक नाही तर हजारो उदाहरणे असंघटित कष्टकरी कामगार,मजुरांच्या कुटुंबातील व्यक्तीवर घडली आहेत.नशा पाणी,शोक करण्यासाठी जेवढा खर्च केला जातो त्यातील पंचवीस टक्के पैसे पॉलिसी साठी टाकले तर कोणत्याही संकटात ते उपयोगी पडतात. म्हणूनच आरोग्याच्या संकटाला सामना करण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी हवी.
मेडिक्लेम असल्यास कोणते फायदे.आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल च्या खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.हॉस्पिटल मध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही (कॅशलेस हॉस्पिटल असेल तर ) बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर,गाडी,जमीन,प्लॉट,फ्लॅट,दुका न, विकण्याची वेळ येत नाही.चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपसरण्याची वेळ येत नाही. भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला मेडिक्लेम इन्शुरन्सची गरज असते.
म्हणूनच सुरक्षित ठिकाणी नोकरी करणारे संघटित कामगार कर्मचारी त्या पॉलिसीचा योग्य तो लाभ घेतात.असंघटित कष्टकरी कामगार मजूर असुरक्षित असंघटित असल्यामुळे या पॉलिसी पासुन वंचित आहेत.असंघटित कष्टकरी कामगारांनी असुरक्षित राहण्या पेक्षा सुरक्षित राहण्यासाठी दारू,गुटका,मावा,तंबाखू खर्च कमी करून आरोग्याच्या संकटाला सामना करण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी हवी ती काढावी.अधिक माहिती करिता संपर्क करावा.जयेश सिद्धार्थ हिवराळे,९८३३२०८४६९,अद्वैव्य इन्फोलीने इन्शुरन्स आणि इनव्हेस्टमेंट्स Advay Advay Insurance and Investments,शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात टेलिव्हिजनवर, वृत्तपत्रांत जाहिराती पाहतात,पण वाचत नाही.देशात तीस
टक्के लोक या पॉलिसीचा फायदा घेतात आणि सत्तर टक्के लोकांना माहीत आहे. पण त्यांचा उपयोग करून घेत नाही. हे धक्कादायक सत्य परिस्थिती आहे.
जयेश सिद्धार्थ हिवराळे,98332 08469,
शब्दांकन: सागर रामभाऊ तायडे.भांडुप,मुंबई.
No comments:
Post a Comment